पोरींकडे चोरून बघितलेलं त्यांना कस काय कळतं.. ?

लेख वाचण्यापुर्वी प्रेमवीरांना विनम्र आवाहन, प्रेमात शास्त्र नसतं. प्रेम होतं असत. उगीच गणित सोडवल्यासारखं प्रेम करायचं नसतं. ब्रेकअप झालं की गणित कुठ चुकलं हे आठवायचं असत. जेव्हा माणूस प्रेमात असतो तेव्हा फक्त आनंदोत्सव साजरा करायचा असतो. आत्ता सुचना संपली मुद्यावर येतो.  

सैराट आठवतोय नव्हं. आठवायला पाहीजे अक्षरश: परश्या आणि आर्चीचे पारायण घातली होती लोकांनी. या पिक्चरमध्ये तो फेमस डॉयलॉग आहे,

काय बघतुयस रं माझ्याकडं.. 

मी कुठं बघतुय तुझ बघत्यास माझ्याकडं.. 

आणि पुढे दोघं एकमेकांकडे बघत असतात हे कळून जातं. प्रेमाचा अंकुर फुलून वडाचं झाडं होण्याचा तो क्षण. पण हा क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतो अस नाही. वडाच्या झाडाऐवडी आयुष्याचा वडा व्हायला वेळ लागत नाही. पोरगी येते आणि शिव्या देवून जाते. मग आजूबाजूला असणारी आपल्यासारखीच माणसं सेकंदाच्या हजाराव्या भागात सामाजिक कार्यकर्ते होतात. आत्ता ते आपणाला कुटणार, धरुन हाणणार अशी गत होते.

आणि यात आपला अतिउत्साहपणा नडतो. आत्ता ती  पोरगी आपल्याकडे ढुंकूनगही पाहत नसते पण आपण तिच्याकडे बघत असतो. तरिही तिला कळतं की,

“सदरचा इसम दिनांक अमक्या अमक्या तारखेस इतक्या इतक्या वेळी तिच्याकडे रोखून पाहत होता. 

तर हि भानगड नेमकी काय असते, न बघता तिला कस काय कळतं की हा इसम आपल्याकडे पाहतोय. मुलींना तिसरा डोळा असतो का? या सर्व प्रश्नांची अस्सल आणि शास्त्रीय कारणे आम्ही देणार आहोत ती तुम्ही शांतचित्ताने वाचून घ्यावीत हि नम्र विनंती. 

आत्ता अशा प्रकाराला साधारण, सिक्थ सेन्स म्हणलं जातं. म्हणजे कळतं ना बघतोय ते. अहो डोळे न फिरवता कसं कळलं याच उत्तर नसतं पण कळलं. याला इंग्लीशमध्ये एक्स्ट्राेंसेंसरी परसेप्शन अस म्हणतात. अर्थात आम्हाला दर वेळी टाईप करायला लागू नये म्हणून आपण याला ESP अस म्हणू. 

आत्ता मेंदूच्या दिशेने जावू. आपला मेंदू डोळ्यांसाठी खासकरुन संवेदनशील असतो. म्हणजे मेंदूत अशी तयारी केलेली असते की आपण एखाद्या गोष्टीकडे डोळे स्थिरावले नाहीत तरी तिकडे काय होतय याचा अंदाज आपल्या मेंदूपर्यन्त पोहचत असतो. 

संशोधन अस सांगत की आपल्या मेंदूमध्ये असणारे न्यूरल नेटवर्क हे खासकरुन आपल्याकडे कोण पाहतय यासाठी बनलेले असतात. समोरचा कसा पाहतोय यावरुन तो किती पाण्यात आहे. कसा आहे. याचा अंदाज मेंदूला लावायची सवय असते. 

आत्ता आपले डोळे पाहतात तो भाग वेगळा आणि डोळ्यांच्या नजरेत म्हणजे जिकडं लक्ष नाही पण तरी दिसतं उदाहरणार्थ कोपऱ्यातलं देखील दिसतं त्याला पेरिफेरल एरिया म्हणतात. त्याला सोयीचं नाव म्हणून पोरी-फिरल पण म्हणू शकता. तर त्या एरियात होणारी बारीक हालचाल देखील आपल्या मेंदूला पकडण्याची सवय असते.

आत्ता हे झालं माणसांच असच काम प्राण्यांच्यात देखील होतं असत. म्हणजे एखादा कुत्रा झोपला आहे म्हणून आपण हळूच सटकण्याचा प्रयत्न करतो आणि तो ऐन टायमिंगला आपल्याकडे बघतो. तो जो प्रकार असतो तो याच कारणामुळे. 

आत्ता यातून काय शिकलात, तर पोरीच्या व्हिजनमध्येच जायचं नाही. एकवेळ आयुष्यभर सिंगल राव्हा पण चौकात मार खावू नका. लय लागतं वो. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.