हिंदूंसाठी पवित्र असलेल्या स्वस्तिकला हिटलरनं ज्यू द्वेषाचं, हिंसेचं सिम्बॉल असं बनवलं

आपल्या घराची वास्तुशांती असू द्या की त्यानंतरची घरातली कोणतं मंगल कार्य भटजी कुंकवाचा स्वस्तिक हमखास काढतात. त्यामुळं सुरवातीला स्वस्तिक म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट असंच वाटायचं. पण मनातली स्वस्तिकची ही प्रतिमा टिकली इतिहासाच्या पुस्तकात हिटलरचा धडा येईपर्यंत. हिटलरने केलेला ज्युंवरील अत्याचार, त्यासाठी जर्मन लोकांना एकत्र करण्यासाठी त्यानं वापरलेला स्वस्तिकचं चिन्ह असेलला झेंडा यामुळं स्वस्तिकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.

अजूनही ज्यू द्वेष करणाऱ्यांचा, अमेरिकेतील व्हाईट सुपरमसिस्टचा सिम्बॉल स्वस्तिकच असल्याच्या बातम्या बाहेर येत असतात. त्यामुळे ठिकठिकाणी या फॅसिस्ट विचारधारेच्या स्वास्तिकवार बॅन करण्यात असल्याच्या बातम्या देखील येत असतात.

आताही 11 ऑगस्टला ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स या राज्याने स्वस्तिक प्रदर्शनाला  गुन्हा ठरवणार कायदा पास केला आहे.

यातून हिंदू, जैन आणि बौद्धांसाठी शैक्षणिक आणि धार्मिक हेतूंसाठी त्याचा वापर करण्यास परवानगी मात्र देण्यात आली आहे. याआधी व्हिक्टोरिया राज्यातही स्वस्तिकाला बॅन करण्यात आलं होतं. वेस्टर्न देशांमध्ये स्वस्तिकाला हिटलरच्या विचारधारेशी जोडून पाहिलं जात असल्याने अशाप्रकारची पावलं उचलली जातात.

पण आपल्या भारतात मात्र सिन वेगळा आहे.

संस्कृत भाषेत स्वस्तिकच अर्थ “कल्याण” असा होतो. हे चिन्ह हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांनी हजारो वर्षांपासून वापरले आहे. भारतीय संस्कृतीत स्वस्तिक आजही मांगल्याचं शुभ प्रतीक मानलं जातं. त्यामुळं आपलं नवीन घर ,गाड्या यांवर आपण स्वस्तिक हमखास काढतो.

जगातही हिटलरचं स्वस्तिक येयाच्या आधी स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीतील एक शुभ चिन्ह असल्याचीच प्रतिमा होती. त्यामुळं वेस्टर्न जगाला जेव्हा हे चिन्ह माहित पडलं तेव्हा त्यांनीही सुरवातीला याला लकी चार्म म्हणून वापरण्यास सुरवात केली.

‘द स्वस्तिक: सिम्बॉल बियॉंड रिडेम्पशन?’ या पुस्तकात स्टीव्हन हेलर यांनी स्वस्तिक वेगवेगळ्या प्रोडक्क्टच्या जाहिरातींमध्ये, डिझाइनमध्ये कंपन्यांनी स्वस्तिकाचा वापर केल्याची उदाहरणं दिली आहेत. यामध्ये कोका-कोला, कार्ल्सबर्ग बियर ते तंबाखू आणि बिस्किट ब्रँड्सचा देखील समावेश होता.

मात्र स्वस्तिकची ही प्रतिमा बदलली जेव्हा हिटलरनं नाझी सैन्याच्या झेंड्यात स्वस्तिकाचा वापर केला.

जेव्हा जर्मनीमध्ये नाझी पक्षाचा उदय होत होता तेव्हा हिटलर या पक्षासाठी एका ध्वजाच्या शोधात होता. नाझी चळवळीचं प्रतिनिधित्व करेल, पक्षाला एक ओळख देईल आणि त्याचबरोबर लोकांच्या मनात भरेल असा ध्वज त्याला निर्माण करायचा होता.

हा शोध चालू असताना त्याने स्वस्तिक चिन्हाला घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने ४५ अंशात फिरवलं आणि स्वस्तिक म्हणजेच hakenkreuz हे नाझी पक्षाचं प्रतीक म्हणून घोषित केलं.

१९२० मध्ये स्वस्तिक म्हणजेच hakenkreuz ला हिटलटरने नाझी पक्षाचं चिन्ह म्हणून ऑफिशियली  स्वीकारलं.

याबद्दल मायन काम्फ या आपल्या आत्मचरित्रात हिटलर लिहतो की त्याने हे काळ्या रंगातील स्वस्तिक हे चिन्ह पांढऱ्या सर्कलवर सेट केलं आणि हे प्रतीक त्याने लाल झेंडयावर लावलं. त्याच्या या झेंड्यातील लाल, पांढरा आणि काळा रंग जर्मन साम्राज्याच्या झेंड्यापासून प्रेरणा घेऊन निवडण्यात आले होते. पहिल्या विश्वयुद्धात पराभव झाल्यानंतर जर्मन साम्राज्य खालसा करण्यात आलं होतं.

मात्र हिटलरनं स्वस्तिक निवडण्यालाही एक कारण होतं.सर्वात प्राचीन स्वस्तिक सध्याच्या युक्रेनमध्ये इसवीसनाच्या 10,000 वर्षांपूर्वी हस्तिदंतावर कोरण्यात आलेला सापडतो. मात्र हिटलरला स्वस्तिक माहित होण्याचं कनेक्शन जातं जर्मन पुरातत्वशास्त्रज्ञ हेनरिक श्लीमन याला आधी तुर्कीमध्ये आणि नंतर जर्मनीमध्ये उत्खननात मोठ्या प्रमाणात सापडलेल्या स्वस्तिक चिन्हांना.

एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राचीन चिन्ह सापडल्यानंतर श्लीमनने स्वस्तिकाला “आमच्या पूर्वजांचे महत्त्वपूर्ण धार्मिक प्रतीक” म्हणून घोषित करून टाकलं. 

श्लीमनच्या या शोधामुळे १९ व्या शतकातील युरोपमधील स्कॉलर्सनी असा युक्तिवाद करण्यास सुरवात केली की स्वस्तिक हे आर्यन वंशाचे चिन्ह आहे ज्यांनी  इतर वंशापासून स्वतःला जपत आपली वांशिक शुद्धता जपली.

हिट्लरलने नेमकं हेच हेरलं. त्याची फॅसिस्ट विचारधारा ही वंश शुद्धतेच्या सिद्धांतावरच आधारित होती. नाझी विचारधारेनुसार जर्मन लोक आर्यन्सच्या  “मास्टर रेस” चे थेट वंशज होते आणि म्हणूनच त्यांचा वंश सर्वात श्रेष्ठ आहे आणि हि वांशिक शुद्धता राखणे जर्मन लोकांचे कर्तव्य आहे. यासाठी जे दुय्यम वंशाचे लोक आहेत त्यांना जगातून संपवले पाहिजे असे हिटलरचे विचार होते आणि त्यासाठी त्याला स्वस्तिकच्या रूपाने एक परफेक्ट सिम्बॉल मिळाला होता.

होलोकॉस्ट (1941-1945) दरम्यान नाझी जर्मनीने अंदाजे ६० लाख  युरोपियन ज्यूंची हत्या केली.

ज्यू धर्मीय जर्मन आर्य वंशीयांना दूषित करत असल्याचा तो विचार मांडत होता. याचबरोबर त्याने इतर ५० लाख लोकांची देखील कत्तल केली यामध्ये रोमानी वंशाचे लोक, स्लाव्हिक वंशाचे लोक, समलैंगिक, विकलांग, कम्युनिस्ट, समाजवादी, युद्धकैदी यांचा समावेश होता आणि मानवतेला काळिमा फासणारे भयानक गुन्हे घडले होते स्वस्तिकच्या ध्वजाखाली.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.