धम्मचक्र प्रवर्तन दिवस कसा साजरा करण्यात येतो ; या दिवसाचं महत्व काय ?

 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षा भूमी येथे लाखो बौद्ध अनुयायी जमत असतात. यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येणार आहेत. दीक्षाभूमीवर साजरा होणारा या वर्षीचा हा ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. 

धम्मचक्र प्रवर्तन दिन कसा साजरा करण्यात येतो त्यांचे महत्व काय आहे?      

बौद्ध धर्मीयांसाठी १४ ऑक्टोबर महत्वाचा समजला जातो. याच कारण म्हणजे बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर पूज्य महास्थविर चंद्रमणी याच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्याने १४ ऑक्टोबर या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर५ लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.

या घटनेला ऐतिहासिक महत्व आहे. याचा उल्लेख धम्मक्रांती दिन असा सुद्धा करतात. 

धम्मदीक्षा दिनाच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी नागपूरच्या दिक्षा भूमीवर जमत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लाखो बौद्ध अनुयायी जमत असतात. तसेच देश –विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक यावेळी दीक्षाभूमीवर येत असतात.

१९५७ पासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.  २००६ साल हे धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्यामुळे या सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा जास्त अनुयायांची उपस्थिती राहिले होते. 

धम्मचक्र प्रवर्तन दिवस कसा साजरा केला जातो ?

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या २ ते ३ दिवस आगोदरच बौद्ध अनुयायी दीक्षा भूमी येथे जमते. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा सुद्धा २ ऑक्टोबर कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवचन, बौद्ध दीक्षा देण्याचा सोहळा, धम्मपरिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.  धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सुरुवात बुद्ध वंदने पासून करण्यात येते. यानंतर दीक्षा भूमीतील बौद्ध मूर्तीला अनुयायी वंदन करतात. 

गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या पिंपळाची एक फांदी दीक्षाभूमी येथे लावण्यात आली होती. त्याचे आता झाड झाले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करत असतात. 

 याबाबत बोल भिडूशी बोलतांना केशव वाघमारे यांनी सांगितले, 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जगभरातून अनुयायी येत असतात. इथे आल्यावर मुक्तीची फिलिंग येते. हजरो वर्षांपासून जे भोगावं लागलं लहाल होते ते या दिवशी आम्ही मुक्त झालो अशी भावना असते. अनेकांना नवीन चेतना मिळते. त्रिशरण व पंचशील पाळण्याबद्दल अनुयायांना प्रोत्साहन मिळत. 

साध्या साध्या गोष्टी कानावर पडल्याने अनेकांच्या वागण्यात बोलण्यात बदल घडून येतो. सामूहिक चेतना जागृत होते. त्यामुळे लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर जमत असतात.  महत्वाचं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दीना निम्मित येणारे अनुयायी मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करतात. अशी माहिती वाघमारे यांनी दिली  

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली ती तारीख १४ ऑक्टोबर १९५६ होती. त्या दिवशी दसरा होता. त्यामुळे धम्म दिन १४ ऑक्टोबर रोजी साजरा करायचा की दसऱ्याला यावर अनेक वर्ष चर्चा सुरु आहे. 

 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.