….म्हणून मलबार हिल्स जगातल्या सगळ्यात महाग एरियांपैकी एक आहे

मलबार हिल्स… मुंबई मधलाच नाहीतर भारतातील सर्वात महाग एरियांमधला एक.  किती महाग तर मलबार हिल्स मधल्या प्रॉपर्टीसची सरासरी किंमत सांगितली जाते जवळपास ५०००० रुपये प्रति स्केअर फूट. महाराष्ट्राचे राज्यपाल राहतात ते राजभवन, मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान मलबार हिल्सवरच आहे. बिर्ला फॅमिली, गोदरेज फॅमिली यांची घरं याच भागात आहेत.

एवढंच काय तर या भागातला आमदार पण भारतातल्या सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक. पण सगळ्यात श्रीमंत अशी ओळख असेलल्या या भागाचा इतिहास ही तेवढाच श्रीमंत आहे.

मुंबईचा जो सुळका समुद्रात घुसला आहे त्याच्या अगदी टोकाला मलबार हिल्स आहे. वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव प्रेक्षणीय स्थळं मलबार हिल्समधेच आहेत.

आता मलबार हिल्सचं नाव मलबार हिल्सच का पढलं याच्या अनेक स्टोऱ्या सांगितल्या जातात.त्यातली सगळ्यात जास्त फेमस आहे ती केरळ मधल्या मलबार या प्रदेशवरुन मलबार हे नाव पडल्याची. 

केरळच्या मलबार भागातून येणारे समुद्री चाचे या भागात ब्रिटिशांची व्यापारी जहाजं लुटत असत. त्यांच्यामुळच या भागाला मलबार हे नाव पडलं.

Malabar Hill Bombay Mumbai 19th Century Photograph

अजून एक आख्यायिका मलबार हिलबद्दल सांगितली जाते तीही केरळशीच संबंधित आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी  मलबार हिल आणि चौपाटी बीचमधील काही भाग केरळच्या केई कुटुंबाकडे होता. केई कुटुंब केरळमधील उत्तर मलबारमधील कन्नूर जिल्ह्यातील होते. केई म्हणजे फारसी भाषेत “जहाज मालक’. हे केरळचे मुस्लिम त्यांच्या संपत्तीसाठी आणि व्यापाराद्वारे मिळवलेल्या जमिनीच्या मालमत्तेसाठी ओळखले जात. त्यांचे पोर्तुगीज, ब्रिटीश आणि फ्रेंच यांच्याशी व्यापार संबंध होते, परंतु जेव्हा ब्रिटीशांनी त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी समस्या निर्माण करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी ब्रिटीशांशी करार केला आणि संपूर्ण क्षेत्र इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीला दान केले. त्यामुळे हा परिसर इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीची मालमत्ता बनला. 

आता या मलबार या शब्दाचं केरळशी असलेलं कनेक्शन पूर्णपणे नाकारणारी हि एक स्टोरी सांगितली जाते. 

ती अशी… मलबार हिल्सच्या वाळकेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी कोकण किनारपट्टीवरून अनेक कोळी बांधव येत असत. समुद्रातून बोटीने कोळी बांधव वाळकेश्वरला येत असत. इंग्रज पूर्ण कोकण किनारपट्टीलाच मलबार म्हणत असत आणि या भागातून येणाऱ्या लोकांना मलबारी. त्यामुळेच हेय मलबारी ज्या एरियाला भेट देतात त्याचं नाव मलबार हिल्स. आता ब्रिटिशांची नाव देण्याची पद्धत त्याच्या जेवनाप्रमाणेच पाणचट होती असं म्हटलं जातं. त्यामुळं खरं नाव कसं पडलं हे शोधणं मलबार हिल्स मध्ये फ्लॅट घेण्यासारखंच अवघड आहे.

मात्र मलबार हिल्सला मुंबईतला सगळ्यात पॉश एरिया बनवण्यात ब्रिटिशांचा हात होता असं म्हणता येइल. त्यातल्या त्यात ब्रिटिश गव्हर्नरसचा. १८०३ मध्ये मुंबईच्या अंतर्गत भागात मोठी आग लागली होती.  तसेच प्लेगच्या साथीनंही फोर्ट भागात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं मग बॉम्बे फोर्टच्या आतमध्ये दाटीवाटीने राहणारी वस्ती विरळ करण्याची ब्रिटिशांनी योजना आखली.  इंग्लिश अधिकारी, श्रीमंत पारशी व्यापारी वळले मलबार हिल्सकडे. 

पण या स्तलांतराला गती मिळाली जेव्हा ब्रिटिश गव्हर्नरसुद्धा  मलबार हिल्सकडे वळाले.

लॉर्ड माउंस्टुअर्ट एल्फिन्स्टन या गव्हर्नरने मलबरच्या टेकड्यांवर पहिला बंगला बांधला.

 त्यानंतर गव्हर्नर सर जे. फर्ग्युसन  पत्नी प्लेग च्या साथीमध्ये गमवल्यानंतर परेलच्या गव्हर्नमेंट बंगल्यावरून मलबार हिल्स कडे जो मुक्काम हलवला तो कायमचाच. ब्रिटिश काळात जिथं गव्हर्नर राहत होते ते आज राज्यपालांचे निवासस्थान झालंय. 

राज्यपाल जिथं राहतात तिथं मग आता आजूबाजूच्या प्रदेशातील राजे पण आपले बंगले मलबार हिल्सला उभारु लागेल. तेव्हपासून जी मलबार हिल्सचे भाव वाढले ते आजतागायत कायम आहेत. बदलले आहेत ते फक्त तिथं राहणारे राजे.  

Leave A Reply

Your email address will not be published.