राजस्थानमधल्या एका केसमध्ये नाव सापडलं.. आणि पुणे पोलिसांनी शिताफीनं पुढचा प्लॅन आखला..

पंजाबी गायक सिद्धूची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई मुख्य आरोपी असल्याचे सांगत त्याची कस्टडी घेतली होती. त्यानंतर हत्या करणाऱ्या ८ शार्प शुटरचे नाव समोर आले होते. 

यातील २ जण पुण्याचे असल्याचे सांगण्यात आले. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ असे या दोघांचे नाव सांगण्यात आले होते.   

मंचर येथील गुंड ओंकार उर्फ राण्या बालखेले याचा ऑगस्ट २०२१ मध्ये खून करण्यात आला होता. प्रकरणात संतोष जाधव हा एक वर्षांपासून फरार होते. त्यामुळे संतोष संदर्भात पोलिसांना माहिती होते. मूसेवाला प्रकरणात संतोष जाधव हा शुटर असल्याचा संशय पंजाब पोलिसांना व्यक्त केला होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होता. त्याच बरोबर सौरभ महाकाळचे नाव सुद्धा घेण्यात येत होते. 

मात्र, पुणे आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सौरभ महाकाल नावाची कुठलीच व्यक्ती नसल्याचे समजले. त्याच्यावर यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे पोलिसांकडे त्याचे क्राईम रेकॉर्ड नव्हते. त्यामुळे पोलीस तपास करतांना सुद्धा कंफ्युज होते.

मुसेवाला हत्या प्रकरणात मीडियातून सतत दोन नवे घेण्यात येत होती. ते म्हणजे संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ. त्यानंतर सौरभ महाकाळ नावाची व्यक्ती पुण्यातल्या कुठल्या गावात राहते का किंवा राहायला होती का हा तपास पोलिसांनी सुरु केला. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात शोध घेतला. मात्र, त्यांच्या हाती काहीच आले नाही. 

शेवटी नॅशनल क्राईम ब्युरोच्या क्राईम नेटवर्क सर्च मध्ये राजस्थान मध्ये सौरभ महाकाळ व्यक्तीच्या नावावर एक गुन्हा दाखल असल्याचे आढळले होते. पुणे पोलिसांनी ही माहिती राजस्थान पोलिसांकडून मागवून घेतली. त्यात वेगळेच सत्य समोर आले.

सौरभ महाकाळचे खरे नाव सिद्धार्थ कांबळे असल्याचे समजले होते.

तिकडच्या गुन्हेगारी विश्वात त्याला सौरभ महाकाळ म्हणून ओळखत असल्याचे समजले होते. सौरभ महाकाळ मूळचा पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील उत्तरमळा या गावचा रहिवासी असल्याचे कळालं. त्याचे वडील रिक्षाचालक आहे तर आईचे यापूर्वीच निधन झालेले आहे.

राजस्थान पोलीस, पंजबा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर शोधून काढला. यावेळी पुणे पोलिसांना एक भारी टीप मिळाली. सौरभ महाकाळ हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीत असून तो घरच्यांना भेटून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले होते. 

पुणे ग्रामीण ट्रॅप लावून सौरभ महाकाळला संगमनेर येथे ७ जूनला अटक केली. महाकाळला अटक करून न्यायालयात हजर केले असता २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

यानंतर पंजाब पोलिसांचे एक पथक पुण्यात आले होते. त्यांनी महाकालची चौकशी केली.

महाकाळ हा संतोष जाधव सोबत राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात फिरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. तसेच पोलीस कस्टडी दरम्यान संतोष जाधव हा गुजरात मधील त्याचा मित्र नवनाथ सूर्यवंशी यांच्याकडे लपून बसल्याचे महाकाळाने सांगितले. 

नवनाथ सूर्यवंशी गुजरात मधील भुज जिल्ह्यातील मांडवी येथे राहत असल्याचे समजले होते.

नवनाथ हा आपल्या वडिलांसोबत मागच्या काही वर्षांपासून कामानिमित्त गुजरात मध्ये राहत होता. नवनाथ आणि संतोष एकमेकांना ओळखत होते. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मांडवीला जात नवनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतंल.

त्याच्याकडे संतोष जाधव कुठे लपून बसला याची चौकशी केली. त्याने आपल्याला संतोष बद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच, संतोष जाधवचा ठिकाणा सांगितला. 

नवनाथाने संतोष हा मांडावी तालुक्यातील नागोर येथे एका ठिकाणी ठेवल्याचे सांगितले. संतोषच्या जेवणाची आणि राहण्याची सगळी सोय नवनाथ केली होती. तसेच त्याला स्वतःचे सिमकार्ड वापरायला दिल्याचे नवनाथ याने पोलीस चौकशी दरम्यान सांगितले.   

संतोषने आपली ओळख लपविण्यासाठी टक्कल केलं होत 

सिद्धू मुसावाला खून प्रकरणात बातम्यात नाव आल्यानंतर त्याने आपली ओळख लपविण्यासाठी टक्कल केलं होत आणि पेहरावात बदल केला होता. संतोष जाधव हा गवळी गॅंगचा सदस्य असल्याचे सुद्धा सांगण्यात आले होते. 

राण्या बालखेलेचा खून केल्यानंतर संतोष जाधव फरार झाला होता. पुणे पोलिसांपासून वाचण्यासाठी तो हरियाणा, राजस्थान, पंजाब भागात फिरत होता. त्याच्या सोबत सौरभ महाकाळ सुद्धा होता. राजस्थान मध्ये फिरतांना संतोष जाधवचा संपर्क गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गॅंगशी आला होता. यानंतर गेले वर्षभर संतोष जाधव आणि लॉरेन्स बिष्णोई हे दोघे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते असे सांगण्यात येत आहे. 

सौरभ महाकाल याने सिद्धू मुसेवाला यांच्या घराची रेकी केल्याचे सांगण्यात येत आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलदीप सरांगल यांनी सोमवारी पत्रकार घेत माहिती दिली की,  

संतोष जाधव आणि महाकाळ यांना मुसेवालाच्या खुनाची आधीच महिती होती. हे दोघही लॉरेन्स बिष्णोई टोळी संपर्कात होते. बिश्नोई टोळीत ते कसे सहाभागी झाले, त्यांच्या संपर्कात राज्यातील इतर कोण व्यक्ती आहे याबाबत माहिती गोळा करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 

सलमान खानला धमकीचे पत्र मिळाले होते त्यातही या लॉरेन्स गॅंगच्या विक्रम बराडचे नाव समोर आले होते. बराड हा महाकाळच्या संपर्कात होता. सलमान खानाला धामी देण्यात येणार आहे ही माहिती त्याला होती. बराड  मात्र सध्या तो कॅनडात आहे की कुठे हे माहिती नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.  

दिल्ली स्पेशल सेल पोलिसांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, सिद्धू मुसेवाला गोळ्या मरणाऱ्यांपैकी संतोष जाधव हा एक शुटर आहे.  ही हत्या घडवण्यासाठी लॉरेन्स टोळीच्या विक्रम बराड याने सगळी व्यवस्था केली होती. त्यानेच शार्प शूटर नेमलं होते. त्यापैकी एक संतोष जाधव होता अशी माहिती दिल्ली स्पेशल सेलचे कमिशनर एचएसधारिवाल यांनी सांगितले होते.  सौरभ महाकाळला दोन शुटरला भेटवण्याचे बराड  ५० हजार देण्यात आले होते. असेही दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. 

पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला अटक करून रविवारी रात्री सडे अकरा वाजता सेशन कोर्टात हजार केलं होते. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.