पैशाच्या नादात केलेली घाई नडली अन् फूडपांडाचा बाजार उठला

ऑनलाईन फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये अनेक प्लेअर एंट्री मारत होते. त्यामध्ये एक नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल ते म्हणजे फूड पांडा . याच्या हटके नावानं फेमस झालेल्या फूडपांडानं सुरवातीला जबरदस्त डिसकाऊन्ट दिलं होतं. खोटं सांगत नाही सुरवातीला प्रोमो कोड शोधून शोधून मित्रांना रेफर करून अवघ्या दहा -बारा रुपयात पार्सल मागवली होती. पण नंतर स्वीगी आणि झोमॅटो आल्यांनतर हा ब्रँड कुठं गेला कळलंच नाही. परवा झोमॅटोवरनं ऑर्डर केलेल्या एका पार्सलला फूडपांडाची चिकटपट्टी होती. त्यामुळं जेवण जेवत मोबाइल स्क्रोल करताना फूडपांडा कुठं गेलं त्याचं हे उत्तर मिळालं.

तर फूडपांडा चालू झालं होतं जर्मनीच्या बर्लिनमध्ये.

याचे जवळपास ४ते ५ फाऊंडर होते त्यात रोहित चड्डा नावाचा एक भारतीय पण होता.जर्मनीत ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा एक प्रोटोटाईप त्यांनी बनवला आणि मार्केटमध्ये उतरले. आपल्या विशीत असणारी या पोरांची बिझनेस आयडिया होती विकसित देशात फूड डीलिव्हरी  बिझनेसमध्ये लवकर उतरून प्रॉफिट कमवायचा. त्याची त्यांना प्रचंड घाई होती.

त्यामुळं ॲपच्या डेव्हलपमेंटकडे जास्त लक्ष न देताच त्यांनी आपला प्लॅन इन्व्हेस्टरना सांगितला.

इन्व्हेस्टअर्सनी पण मग फूडपांडामध्ये १००मिलियनची गुंतवणूक केली.आता पैसे आल्यावर या कंपनीनं मग बाहेरच्या देशात पसरायला सुरवात केली. पण आता त्यांनी आपली स्टॅटेजि बदलली. ज्या देशात हे उतरायची त्या देशातील फूड डिलिव्हरीच्या कंपन्या ते विकत घ्यायचे. म्हणजे पाकिस्तानात उतारल्यानंतर त्यांनी ईट-ओये या कंपनीला विकत घेतलं आणि त्याची जी ऑलरेडी  सिस्टिम होती तीच वापरायाची.

२०१५मध्ये भारतात आल्यावरही त्यांनी टेस्टी खाना, जस्ट ईट या कंपन्या विकत घेतल्या आणि काम चालू केलं.

मग या आयत्या सिस्टिमवर त्यांनी कस्टमर बेस वाढवायला सुरवात केल. त्यासाठी त्यांनी बरीच कॅश बर्न केली. म्हणजे आपल्याला डिस्काउंट देण्यात बरेच पैसे घातले.मात्र त्यावेळी मार्केटमध्ये बरेच प्लेअर आले होते.

फूडपांडाला त्यांच्याशी स्पर्धा कडून मार्केट वाढवायचं होतं.

सुरवातीला मार्केट वाढलं पण त्या ऑर्डर मॅनेज करताना त्यांना अवघड झालं होतं. विशेषतः भारतात जेव्हा दिवसाला १-२लाखांच्या घरात ऑर्डर येऊ लागल्या तेव्हा फूडपांडाची सिस्टिम कोसळून पडायला लागली. ऑर्डर रेस्टारंट पर्यंत पोहोचण्यात उशीर होत होता त्यामुळं कस्टमरपर्यंतही ऑर्डर उशीरा होत होती.  मग कस्टमर्सचे रेटिंग ॲपची लोकप्रियता कमी करत होते. आणि परीणामी ॲपचा बिझनेस कमी होत होता.

अनेक डिलिव्हरी पार्टनर्स आणि हॉटेल्सची बिलही थकत होती. तसेच लॉस भरून काढण्यासाठी फूडपांडा हॉटेलकडून कमिशन पण वाढवत होतं. हे सगळं झालं होतं फाउंडर्सनी सुरवातीला केलेल्या चुकांमुळे. मात्र गुंतवणूकदारांना कंपनी विकून ॲपचे फाउंडर कधीच मोकळे झाले होते. रॉकेट इंटरनेट आणि डिलिव्हरी हिरो यांना इन्व्हेस्टर कंपन्यांना फूडपांडा  काय सुधारता आला नाही. मग पुढे ओला ने ही कंपनी विकत घेतली ,त्याचं रेंब्रांडिंग केलं, फूडपांडाचा लोगो पिंक केला. पण फूडपांडा काय चालायचं नाव घेईना आणि शेवटी ओलाने फूडपांडाचं ऑपरेशन बंद केलं. 

शॉर्टस्टोरी काय तर बेसीकमध्येच असलेल्या लोच्यामुळे कंपनी फूडपांडा गंडली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.