जिओ, एअरटेलला कॉम्पिटिशन द्यायला, भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात इलॉन मस्क उतरतोय…

मध्यंतरी उत्तरप्रदेशमध्ये आकाशात लाईट्सची रांग दिसली. एका रांगेत लई लाईट्स इकडून तिकडं चाललेल्या. तिकडची लोकं म्हणायला लागली, ‘विषय हार्ड झालाय, एलियन आलेत वाटतं.’ ते हिंदीत बोलले आम्ही मराठीत सांगितलं. पण नंतर समजलं की हे एलियन वैगेरे नाहीत, तर इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे स्टारलिंक सॅटेलाईट आहेत. ज्याच्यामुळं जगात ठिकठिकाणी इंटरनेट पोहचतंय.

थोडक्यात हा सगळा विषय मस्कच्या कंपनीचा होता. आता इलॉन मस्क हीच इंटरनेट सर्व्हिस भारतात आणतोय, असं सांगितल्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हा विषय खरा आहे आणि तितकाच डीपही.

इलॉन मस्क म्हणजे सतत चर्चेत असलेलं नाव, पार ट्विटर विकत घेण्याच्या विषयापासून अगदी परफ्युम विकण्यापर्यंत मस्क हा गडी काहीही करु शकतो. त्यात इलॉन मस्क आणि इंटरनेटचा विषय निघाला की एकच नाव आठवतं ते म्हणजे स्टारलिंक.

मस्कची स्पेस एक्स ही कंपनी स्टारलिंक सॅटेलाईट्सच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवते. पार २०१५ पासूनच मस्क यावर काम करतोय, जगभरात जवळपास ४० देशांमध्ये सध्या स्टारलिंक इंटरनेट पुरवतं, आता भारतातही सॅटेलाईटद्वारे इंटरनेट पुरवण्यासाठी स्पेसएक्सनं दूरसंचार विभागाकडे परवानगी मागितली आहे.

जर आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या तर साहजिकच भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात इलॉन मस्कची एंट्री होऊ शकते. मस्कच्या एंट्रीनंतर भारताचं टेलिकॉम सेक्टर नेमकं कसं बदलणार ? हे स्टारलिंकचं इंटरनेट बसवायला नेमका किती खर्च येतो ? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा.

Leave A Reply

Your email address will not be published.