नानकटाईवर दावेदारी अनेक देशांनी केली, पण ती जगभर पोहचली सुरतमुळे…

चहा बिस्किटे हासुद्धा एक चर्चेचा विषय ठरू शकतो इतकी उत्सुकता, कुतूहल आपल्या देशात जिवंत आहे. कुठला बिस्कीट कितीवेळ चहात बुडवून झाल्यावर तग धरू शकतो यावर लोकं संशोधन करत असतात. संध्याकाळी चहा बरोबर बिस्कीट पाहिजेच असाही नियम काही घरांमध्ये पाहायला मिळतो.

पॅकेज बिस्कीट, सुट्टे बिस्कीट किंवा घरगुती बनवलेले बिस्कीट आपल्याला पाहायला मिळतात त्याला जोड म्हणून पूढे खारी, टोस्ट, नानकटाई कराची बिस्कीट हेही पदार्थ दिसून येतात. इतके सारे चहा सोबत खाण्याचे पदार्थ आहे पण या सगळ्यांमध्ये बेस्ट स्टोरी एकाच पदार्थाची आहे ती म्हणजे नानकटाई. नानकटाई हा एक नॉस्टॅल्जिया म्हणून लोकांना परिचित आहे पण त्याची बॅकस्टोरी लय भारी आहे. 

१६ व्या शतकाच्या सुमारास एका डच जोडप्याने सुरतच्या बाजारपेठेत एका बाजूला बेकरी सुरू केली.

हे डच मसाल्याचे व्यापारी होते आणि बरेचशे डच लोकं हे बंदराच्या एरियामध्ये राहणारे होते. काही काळ त्या डच कपलने आपला व्यवसाय चालवला नंतर मात्र त्यांनी ती बेकरी फरामजी पस्तोंनजी डोटीवाला या पारसी गृहस्थाला विकून टाकली. 

ज्यावेळी डच लोकं बेकरी चालवायचे तेव्हा ब्रेड बेकिंगसाठी ते पाम झाडापासून बनवलेल्या ताडीचा फरमेंटेशनसाठी वापर करायचे. भारतीयांना ही पद्धत काय आवडली नाही. तर मग तरतूद म्हणून डोटीवाला यांनी ड्राय झालेले ब्रेड विकायला सुरवात केली. 

ही नव्यानेच ब्रेड विकण्याची  विकण्याची पहिलीच वेळ होती पण डोटीवाला यांनी बनवलेली हि नवी रेसिपी सुरतच्या रहिवाशांना आवडून गेली. हॉट ड्रिंक्ससोबत हे ड्राय ब्रेड खाल्ले जाऊ लागले. 

डोटिवाला यांना लोकांच्या आवडीची नस ओळखता आली होती. त्यांनी काय केलं तर सगळयात आधी त्या अगोदरच्या डच रेसिपी मधून ताडी आणि अंडी काढून टाकली आणि तसेच ड्राय ब्रेड तयार करुन त्याला व्यवस्थित कट करून लहान लहान बिस्कीटचा आकार दिला. हे पहिलं व्हर्जन होतं नानकटाईचं.

सुरत मध्ये सगळयात टॉपचं स्नॅक म्हणूण नानकटाई विक्री केली जाऊ लागली.

अफाट लोकप्रियता या नानकटाईला मिळाली. आता एवढी सगळी उलाढाल पाहून गुजराती व्यापारी शांत थोडीच बसणार होते त्यांनी या नानकटाईमधल विक्री पोटेन्शियल बघितलं. त्यांनी तो ब्रेड बिस्किटाचा शेप बदलून त्याला अंडगोलाकृती आणि गोल आकार दिला आणि त्याला नाव दिलं ईराणी बिस्कीट. सुरत मधे अजुनही या पदार्थाभोवती मार्केट फिरतं.

सगळे चेंज करून झाल्यावर हे बिस्कीट पोहचले मुंबईत. तेव्हा मुंबईत बरेच गुजराती लोकं अगोदरपासूनच स्थायिक झालेले होते. त्यांना मुंबईत हि बिस्कीट मिळाली आणि एकदम घरचं वातावरण झाल्याचा फिल आला. तेव्हापासून संध्याकाळच्या नाश्त्याला हे नानकटाई कम बिस्कीट खाल्ली जाऊ लागली.

मुंबईतून मग ही क्रेझ पोहचली पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत. ओव्हन मधून बनवल्या बनवल्या गरम गरम नानकटाई लोकांना खाण्यासाठी हजर करुन दिली जायची. थंडीत खाण्यासाठी नानकटाई सारखा दुसरा कुठला पदार्थ नव्हता. 

टोरांटो स्टार या मॅगझिनने एका आर्टिकल मध्ये सांगितल होतं की काही इतिहासकारांच्या मते खटाई ही पर्शियन आहे. खटाई म्हणजे सहा. ओरिजनल सहा पदार्थ हे सोळाव्या शतकात नानकटाई बनवण्यासाठी वापरले जायचे त्यात पिठ, अंडी, साखर, बटर किंवा तूप, बदाम आणि ताडी गरजेनुसार. पण यावर पर्शियन लोकांनी केलेला क्लेम बघून अफगाणिस्तान गप कसा बसेल त्यावर त्यांनीही आपलं मत मांडलं की नानकटाई हा अफगाणिस्थानचा पदार्थ आहे. नान हा आमचा शब्द आहे.

नान म्हणजे फ्लॅट ब्रेड आणि खटाई म्हणजे बिस्कीट. ब्रिटिशांनी याचा कॉम्बो केला आणि त्याला नानकटाई/ नानखटाई असं नाव दिलं. अनेक देशांनी नानखटाई आमच्या देशाची देण आहे म्हणून कालवा केला पण या पदार्थाला खरं मार्केट मिळवून दिलं ते सुरतच्या बाजारपेठेने हेही तितकंच विशेष . 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.