स्वतःला पांडवांचा वंशज म्हणवला जाणारा समाज काट्यावर झोपून सत्त्वपरीक्षा देतो

भारत हा वेेगवेगळ्या जाती धर्मानं, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरेनं नटलेला देश. त्यामुळे इथं कुठल्याही भागात गेलं की, त्या ठिकाणची अनोखी प्रथा ही आपल्याला पाहायला मिळेलचं.

अशीच एक आगळी वेगळी प्रथा आहे मध्यप्रदेशातल्या बैतुल जिल्ह्यातील सेहरा गावातली. या गावात मार्गशीर्ष महिन्यात रज्जड समाजाचे लोक एक प्रथा पाळतात, जी कित्येक वर्षांपासून चालत आलीये. ही प्रथा म्हणजे काट्यावर झोपण्याची.

चाट पडलात ना, पण हो हे खरयं भिडू. स्वत:ला पांडवांचे वंशज समजणारे या समाजातील लोक काट्यावर पडून एक प्रकारची सत्वपरीक्षा देतात आणि वर्षानुवर्षे ही परंपरा पाळत आहेत.

तिथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, बहिणीच्या निरोपासाठी हा एक सण असतो. ज्यावेळी या समाजातील लोक नाचतात, गातात आणि नंतर काट्याचा ढिगारा लावून काही लोकं त्यावर झोपतात. आपली ही सत्वपरिक्षा असल्याचं ते सांगतात.

या प्रथेमागे एक कथा सांगितली जाते की, एकदा पांडव पाण्यासाठी भटकत होते. बर्‍याच दिवसांनी त्यांना नहाल समाजातील एक माणूस दिसला. पांडवांनी त्याला विचारले की, या जंगलात पाणी कुठे मिळेल. पाण्याच ठिकाणं सांगण्यापूर्वी नहालने पांडवांसमोर एक अट घातली की, पाण्याचं ठिकाणं सांगितल्यावर बहिणीचे लग्न आपल्याशी लावावे लागेल.

पांडवांना बहीण नव्हती, पण पांडवांनी भोंदई नावाच्या मुलीला आपली बहीण म्हणून मानले आणि प्रथेनुसार तिचे लग्न नहालशी केले. पण बहिणीला निरोप देताना, नहालने पांडवांना काट्यावर झोपून आपल्या सत्यतेची परिक्षा द्यायला सांगितल. यावर सगळ्या पांडव एकामागून एक काट्यांवर उडी मारली आणि आनंदाने आपल्या बहिणीला नहालसह निरोप दिला.

त्यामुळे रज्जड समाजाचे लोक स्वतःला पांडवांचे वंशज म्हणून घेतात आणि काट्यावर पडून परीक्षा घेतात. कित्येक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा समाजातील लोक आजही उत्साहाचे पार पाडतात. अशी पद्धतीने ते आपल्या बहिनीला आनंदाने निरोप देतात.

असे केल्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात. पाच दिवसाच्या सणानंतर शेवटच्या दिवशी पूजा केल्यानंतर रज्जड समाजाचे लोक काट्याची झुडूप आणतात आणि नंतर त्या झुडपांची पूजा केली जाते. यानंतर एक एक करून लोकं या काट्यांवर उघड्या अंगाने उडी घेतात.

आता मध्यप्रदेशचं नाही तर आपल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या गुळुंजे गावात सुद्धा अशा प्रकारची काट्यावर उडी मारण्याची प्रथा आहे.

गावात काटेबारस यात्रा भरते, या यात्रेत लोक हर हर महादेवाच्या गजरासोबत गावकरी या काट्यात उड्या घेतात, तिथल्या प्रथेप्रमाणे जेव्हा शंकर भगवानांची बहिण त्यांचावर रुसली होती, तेव्हा तिला मनवण्यासाठी शंकरांनी 12 वेगवेगळी रूपं धारणं केली, शेवटी जेव्हा बहिणीचा रूसवा गेला, तेव्हा तिला परत आणताना शंकरांच्या मनात खदखद होती की, आपल्यामुळे आपली बहिण रुसली त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून भगवान शंकरानी काट्यात उडी मारली.

हीच प्रथा या गावात कित्येक वर्षांपासून सुरू आहे. वर्षभर कुजत ठेवलेल्या काट्यांवर इथली ग्रामस्थ मंडळी उडी घेतात. या गावच्या यात्रेची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात असते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.