प्राणी पण गे, लेस्बियन असतात होय ?

 ‘बर्ड्स डू इट, बीज़ डू इट… लेट्स डू इट, लेट्स फॉल इन लव…’

आता म्हणाल हे काय आणि…तर विसाव्या शतकात एक प्रसिद्ध अमेरिकन संगीतकार होऊन गेला. त्याच नावं कोल पोर्टर. त्यानं एक फेमस गाणं रचलं. म्हणजे गाणं रचल्यावर फेमस झालं. त्यात तो म्हणतोय पक्षी करतायत, मधमाश्या करतायत, चला आपण पण करूया.

आता काय करूया हे विचारू नगासा.. वाचा आणि करू वाटलं तर करा. 

आधी हे गाणं का फेमस आहे ते बघूया,

हे गाणं गेली काही वर्षांपासून एलजीबीटीक्यू (लेस्बियन-गे-उभयलिंगी-ट्रान्सजेंडर-क्यूअर) कम्युनिटीचं गाणं बनलं आहे. कोल पोर्टरने प्रेमाच्या रंगाखातर हे गाणे लिहिल असलं तरी त्याचा अर्थ स्पष्टपणे सांगण कठीण आहे कारण यात प्राणी आहेत.

पण त्याच्या या गाण्यामुळं असं वाटतंय की प्राणी पण गे, लेस्बियन असतात. या गाण्याचा अर्थ लावायला गेलं तर बघा ना तसाच लागतोय. मग म्हंटल चला शोधूया, प्राणी पण एलजीबीटीक्यू असतात का ? तर शेवटी सापडलंच.   

ऑस्ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते प्राणीशास्त्रज्ञ कोनराड लोरेन्झ यांनी १९५०-६० च्या दशकात जवळपास दीड हजार प्रजातींच्या प्राण्यांवर अनेक संशोधन केले. त्याच्या संशोधनात असं दिसून आलं आहे की सुमारे ४५० प्रजाती समलैंगिक आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉ. नॅथन बेली यांनी २००४-०५ मध्ये प्रकाशित केलेल्या एका पेपरमध्ये पण अशीच काहीशी माहिती दिली आहे.

या संशोधनात त्यांनी सूचित केले की, समलैंगिक वर्तन प्रत्येक जातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसून येत. या पद्धती मुले वाढवण्याच्या बाबतीत, एकत्र राहून विपरीत लिंगाचा साथीदार शोधण्याच्या बाबतीत भिन्न आहेत.

उदाहरणार्थ, नर डॉल्फिन्स आपल्या मनाने इतर नर डॉल्फिन्सशी सेक्स करतात. आणि फक्त इतर डॉल्फिन मासे जन्माला घालण्यासाठी मादी डॉल्फिनच्या संपर्कात येतात. तसं ही जन्माला आलेले मासे वाढवणं ही सहसा त्यांची जबाबदारी नसते. दुसरीकडे, जर आपण माशीसारख्या छोट्या प्रजातींबद्दल बोलायला गेलं तर समोरच्या माशीचं लिंग ओळखू न शकल्यामुळे नर माशी कधीकधी इतर नर माशी बरोबर समलैंगिक संबंध ठेवतात.

हंसांच्या काही प्रजातींमध्ये, जसं की कॅनडियन गीज सारख्या हंसांच्या काही प्रजातींमध्ये नर हंस आयुष्यभर फक्त एकाच (नर) पार्टनर बरोबर राहतो. हे गीज हंस फक्त पिल्लांना जन्म देण्यासाठी मादी हंसाच्या संपर्कात येतात. नंतर स्वतः मादी हंस ही पिलं घेऊन लांब जाते. आता या हंसांबद्दलची भारी गोष्ट म्हणजे या समलिंगी नरांच्या जोडीतला एकच नर या मादीशी सेक्स करतो. आणि आकडेवारीनुसार गीज हंसांमधले एक तृतीयांश नर समलैंगिक असतात.

आता नंबर लागतो जिराफांचा. जवळजवळ दहा पैकी नऊ जिराफ नर समलैंगिक असतात. चिंपांझीच्या एका जातीमध्ये, बोनोबो असं त्यांचं नाव आहे. त्याचे सुमारे साठ टक्के सदस्य समलैंगिक आहेत. त्यांच्यामध्ये दोन स्त्रियांमध्ये एक जोडीदार असतो.

सिंह, हायना, लंगूर, मेंढी यासारख्या प्राण्यांमध्येही काही समलैंगिक प्राणी आढळतात. प्राण्यांव्यतिरिक्त, काळा हंस, पेंग्विन, बाबून्स (वेस्टर्न सीगल्स) सारखे काही पक्षी, सरड्यांसारखे किडे, माशी, पाली हे सगळेच समलैंगिक वर्तन करतात.

या सर्व प्राण्यांपैकी केवळ मेंढ्या आणि माणूस हे दोन असे प्राणी आहेत की जर एकदा का त्यांनी  समलैंगिक पार्टनर मध्ये इंटरेस्ट घेतला तर ते भिन्न लिंगाच्या जोडीदारामध्ये रस घेत नाहीत. पण बाकीचे सगळे प्राणी दोन्हींमध्ये इंट्रेस्ट दाखवतात.

प्राण्यांच्या सेक्शुएलिटीमुळे भलेही  मानवी समाजावर काही परिणाम होत नसेल, परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की समलैंगिक संबंध फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्ये ही आढळतात. आणि विशेष म्हणजे या अनैसर्गिक कृतीला निदान प्राण्यांकडे बघून तरी नैसर्गिक म्हणायला हरकत नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.