थांबा वाचा अन् मगच मतदानाला जा…

उद्या आपल्याला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. तो पण EVM मशीनवर. आत्ता या मशीन सवयीच्या झाल्या असल्या तरी डोळे उघडे ठेवून मतदान करायची गरज आहे हे पण खरय. आपल्या देशात जेव्हा निवडणुकांची सुरवात झाली तेव्हा आपण मतदानासाठी बेलेट पेपरचा वापर करत होतो. कालांतराने या बेलेट पेपरच्या वापरामुळे होणाऱ्या बोगस मतदानाचा धोका ओळखत आपण EVM मशीन वापरायला सुरवात केली.

सगळ्या सुरवातीला निवडणूक आयोगाकडून ट्रायल बेसिसवर १९८२ साली केरळ विधानसभा निवडणुकीत EVM चा वापर करण्यात आला.

EVM मशीनचा इतिहास. 

यात देखील एक मजेशीर गोष्ट घडली, सिवन पिल्लई या उमेदवाराने EVM  बाबत कोर्टात याचिका दाखल केली पण ती कोर्टाने फेटाळली पण या निवडणुकीत पिल्लई मात्र निवडून आले. त्यानंतर कॉंग्रेस पक्ष EVM  मशीन विरोधात कोर्टात गेला होता आणि मग १९८४ साली EVM चा वापर रद्द करून परत एकदा बेलेट पेपरच्या आधारे निवडणूक घेण्यात आली आणि त्यात पिल्लई पराभूत झाले.

या निर्णयानंतर 1988 साली RoP कायद्यात दुरुस्ती करून evm वापराची वाट मोकळी झाली.

पेपरवर अवलंबून राहिल्याच्या काही दशकांनंतर न्यूयॉर्कमध्ये प्रथम १८९२ साली  “लीव्हर व्होटिंग मशीन” वापरण्यात आले. १९६० च्या दशकात अमेरिकेत पंच कार्ड व्हॉटिंग मशीनचा वापर झाला आणि जवळ जवळ चार दशकापर्यंत फ्लोरिडा मध्ये पारंपारिक मतदान पद्धतीचाच वापर होत होता.

पण २००० साली झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या वरून मोठे वाद झाले आणि अखेर त्यांनी देखील EVM  चा वापर सुरु केला. अमेरिकेत देखील १९७५ साली EVM  चा वापर चालू झाला होता पण कालांतराने EVM  च्या सुरक्षेवर तेथील कोर्टाने प्रश्न उभे केल्याने हा वापर बंद झाला.

भारतात केंद्र सरकारच्या भारत इलेक्ट्रोनीक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रोनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून EVM  ची निर्मित करण्यात येते. आपल्या देशात बनवलेली EVM  मशीन्स भूतान आणि नेपाळने देखील वापरली गेली आहेत.

VVPAT मशीन काय असते ?

आपल्या देशात गेली कित्येक वर्ष EVM  बाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच शंकांच्या गोंधळात २०१९ च्या निवडणुकीत आता निवडणूक सगळ्या मतदार केंद्रावर VVPAT मशीन वापराणार असल्याची घोषणा केली आहे. हे VVPAT मशीन मतदारच्या  उमेदवारला मतदान करतो, ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे का याची खात्री करण्यासाठी VVPAT वापरण्यात येते.

VVPAT म्हणजे Voter Verifiable Paper Audit Trail. आपण जेव्हा EVM  वर मतदान करतो, त्यानंतर जर या यंत्रणेत काही बिघाड झालाच तर या VVPAT मशीन द्वारे मतमोजणी देखील करता येणे शक्य आहे.

VVPAT मशीन कसे काम करते?

मतदार जेव्हा EVM मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो. त्याचवेळी उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली VVPAT स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सील बंद पेटीत जमा होते.

मतदान करताना काही तांत्रिक अडचण उद्भवली असेल तर त्याचीही माहिती दिली जाते. जे ठरवलं तसंच मतदान केलं आहे ना? याची खात्री करण्याची संधी देखील यात मतदाराला मिळते.

VVPAT मशीन काचेच्या पेटीत असतं. त्यामुळे  मतदान केलेला मतदार स्लिपवरचा तपशील पाहू शकतो. VVPAT मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. मतदारांना VVPAT मशीन उघडता येत नाही किंवा त्याला हात ही लावता येत नाही.

२०१३ साली न्यायालयाने पहिल्यांदा निवडणूक आयोगाला VVPAT वापरण्याचे आदेश दिला होता. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा मतदार संघात काही मतदार संघात VVPAT चा उपयोग करण्यात आला आहे.

VVPAT चा इतिहास

१८९९ साली अमेरिकेत जोसेफ ग्रे यांनी मशीन द्वारे मतदान होताना त्याची माहिती प्रसिद्ध होइल अशी यंत्रणा डीजाईन केली होती. त्यानंतर जवळ जवळ शतकभरानंतर रेबेका मर्क्युरी यांनी VVPAT मशीन तयार केले.

मतदान कसे करायचे?

आपण मतदान करायला गेलो कि पोलिंग बूथवर ४ ते ५ पोलिंग ऑफिसर, एक प्रेडीसिंग ऑफिसर आणि काही ऐजेंट असतात. आत जाताच आपण त्यांना आपले मतदान ओळख पत्र दाखवले कि संबंधित अधिकारी तुमचे ओळखपत्रावरील नाव मतदार यादीत चेक करतील. हे करताच दुसरे पोलिंग अधिकारी तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक नोंदवून घेतील.

त्यानंतर येईल ती आपला लोकशाही मधला सगळ्यात महत्वाचा हक्क बजावण्याची वेळ. कारण तिसरे ऑफिसर तुमच्या बोटाला शाई लावून तुम्हाला मतदान करण्याची परवानगी देतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडत्या उमेदवरच्या नावापुढचे बटण दाबले कि त्यानंतर तुम्हला एक आवाज ऐकू आला म्हणजेच तुमचे मतदान झाले.

आपण जे मतदान केले ते आपल्यला हव्या त्याच उमेदवाराला झाले आहे का? हेच पाहण्यासाठी EVM  जवळच VVPAT मशीन असणार आहे. या मशीन मध्ये तुम्ही मतदान करताच ७ सेकेंदासाठी एक चिट्ठी येईल त्यावर तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान केले आहे त्याचे नाव आणि पक्षाचे जिन्ह असेल. ७ सेकेंदा नंतर ही चिट्ठी त्याच मशीन मध्ये जमा होते. यावरून आपण सहज कुणाला मतदान केले याची खातरजमा आपण करू शकणार आहोत.

आता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि येत्या निवडणुकीत नक्की मतदान करा.

हे ही वाच भिडू.   

 

Leave A Reply

Your email address will not be published.