पानाचा असला ‘लाल इतिहास’, ना बच्चन सांगेल ना मस्तानी.

पुण्याला आलो कॉलेजमध्ये काही वर्ष कष्ट केलं पहिली गर्लफ्रेंड मिळाली. ही आमची मुलगीमैत्रीण आम्हाला मुंबई पुणे मुंबईच्या स्वप्नील जोशी प्रमाणे सगळ पुणेरी लाईफ तिच्या स्कुटीवर बसवून फिरवायची. एकदा तिने आम्हाला पान खायला एका पॉश दुकानात आणलं.

आज्ज्याच्या चंचीतून आम्ही हमखास पळवणारा हा ऐवज एसी दुकानात बघून आम्हाला दडपण आलं. पोरगीने स्वतःला आणि मला असे दोन चॉकलेट पान घेतले.

आता पुण्यात म्हटल्यावर पुणेरी काका भेटणारच. त्यांच्याशी थोडी गप्पा मारल्यावर त्यांनी पानाचा इतिहास सांगायला सुरवात केली. तुम्ही पण ऐका.

महादेव-पार्वतीने मिळून सर्वप्रथम हिमालयात पानाचे पहिले बीज पेरले. या काळात पान हे केवळ पवित्र झाड म्हणून मानले जाऊ लागले होते. मात्र हिंदू संस्कृतीत महाभारत-रामायणापासून पानाचा वापर पूजा करण्यासाठी केला जाऊ लागला. गणेश पूजनाला सुपारी व पानाची पूजा केली जाते.

सीता लंकेत असतांना हनुमान रामाचा संदेश घेऊन जेव्हा सीतेला पहिल्यांदा भेटतो. तेव्हा सीता आनंदित होऊन हनुमानाच्या गळ्यात आजूबाजूला असलेली पाने एकत्र करून माळ अर्पण करते. तेव्हा पासूनच हनुमानाला पाने अर्पण करण्याची प्रथा सुरु झाल्याचे म्हटले.

महाभारतात अर्जुनाला यज्ञ करायला पण हीच पाने आणायला नागलोकमध्ये जाऊन पाने आणावी लागली होती. तेव्हा कुठे अर्जुनाचा यज्ञ संपन्न झाला होता.

दंत कथेचा असा पुरावा भेटत नसला तरी नंतर आयुर्वेदाने पानावर चकित्सा केली.

आयुर्वेदाने पानाचा पहिला प्रयोग उंदरावर करून बघितला.नंतर त्यांनी पानाचा प्रयोग माणसावर करून बघताच संशोधनातून सर्वप्रथम पान खाल्याने पचनक्रिया सुधारते असा निष्कर्ष काढण्यात आला. आणि आयुर्वेदात औषधी म्हणून पानाचा वापर करण्यास सुरवात केली गेली.

आपली आई तर लहान मुलानी पान खाऊ नये कान काळे पडतात असे म्हणत असायची.

पलंग तोड पान म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्री जोडीने मिळून खायचे असते ते पान. बनारस पान, या पानाने चित्रपट सृष्टीतील डॉनला पण ठेका घ्यायला भाग पाडले. भारतात जागोजागी पानाची दुकाने पाहायला मिळतात. पान अगदी धर्मापासून तर चित्रपटापर्यंत औषधी म्हणूनसुद्धा वापरली जातात. असे एक गाव नाही जिथे पानठेला आणि असे एक घर नाही जिथे पानपुढा नसणार म्हणून.

पान आले पण त्या पानातील लवंग, इलायची चुना आला कुठून?

केवळ पान आल्याने माणूस शांत बसणार नव्हता. मात्र पानात लवंग, इलायची, चुना टाकायला मुगलांना भारतात यावे लागले. मुगल आल्या नंतर हिंदू धर्मा पर्यंत सीमित असलेले पान इतर धर्मातही वापरले जाऊ लागले.

मुगल पानासाठी येडे होते.

मुगलानी पानाला शाहीस्थान दिले. पानात इलायची, लवंग व चुना लावून पान मुगलांच्या दरबारात खालले जायचं पण हे पान खाण्याची परवानगी फक्त मुगल व मुगलांच्या एकदम जवळच्या मित्रांनाच असायची.

पानाची अधिकाधिक पत्ते मिळावे म्हणून मुगलानी कर गोळा करण्याचे सोडून त्या बदल्यात केवळ पाने मागायला सुरवात केली. आपण नोटा जुन्या नोटांना हरीपत्त्ती म्हणत होतो. मात्र मुगल पानालाच पैश्याच्या समान बघत होते.

आजघडीला पान आणि पानठेले म्हणजे पुरुषांचे चकाट्या करण्याचे ठिकाण.

तेव्हा पण असच होते. पान फक्त पुरुष खायची मात्र यात इतिहास घडवून आणणारी नूरजहाँ निघाली. नूरजहाँनी पानाला केवळ खाण्यापुरते मर्यादित नाही ठेवेल. तिने ओठ लाल करणाऱ्या पानाला पानपुढ्यातून मेकअप बॉक्समध्ये आणून ठेवलं. (महिलांची ही पहिली क्रांती म्हणतात येईल)

महिलांना ओठ लाल करण्याचा जन्मसिद्ध हक्क असताना हे पुरुष पान खाऊन आपले ओठ लाल करुन बसतात. यापेक्षा आपणच आपला जन्मसिद्ध हक्क बजावण्यासाठी याचा वापर करूया.

मस्तानीने तर ओठ, जीभच नव्हे तर गळा पण पान खाल्यानंतर कसा लाल होतो हे दाखवून दिले.मस्तानी होतीच तेवढी पांढरी चायला.

नूरजहाँने पानाचा वापर, पान न खाता फक्त लाल करण्यासाठीच केला.(ओठ म्हणतोय मी)

जेवण झाल्यावर पचन वाढवायला, लग्न झाल्यावर पहिल्या रात्री पलंग तोडायला, ओठ लाल करून हसत जगायला, बनारसला आपली संस्कृती बनायला उपयोगी ठरलेले असे पान आजही आपल्यात स्थान निर्माण करून आहे.

एवढ बोलून काकांनी आपले चार शब्द संपवले. आता हा एवढा इतिहास ऐकल्यावर मात्र चॉकलेट पान खाऊन फुलचंद पण खाल्ल्याची किक आम्हाला बसली हा विषय वेगळा.

टीप- आता हा इतिहास पेपरमध्ये विचारणार नाहीत तरी पुणेरी काकांनी सांगितल म्हणून आम्ही पण बाळूमामाच्या सिरीयल मधल्या तात्याचे ओठ एवढे लाल कसे करते या विषयाचं संशोधन करायचा विडा उचलला आहे.

हे ही वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.