जपानवरून नेहरूंनी लेडीज जॅकेट आणलं, तेच नेहरू जॅकेट झालं…आज सगळे तेच वापरतात

आपल्याकडे पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये एक गोष्ट हमखास दिसते ते म्हणजे नेहरू जॅकेट. नेहरू जॅकेट हा एक प्रकारचा कोट आहे जो कमरेच्या खाली परिधान केला जातो. 

लग्न असो किंव्हा एखादा समारंभ असो भारतीय फॅशनने पुरुषांना नेहरू कुर्त्याची सोय करून ठेवलीय. खाली चुडीदार पॅन्ट, त्यावर लांबलचक कुर्ता घालायचा, आणि त्यावर नेहरू जॅकेट….बरं जर अख्ख्या शेरवानीमध्ये गुदमरत असेल तर त्याच शेरवानीची एक लहान आवृत्ती म्हणजे नेहरू जॅकेट….सॉर्ट विषय…!!!

भारतात हे ‘नेहरू जॅकेट’ नेहरूंनीच फेमस केलं.

त्यांचा फॅशन सेन्स वाखणण्याजोगा होता हे मात्र खरंय. त्यांचं हेच जॅकेट भारताशिवाय परदेशी लोकांनाही आवडायचं. तुम्हाला आठवत असेल तर जेंव्हा बीटल्स ग्रुप भारतात आलेला तेंव्हा त्यांनीही नेहरू जॅकेट घालण्यास सुरुवात केली होती. 

नेहरू जॅकेटला मोठा इतिहास आहे. या प्रकारचे जॅकेट १९४० च्या दशकात भारतात बनवले जाऊ लागले. तेंव्हाच्या काळात अशी बंद गळ्याची जॅकेट घालणाऱ्यांकडे आदराने पाहिले जायचे.

 आता हे जॅकेट नेमकी कुणाची फॅशन आयडिया होती ? नेहरूंची कि इतर कुणाची ?

यामागे २ किस्से सांगितले जातात.

त्यातला पहिला म्हणजे, 

नेहरू एकदा बीजिंगच्या दौऱ्यावर गेले होते. बीजिंगहून परतीच्या प्रवासात त्यांनी एक मँडरीन-कॉलर म्हणजेच चायनीज कॉलर असलेले एक जॅकेट खूप आवडले. मात्र ते जॅकेट म्हणजे तेथील महिलांचा पोशाख होता. नेहरूंनी कसलाही विचार न करता ते फिमेल जॅकेट विकत घेतले आणि भारतात परतले.

इकडे आल्यावर त्यांनी आठवणीने आपल्या ठरलेल्या टेलरला बोलावून असेच हुबेहूब जॅकेट त्यांच्यासाठी शिवायला सांगितलं. आणि अशाच पद्धतीने बनव जेणेकरून पुरुष देखील ते घालू शकतील, झालं टेलरही हुशार निघाला आणि त्याने मँडरीन-कॉलर असलेल्या चायनीज जॅकेटची जॅकेटची हुबेहूब प्रतिकृती तयार केली. 

नेहरूंकडे आधीच प्रसंगाला साजेसे विविध लांबीचे आणि डिझाइन्सचे जॅकेट होते. मात्र असं शॉर्ट जॅकेट देखील उत्तम पर्याय बनू शकतं हे त्यांना सुचलं असावं. म्हणून तर त्यांच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं जातं.

दुसरा किस्सा म्हणजे,

भारतातील फेमस फॅशन डिझायनर रितू कुमार यांनी केलेल्या रिसर्चनुसार, सतराव्या आणि अठराव्या शतकात अवध राजघराण्यांमधील पुरुष अशा प्रकारचे जॅकेट्स घालत असत. मात्र ते परिधान करत असलेल्या लांब अचकन कोट जड-ब्रोकेड असायचे. 

हेच अचकन कोटांची शैली नेहरूंना खूप आवडली.  

आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचे जॅकेट्स वापरायला सुरुवात केली असं सांगण्यात येतं कारण नेहरू जॅकेटची रचना काहीशी अचकन, शेरवानी किंवा बंद गळ्यातील जॅकेटसारखी आहे.

नेहरूंनी मात्र महागड्या ब्रोकेडची अदलाबदली केली आणि हे जॅकेट खादीपासून बनवले जाऊ लागले. कारण तेंव्हा ब्रिटिशांच्या विरोधात देशभरात चळवळी उभारल्या जात होत्या, खादीचा पुरस्कार केला जाऊ लागला म्हणून हे जॅकेट्स खादीपासून बनवले जात असे. सध्या यासाठी लिनेन, कॉटन यांसारखे अनेक कापड वापरले जातात.

नेहरूंनी जॅकेटची गुडघ्यापर्यंत लांबीची टाईट पांढऱ्या चुरीदार पँटसह आणि त्यांच्या बटनहोलमध्ये गुलाब जोडणे असं जॅकेट ‘नेहरू जॅकेट’ असं ट्रेडमार्क बनत गेला. 

आणि नेहरू जॅकेट हळूहळू फॉर्मल ड्रेसिंगशी जोडले गेले…अजूनही नेते नेहरू जॅकेट ला पसंती देतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, १९६० च्या दशकात लंडनच्या फॅशनमध्ये बदल घडू लागले. तिथे शतकानुशतके जुने गडद सूट लोकांना आवडत नव्हते. लोकांना रंगीबेरंगी लेपल्स, कॉलर आणि टाय स्वीकारले जाऊ लागले. याला त्या काळात ‘पिकॉक रिव्होल्यूशन’ संबोधलं जायचं. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.