भावांनो अंतराळात सेक्स कसं करत असतील ?

दोन X’YZ‘ सायंटिस्ट होण्याचं, नासात जाऊन अंतराळात जाण्याचं स्वप्न बघणारी पोरं पारावर बसली होती. गप्पा मारता मारता ते सेक्सवर बोलायला लागले. त्यातला एकजण दुसऱ्या पोराला म्हणतो, काय रे तू व्हर्जिन आहेस का ?

त्यावर तो दुसरा म्हणतो, नाही रे बेन्या. आत्ताच लग्न झालंय माझं. 

त्यावर पहिला म्हणतो, अरे भावड्या लग्न झालंय तर स्पेस मध्ये कशाला चाल्लायस. तिथं बायकोला नेता येत नाही, ना सेक्स करता येत ? 

आणि या गोष्टीतून बोध घेत, त्या दुसऱ्या YZ ने एक रिसर्च केला, म्हणजेच तुमच्या आमच्यासाठीची गोष्ट लिहिली. ती म्हणजे अंतराळात सेक्स कस करत असतील ? 

तर भावड्या लिहितो,

ज्या गोष्टी तुम्हाला पृथ्वीवर सोप्प्या वाटतात त्या गोष्टी अंतराळात खूप वेगळ्या असता. सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कसरत करावी लागते. चालणं असो खाणं, पिणं यासाठी तुम्हाला ट्रेनींग घ्यावं लागत. जर एखाद्याला स्पेस मध्ये जायचं असेल त्याला या गोष्टींचं ट्रेनींग दिलं जात. पण या स्पेस सेंटर मध्ये अंतराळात सेक्स कस करावं याच ट्रेनींग ते देत नाहीत.

कारण अंतराळात ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हवा उपलब्ध नसल्यामुळे, सर्व काही अधांतरी तरंगत असतं. 

आता स्पेस मध्ये कोणी सेक्स केलंय का याच उत्तर मी युट्यूब च्या दुनियेत शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण अंतराळवीरांच्या प्रत्येक व्हिडिओतत्यांचं उत्तर नाहीच आहे. सेक्स नैसर्गिक गोष्ट आहे भाऊ, त्यावर का इतकं लाजायचं ? आणि ते पण फॉरेन मध्ये जन्मलेल्यांनी ?

इव्हन नासा पण असं काही झालं नसल्याचं सांगते. अंतराळात जेवढे प्रयोग झाले आहेत का, ते सगळे प्राण्यांवर करण्यात आले आहेत, माणसांवर नाही. असं ही पुढं ते म्हणतात.

पण नासात एक सीनियर बायोएथिस्ट आहेत. पॉल रूट वोल्पे असं त्यांचं नाव. ते म्हणतात,

जर आपल्याला जास्त काळासाठी अंतराळात राहायचं असेल तर अंतराळातील सेक्शुएलिटीबाबत अधिक विचार करणं गरजेचं आहे.

कारण माणसाच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी सेक्स किंवा हस्तमैथुन गरजेचं आहे. प्रोटेस्टमध्ये बॅक्टेरिया राहू नये म्हणून पुरूषांचं वीर्यस्खलन गरजेचं आहे. आणि विषय जेव्हा सेक्सचा येतो तेव्हा, सेक्सच्या माध्यमातून मिळणारा ऑर्गाझम, म्हणजेच अत्युच्च आनंद हा आपल्यावरील ताण आणि चिंता दूर करण्यास मदत करतो. अंतराळातील तणावपूर्ण वातावरणात, तर ताण दूर होण्यासाठी याची भरपूर मदत होऊ शकते.

पण पुन्हा प्रश्न राहतो, तो म्हणजे स्पेसमध्ये कधी कोणी सेक्स केलयं का?

आता वर सांगितलंयच तुम्हाला की, नासाने सुद्धा ऑफिशियली, तसं काही झालं नसल्याचं सांगितलंय. पण स्पेस मध्ये अशा दोन मोहीमा पार पडल्या ज्यात सेक्स झाला असल्याचे चान्सेस आहेत.

यातली पहिली मोहीम १९८२ मध्ये पार पडली. रशियाची अंतराळवीर स्वेतलाना सावित्सकाया हि सोयूज टी-७ या अंतराळ मोहिमेत दोन पुरुषांबरोबर गेली होती. स्त्री आणि पुरुष एकत्र अंतराळात जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

यावर जर्मन अंतराळवीर उलरिश वॉल्टरआपल्या पुस्तकात लिहितात, की स्पेस मध्ये सेक्श्युअल इन्फेक्शन कस होत याबाबत विचार करूनच ही मोहीम आखण्यात आली होती.

त्यानंतर १९९२ मध्ये एका मोहिमेमध्ये अंतराळवीरांनी सेक्स केल्याचं म्हटलं जातं. त्याचं नाव मार्क ली आणि जेन डेविस. खरं तर या दोघांची भेट नासामध्येच झाली होती. या मोहिमेच्या एका वर्षापूर्वीच या दोघांनी गुपचुप लगीनगाठ बांधली होती. त्यामुळं त्यांची स्पेस सफर ही त्यांच्यासाठी हनीमूनप्रमाणेच होती.

आता लास्टचा प्रश्न पडतो तो म्हणजे, स्पेसमध्ये सेक्स करायचं कस ? 

खरं तर हा प्रश्न योग्यच आहे, कारण पृथ्वीवरच मिषनरी पोजिशन मध्ये जमिनीवर सेक्स करणं इतकं अवघड असतं की, गुढघे रुततात. आता स्पेस मध्ये पृथ्वीपेक्षा वेगळं वातावरण आहे. तिथं तर गुढगे फोल्ड करणंच अवघड असत.

पण स्पेसमध्ये गेलं की सेक्सची इच्छाच राहत नाही. असं म्हणतायत स्पेसची वारी करून आलेले अंतराळवीर. ते म्हणतात की,

स्पेस मध्ये गेल्यावर मायक्रोग्रॅव्हिटीमुळे शरीरात बरेच हॉर्मोनल बदल होतात. यामुळे सेक्सची इच्छा कमी होऊन जाते. पण हे फक्त पुरूषांच्या बाबतीत घडत. म्हणजे अंतराळात गेल्यावर ब्लड सर्क्युलेशन मध्ये फरक पडतो आणि पुरुषांच्या पेनीस मध्ये इरेक्शन येत नाही.

पण सारालिन मार्क हे अंतराळवीराने म्हणतात, तस काही होत नाही. कदाचित त्यांनी प्रयोग केला असावा. पण सांगायला लाजत असतील. ते म्हणतात, मायक्रोग्रॅव्हिटीचा पेनिसच्या इरेक्शनवर परिणाम होत नाही.

आता महिलांच्या बाबतीत काय होत ? 

एकतर स्पेसमध्ये जाणाऱ्या महिलांचं प्रमाण केवळ आणि केवळ ११ टक्के आहे. त्यात आणि स्पेस मध्ये परियड्स येऊ नये म्हणून महिला अंतराळवीर परियड्स न येण्याच्या गोळ्या घेतात. त्यामुळे त्यांच्यातील हॉर्मोनल बदल हा अंतराळात गेल्यामुळे आहे, की या गोळ्यांमुळे हे ओळखणं कठीण असतं.

आता हा झाला वैज्ञानिक फंडा. पण जगात खरंच कोणाला माहिती नाही की, स्पेसमध्ये खरंच सेक्स करावं वाटत का ? करताना कम्फर्टेबल व्हायला होत का ? आणि अंतराळवीराची जर कधी सेक्स करण्याची इच्छा आणि तयारी झालीच तर कसं करता येईल ?

तर यावर वॉल्टर म्हणतात, समुद्रात डॉल्फिन्स ज्याप्रमाणे तिसऱ्या एका साथीदाराची मदत घेऊन सेक्स करतात, तसं अंतराळवीर करू शकतात.

पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा स्पेस मध्ये जाऊनच या आणि कस करत्यात ते बघून अनुभव घेऊनच या. आणि आम्हाला तुमचा अनुभव कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. 

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. TrendingMarathi says

    मग नको बाबा ते स्पेस आपलं पृथ्वीवरच ठीक आहे..😂

  2. Vaibhav says

    are Bapre… avghd ahe nice info…Baki tumchya topic choice la salam..;-)

Leave A Reply

Your email address will not be published.