काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेरच्या नंदीचं तोंड हे ज्ञानवापी मशिदीकडे आहे…?

वाराणसीतल्या ज्ञानवापी मस्जिदीचा मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच तापला आहे. ज्ञानवापी मंदिराचं व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचा आदेश दिल्यानंतर न्यायालयाने मशिदीबद्दल एक महत्वपूर्ण दिला आहे. व्हिडिओ सर्वेक्षणात मशिदीच्या आतमध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांमार्फत करण्यात आला आहे.

याच दाव्याच्या आधारावर वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणात ज्या ठिकाणी “शिवलिंग” आढळले आहे ते तात्काळ सील करण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर सील केलेल्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

 

या केसेमध्ये हिंदू पक्षाचा दावा आहे की काशी विश्वनाथ मंदिराचं मुळस्थान हे आज जिथं ज्ञानवापी मस्जिद आहे तिथं आहे.

सोमवारी सर्वेक्षण संपल्यानंतर हिंदू बाजूचे वकील डॉ. सोहनलाल यांनी ‘नंदी के बाबा’ सापडल्याचं म्हटलं आहे.

हिंदू पक्षाच्या बाजूने मशिदीच्या ठिकाणी मंदिरच होतं असा दावा करण्यासाठी जे पुरावे दिले जात आहेत त्यामध्ये एक आहे काशी विश्वनाथ मंदिरा पुढच्या नंदीचा देखील समावेश आहे.

हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार नंदीचं तोंड नेहमी शिवलिंगाच्या दिशेला असतं. मात्र काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेरच्या नंदीचं तोंड हे ज्ञानवापी मशिदीकडे आहे. याचाच अर्थ शिवलिंग मशिदीच्या आत आहे असं लॉजिक मांडण्यात येतं.

त्यामुळं त्या नंदीमागचा इतिहास काय आहे ? हे एकदा बघू. 

तर या नंदीच्या इतिहासाबद्दलचा सर्वात जुना पुरावा सापडतो एम.ए. शेरिंग यांच्या ‘सेक्रेड सिटी आफ द हिंदूज’ या पुस्तकात.

यामध्ये शेरिंग सुमारे सात फूट उंचीची, दगडापासून बनवलेल्या, देव महादेवाला अर्पण केलेल्या नदीचा उल्लेख करतात. हा नंदी नेपाळच्या राजाने दिल्याचाही उल्लेख या पुस्तकात आहे. 

PG

तसेच या नंदीच्या पूर्वेला काही पावलं पुढे गेल्यास महादेवाच्या सन्मानार्थ बांधलेलं मंदिर आहे असं शेरिंग सांगतात. शेरिंग यांचं पुस्तक हे ब्रिटिश भारतात आल्यानंतरच आहे. १८६८ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. 

शेरिंगच्या या पुस्तकात ज्ञानवापी कुंडाचा देखील रेफरन्स आहे. 

शेरिंग आपल्या पुस्तकात सांगतो की असं सांगितलं जातं की जेव्हा जुन्या विश्वनाथ मंदिर उध्वस्त करण्यात येत होतं तेव्हा मंदिरातील एका पुजाऱ्याने त्या मंदिरातील शिवलिंग घेऊन या ज्ञानवापी कुंडात उडी घेतली होती. त्यामुळे हिंदू लोकं या कुंडाची पुजा करतात आणि हार, फुले अर्पण करतात. 

आज जेव्हा ज्ञानवापी मशीदीचा मुद्दा निघाला आहे तेव्हा या पुस्तकाचा पुन्हा रेफरन्स दिला जात आहे. आता अजून एक मुद्दा म्हणजे नंदीचं तोंड ज्ञानवापी मशिदीकडं आहे का ?

तर याच उत्तर सरळ हो असं आहे.

InkedWhatsApp Image 2022 05 16 at 10.12.21 PM LI

वरच्या फोटोमध्ये तुम्हला दिसेल की केशरी रंगा मध्ये जी नंदीची मूर्ती आहे तिचं तोंड हे काशी विश्वनाथ मंदिराकडे नाहीये. तर बाजूलाच असलेल्या ज्ञानवापी मस्जिदीकडे आहे. आता काशी विश्वनाथ मंदिर कॉम्ल्पेक्सचा कायापालट करण्यात आला आहे.

हिंदू पक्ष म्हणतोय तसं नंदीच्या पुढचा जो मशिदीचा तेहखान आहे तिथं खरंच शिवलिंग आहे का? यावर अजून कोर्टाने निर्णय दिला नाहीये. मात्र त्याचवेळी  ज्ञानवापीमध्ये इतके पुरावे सापडले आहेत, जे अद्याप उघड होऊ शकत नाहीत. त्याचवेळी एवढं सांगायचं आहे की सुमारे साडे बारा फुटाचे शिवलिंग सापडले आहे.

आम्ही अयोध्येसारखी ५०० वर्षे वाट पाहणार नाही. 

बाबा विश्वनाथाचे भव्य मंदिर बांधले जाणार असून ते लवकरात लवकर बांधले जाईल. असा दावा हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील जितेंद्र सिंह यांनी केला आहे.

त्याचवेळी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलवर सुनावणी करणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांना वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचे निरीक्षण, सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळं आता हे केसमध्ये नक्की काय होणार हे आता येणाऱ्या काळात कळेलच.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.