दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एक ‘मिरॅकल’ घडलं आणि आजही लोकं त्याच्या प्रेमात आहेत.

आपल्याकडे न्याहरी हा एक प्रकार असतो, म्हणजेच सक्काळचा नाष्टा हो ..

गरम-गरम चपाती चहासोबत खायला कित्येक लोकांना आवडतं, कुणाला पोहे तर कुणाला उपमा आवडतो तर कुणाला फोडणीचा भात किंवा सुशीला. हाच आपल्या पिढीचा सकाळचा नाश्ता असायचा.

आपल्या काळात जेवायच्या पदार्थांना नाकं जरी मुरडली तरी आई म्हणायची केलं ते गीळ गुपचूप.

पण आजकालच्या  मॉडर्न पिढीचा नाष्टा काय असतोय तर सॅन्डविच, ब्रेड पॅटिस, पास्ता सारखे प्रकार.  आजकालच्या मम्मीही मोठ्या लाडाने हे असले प्रकार करून देतात, यात एक सर्रास दिसणारा प्रकार म्हणजे ब्रेड आणि त्याच्यावर न्यूटेला ! विषय संपला,पोरगं खुश आणि मम्मीही खुश !

पण हे झालं आपल्या भारतातलं, पण परदेशात चपाती, भात सारखे काही प्रकार नाहीत हे सगळ्यांनाच माहितीये, हा ब्रेड आणि न्यूटेला प्रकार तिकडूनच तर आपल्याकडे आलाय..

बरं तुम्हाला मला आवडणारा न्यूटेला हा काय साधा-सुधा आत्ता आलेला ब्रॅण्ड नाहीये तर त्याला फार जुना इतिहास आहे.

अगदी सर्वांच्याच फ्रीज मध्ये आढळणारया न्यूटेलाची लोकप्रियता अनेक वर्षांनंतरही कमी होत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  ‘न्यूटेला’ला एक टिपिकल पण वेगळी अशी चव आणि स्मेल आहे जे जशीच्या तशी टिकून आहे. परदेशात अगदी खूप वर्ष आधीपासून चॉकलेटी “न्यूटेला”चे अनेक रेसिपीमध्ये खूप महत्व आहे.

अनेक वर्षांपासून इतर कंपन्या न्यूटेलाला कॉपी करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु कुणालाच त्याच्या सारखा अस्सल चवीचा न्यूटेला बनविता आला नाही.

२००७ मध्ये सारा रॉसर या अमेरिकन ब्लॉगरने न्यूटेलावरचे प्रेम व्यक्त करत, अशी आयडिया सांगितली कि, जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्यांना न्यूटेला आवडत नाही, त्यामुळे न्यूटेलाच्या चाहत्यांसाठी असा एक खास दिवस असावा. आणि तिची आयडिया वर्क केली आणि अमेरिकेने दरवर्षी ५ फेब्रुवारी रोजी जागतिक न्यूटेला दिवस साजरा करण्याचे ठरवले.

बरं आता न्यूटेलाची इंटरेस्टिंग हिस्टरी मी तुम्हाला सांगेल..

गोष्ट आहे १९५० ची, तेंव्हा नेमकंच दुसरं महायुद्ध संपलं आणि इटली मध्ये चॉकलेट तुटवडा भासायला लागला.

मिखेले फेरेरो ह्या तरुणाने हा न्यूटेला शोधून काढला, त्याचं असं झालं कि, फॅमिली बिझीनेस हा  बेकिंगचा असल्यामुळे तो हि त्यातच उतरला.  त्याचे वडील पेट्रो यांनी त्यांच्या नावाने कंपनी स्थापन केली होती.आणि तेवढ्यात हे कोको च्या तुटवड्याचं संकट तोंडावर आलं.

कोको अगदीच कमी प्रमाणात आणि महागात मिळत होतं. कोको नसेल तर काय झालं असं म्हणत,  मग मिखेले हेझलनट हे क्रीम वापरायला सुरुवात केली. हेझलनट हे थोडंफार चॉकलेट सारखंच असतं, जे ऑलरेडी इटलीमध्ये खाण्यात यायचं.  मग यात मिखेले च्या वडिलांनी डोकं लावलं आणि   ब्रेडस्प्रेड म्हणून हेझलनट, त्यात थोडंसं कोको पावडर आणि साखर असं मिक्स करून त्यांनी एक पेस्ट बनवली.

हेझलनटची हिस्टरीही तशीच आहे, नेपोलियन च्या आणि अमेरिकेच्या १८०६ मध्ये झालेल्या एका युद्धाच्या काळात कोको बियांच्या किमती खूप वाढल्या होत्या. त्यामुळे चॉकलेटचे व्यापारी अगदी चिंतेत होते, कोको साठी पर्याय म्हणून दुसरे काय वापरता येईल अशा विचारात हेझलनट या चॉकलेट क्रीमच्या रेसिपीचा शोध लागला. 

मग या क्रीमवर मिखेले याने अजून डोकं लावलं आणि एक नवीन क्रीम काचेच्या जार मधून समोर आणलं त्याला नाव दिलं, न्यूटेला !

हेझलनट आणि कोकोची चव असलेले हे न्यूटेला इटलीमध्ये विक्रीस आणलं आणि अगदी कमी वेळेतच हे तुफान लोकप्रिय झालं. तेंव्हाचं ते सर्वात जास्त लोकप्रिय उत्पादन होतं.

इटलीचा न्यूटेला जगभर फेमस झाला, तुलनेने जर्मनीमध्ये तर लोकं न्यूटेला साठी येडेच झाले, त्यानंतर जर्मनी, फ्रांस, युरोप सिडनी असं जगभर न्यूटेलाचे प्रेमी वाढायला लागले,जगभरातील लोकांच्या नाश्त्यात न्यूटेलाचा समावेश व्हायला लागला, मागणी वाढली आणि त्यामुळे सिडनीमध्ये याची फॅक्ट्री काढावी लागली होती.

अशाप्रकारे न्यूटेलाचा इतिहास आपण आज पाहिला तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नक्की कळवा ..

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.