आणि तेव्हापासून मुंबईमध्ये लोकल धावू लागली..

कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसापासून मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर १५ ऑगस्ट पासून ही लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु करण्यात येत आहे.  लसीचे दोनही डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असणार आहे. यामुळे मुंबईतील नोकरदारांची फरफट वाचणार आहे.

मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल ट्रेनचा पहिला मार्ग कुठला होता, ती कधी सुरु झाली, कालानुरूप तिच्यात कशे, कधी बदल करण्यात आलेत त्याचा बोल भिडूने घेतलेला हा आढावा.

आशियातील पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे

देशातील नाही तर आशियातील पहिली रेल्वे धावली बोरीबंदर ते ठाण्या दरम्यान धावली होती. तो दिवस होता १६ एप्रिल १८५३ चा. या रेल्वेचे इंजिन हे वाफेवर चालणारे होते. त्याला १४ डब्बे होते. बोरी बंदर ते ठाण्याच्या ३४ किलोमीटरच्या प्रवासाला साधारण ५७ मिनिटे लागली लागले होते. त्यावेळी दोनचं ट्रेन सेवा देत होत्या.

पुढील एका वर्षात ही लाईन कल्याण पर्यंत वाढविण्यात आली होती. तर कल्याणच्या उत्तर दिशेला वाशिंद पर्यंत आणि दक्षिणेकडे पळसधरी पर्यंत रेल्वे लाईन नेली होती. त्यामुळे पाहिलं जंक्शन कल्याण बनले. १८७८ पर्यंत दादर ते बांद्रा आणि मुंबई ते पुणे स्टेशन पर्यंत रेल्वे लाईन येऊन पोहचली होती. परळ, दिवा, मशीद, घाटकोपर सारखे स्टेशन बांधून पूर्ण झाले होते. तसेच या वर्षी व्हिक्टोरिया टर्मिनल बांधायला सुरुवात झाली होती.

कुर्ला, महालक्ष्मी आणि करी रोड स्टेशन आणि व्हिक्टोरिया टर्मिनल १८८८ मध्ये बांधून पूर्ण झाले होते. हे टर्मिनल बांधायला १६ लाख ४० हजार रुपये खर्च झाले आला होता. आणि तिथे फक्त ६ प्लॅटफॉर्म होते.

१९१८ पर्यंत सीएसटी ते कल्याण दरम्यान ४ लाईन टाकण्यात आल्या होत्या. १९२० पर्यंत सर्व लाईन सिगन्लिंग इलेक्ट्रिक करण्यात आले होते.

 पहिली लोकल ट्रेन धावली ३ फेब्रुवारी १९२५ ला

मुंबई उपनगरीय रेल्वे वेस्टर्न रेल्वे आणि सेन्ट्रल रेल्वे विभाग चालवतात. तसेच या लाईन वरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा धावतात.  सेन्ट्रल रेल्वेकडून सेन्ट्रल लाईन, हर्बल लाईनचं ऑपरेटिंग होत.

व्हिक्टोरिया टर्मिनल ते कुर्ला दरम्यान हर्बल लाईन वर पहिली लोकल ट्रेन ३ फेब्रुवारी १९२५ ला धावली. याला EMU असे म्हटले जात होते. पूर्ण विद्युतीकरणावर ही रेल्वे चालत होती.  १५०० वोल्ट डीसी वर ही ट्रेन चालत होती. त्याला केवळ सहा डब्बे जोडण्यात आले होते. ही ट्रेन मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात फेमस झाली होती.

जरी लांब पल्याच्या ट्रेन मुंबई मधून सुरु झाले तरी या ट्रेन बद्दल मुंबईतील नोकरदार वर्गामध्ये कुतूहल होते. १९२८ मध्ये कल्याण पर्यंत रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात आले होते. हर्बल लाईन वर ४ डब्ब्या वाली तर सेन्ट्रल लाईनवर ८ डब्ब्याची सुरु करण्यात आली होती.

लोकल ट्रेन सुरु झाल्यानंतर १९२९ मध्ये लाहोर ते मुंबई दरम्यान चालणारी पंजाब मेल एक्स्प्रेस सुरु करण्यात आली होती. आता ती फक्त पंजाब मधील अमृतसर पर्यत धावते. १९५० मध्ये कुर्ला ते मानखुर्द पर्यंत अजून एक नवीन लाईन बनविण्यात आली. त्यावर केवळ उपनगरीय रेल्वे चालत होत्या. पण त्या लाईनचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यामुळे वाफेवर चालणारे इंजिन रेल्वेला जोडण्यात आले होते. पुढे २ वर्षात या लाईनचे विद्युतीकरण झाले. आणि त्यानंतर या मार्गावर सुद्धा इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या.

यानंतरच्या काळात मुंबईतील सर्व लाईन वाढविण्यात आले आल्या मात्र त्यात मोठे बदल करण्यात आले नाही. मात्र लहान-लहान बदल हे वेळोवेळी करण्यात आले.

वाशीचा पूल १९९० पूर्ण झाल्यानंतर पनवेल पर्यंत ट्रेन सुरु करण्यात आली.

१९९२ मध्ये मध्ये पहिल्यांदा महिलांसाठी राखीव डब्बे ठेवण्यात आले होते. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डब्यात जागा आरक्षित ठेवण्यात येऊ लागल्या.

२००७ मध्ये स्टेनलेस स्टीलचे डब्बे लोकल रेल्वेला जोडले होते. यात चांगल्या सिट. एअर सस्पेशन स्टेशन अनाऊन्समेंट बसविण्यात आली. जून २०१५ नंतर डीसी इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या बंद करण्यात आल्या आहे. २०१७ मध्ये पहिल्यांदा वातानुकूलित लोकल ट्रेन चर्चगेट ते विरार दरम्यान चालत आहे.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.