अशी पण एक दारू, ज्याला माकडांचा ‘हातभार’ आहे..!

पिले पिले ओ मोरे राजा, पिले पिले ओ मोरे जानी.. बस काय भिडू तुम्ही देणार तर आम्ही पिणारच ना..
तर झालं असं कि, एक दोस्त दुबईतन इंपोर्टेड बाटली घेऊन आला. आता पितात तर सगळेच. जस उचलली बाटली लावली तोंडाला. पण कधी बाटलीकडे बघून पिलाय काय? जवळपास सगळ्यांचच उत्तर ठरलेलं असतय.. नाही?

आम्हाला आतला माल मॅटर करतो. आमचं पण सेमच की ओ.. खरं पहिला घोट घसा शेकतो म्हणतात. राव पहिलाच पेग नाकात गेला न आमच्या.. (वास म्हणायचं मला वास) त्यात आणि जोडीला तू चीज बडी है मस्त मस्त गाणं लागलं होत. ‘क्या बवाल चीज हैं ये’ म्हणत बाटली हातात घेतली न भिडू..

बघितलं तर काय? गांधीजींची तीन माकड.. हायSSSS.. काळजाचा ठोका चुकला. नाम था.. मंकी शोल्डर.. मनाशी म्हणलं आता दारूला हातभार लावायला माकड कधी आली..

लै शोधलं तवा सापडलं..

आपला राजेश खन्ना जस म्हणतो, पुष्पा आय हेट बिअर्स, इन्हे हटाओ और व्हिस्की ले आओ.. पण व्हिस्कीच्या वासानेच आपली तरणी पोर नाक मुरडतात. काका मामा आजोबाच ड्रिंक असतंय ते, असं पण म्हणतात. मंकी शोल्डर पण एक स्कॉच व्हिस्कीच आहे. पण त्याच रसायन जरा वेगळ आहे. २००५ साली ही माल्ट व्हिस्की लाँच करण्यात आली. यंग जनरेशनला गृहीत धरून हे मिश्रण बनवण्यात आलय. (माल्ट व्हिस्की, सिंगल माल्ट, ब्लेंडेड व्हिस्कीं हे जे काही प्रकार आहेत ते आपण जरा वेगळ्या भागात बघू) सध्यासाठी मंकी शोल्डरच फोकस करू..

तर माकडांचा खरच सहभाग आहे का यात ? की माकडांसाठीच बनवली आहे ही दारू

होय.. माणूस नावाच्या माकडासाठीच बनवली आहे ही दारू.. पण दारूचं नाव मंकी शोल्डर का पडलं याची एक मजेदार गोष्ट आहे.

बेसिकली ही दारू ही दारू ३ प्रकारच्या ब्लेंडेड व्हिस्कींपासून तयार केली जायची. हि व्हिस्की तयार करताना फर्मन्टेशन केलं जात. या प्रक्रियेदरम्यान त्यात फावडे घालून माल्ट केलेली बार्ली हाताने मिसळली जायची. त्याकाळी मोठ्या डिस्टिलरी, यंत्र असला काही विषय नव्हता. हे सर्व मिक्सिंग कामगार करायचे.

या श्रम-केंद्रित प्रक्रियेमुळे कामगारांना अनेकदा खांद्यावर दुखापत व्हायची आणि त्यांचे हात माकडांसारखे लुळे पडायचे. त्यावेळी या दुखापतीला मंकी शोल्डर असं नाव दिल गेलं. ज्या कामगारांमुळे ही व्हिस्की फेमस झाली त्यांना ट्रिब्यूट म्हणून या व्हिस्कीला मंकी शोल्डर हे नाव देण्यात आलं.

deveard studio 1

इतर व्हिस्कींपेक्षा मंकी शोल्डर मध्ये काय वेगळं आहे?

बऱ्यापैकी व्हिस्की ही नीट म्हणजेच कोरडी किंवा बर्फाचे खडे टाकून प्राशन करतात. (आपण भारतीय पाण्यासोबतच घेतो.. वाचवून वाचवून पितो). व्हिस्कीच कॉकटेल ड्रिंक बनवता येत नाही. (सगळं मिक्स) पण मंकी शोल्डर या इतर व्हिस्कींना अपवाद आहे. ती आपण नीट मारू शकतो, बर्फासोबत घेऊ शकतो किंवा त्याच कॉकटेल, मॉकटेल काहीपण बनवू शकतो. पूलसाईड ड्रिंक म्हणून रमला हा बेस्ट पर्याय आहे. कारण या व्हिस्कीची चव फ्रुटी आहे. (असं कंपनीचं म्हणणं आहे, माझं नाही)

सगळ्याच व्हिस्की या माल्ट आणि ग्रेन्स पासून बनवल्या जातात. पण मंकी शोल्डर ही १०० टक्के माल्टपासून बनवली जाते. (म्हणूनच याला व्हिस्की सारखा स्ट्रॉंग वास येत नाही.)

बॅच २७ हा एक जबरी विषय वाटतो. बऱ्यापैकी व्हिस्कींवर कोणत्या वर्षी तयार झाली कोणती बॅच आहे हे मेन्शन असत. म्हणजे दारू जितकी जुनी तितकी भारी. पण मंकी शोल्डरचा बॅच २७ म्हणजे दारूचे बॅरल्स म्हणता येईल. जस कि सुरुवातीला मंकी शोल्डर व्हिस्की Balvenie, Kininvie, and Glenfiddich (तुम्हाला हवा तसा उच्चार करा. अमृत प्राशन करून उच्चार जरा स्पष्ट येतात म्हणे) या तिन्हींच मिश्रण होत. त्यानंतर मागणी वाढली आणि कंपनीने तीन बॅरेल्स मिक्स करण्याऐवजी Balvenie, Kininvie, and Glenfiddich चे प्रत्येकी ९ बॅरेल्स मिक्स करायला सुरवात केली आणि ती झाली यांची बॅच २७ (काय मंदपणा आहे.)

मोठ्यामोठ्या बारटेंडरची पहिली पसंद म्हणे मंकी शोल्डर आहे (असं त्यांची कंपनी सांगते बर.) कारण ते एक व्हर्सेटाइल ड्रिंक आहे. जे सगळ्यात मिक्स होत. घशाखाली स्मूदली उतरत. वास पण इतर व्हिस्कींसारखा हार्ड नाही. तुम्ही ते अगदी कस पण घेऊ शकता. जस उचलली बाटली लावली तोंडाला.. अगदी तस.

बर कंपनी, मंकी शोल्डरची किंमत कमी आहे म्हणजेच बजेट फ्रेंडली आहे असं सांगते.. बाकी काही असो ना असो हे मात्र थातुर मातुर आहे.. ३००० ते ४००० हजार आणि ते फक्त ७५०ml साठी… येडे आहे का बे लोक.. मी तर पिणार नाही, मी सांगण्याचं काम केलंय. बाकी तुमचं तुम्ही ठरवा.. जय ‘तळी’राम i mean रामराम..

  • भिडू स्नेहल माने

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.