निर्बंध तर आपल्यावर पण लागले होते पण वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारत झुकला नाही

रशिया आणि युक्रेन युद्ध निर्णयक स्तिथीत येऊन ठेपले आहे. युक्रेनला रशियाविरोधात डायरेक्ट मदत करण्यासाठी अजूनतरी पुढे आलेले नाहीए. जे काही देश साथ देतायेत एक तर ते प्रेस कॉन्फरन्स करून , ट्विट टाकून रशियाला धमक्या देतायत आणि रशिया विरोधात सॅंक्शन म्हणजेच निर्बंध टाकतायेत.

आता बॉम्ब आणि क्षेपणास्त्राच्या लढाईत हे देश निर्बंध टाकून रशियाचं काय वाकडं करणार असा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही थोडी गफलत करताय…

युरोपियन देश आणि अमेरिका यांनी टाकलेल्या निर्बंधाचा रशियावर परिणाम दिसू लागला आहे. मग ते रशियातून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्या असू दे की कोसळणारे रशियाचे चलन रुबेल रशियन अर्थव्यवस्थेचा चांगलाच बाजार उठायला सुरवात झाली आहे.

पण सँक्शन्सना भारतानेही तोंड दिले आहे. आणि त्याला कारण ठरला होता भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा गोष्ट मानला जाणारा एक क्षण…

११ मे १९९८. बुद्धपौर्णिमेचा दिवस. ‘ऑपरेशन शक्ती’.

स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या घटनेचा हा दिवस साक्षीदार झाला होता. शास्त्रज्ञांच्या टीमने राजस्थानातील पोखरण येथे ३ अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती देशवासियांना आणि जगाला दिली. २ दिवसांनी म्हणजेच १३ मे रोजी  भारताने अजून २ अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. 

या अणुचाचणीनंतर हादरलेल्या अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. निर्बंध घालायला कारण काय तर अणवस्त्रांचा पप्रसार रोखायचा होता. आत अमेरिका, चीन या देशांचा दुट्टपीपणा एवढा की हे आधीच अणुबॉम्ब बनवून एवढच काय ते फोडून लाखोंचा नरसंहार करून बसले होते. मात्र नवीन देशांना ते अणुबॉम्ब बनवून देत नव्हते. 

अमेरिका आणि चीनने संयुक्त राष्ट्रात निर्बंध घालण्याचा ठराव देखील संमत करून घेतला होता.

अमेरिकेच्या  पुढाकाराखाली जपानसह जवळपास १२ देशांनी भारतावर निर्बंध घातले होते. 

आता हे सॅंक्शन भारतासाठी पहिलेच होते का ….

तर नाही!

तर यादीही भारताने १९७४ला पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी घेतली होती तेव्हाही या देशांनी  भारतावर आण्विक उपकरणे आणि साहित्य यांचे निर्बंध लादले होते. त्यांनतर १९९०च्या दशकात भारत आपला स्पेस प्रोग्राममध्ये दिवसेंदिवस प्रगती करत होता तेव्हाही या वेस्टर्न देशांच्या पोटात गोळा उठला होता. भारत डेव्हलप करत असलेला क्रायोजेनिक रॉकेटचं तंत्रज्ञानाची टेकनॉलॉजि  भारत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करण्यास वापरू शकतो असं म्हणत तेव्हाही या देशांनी भारतावर निर्बंध लादले होते.

पण यावेळेचे निर्बंध मागच्यावेळेपेक्षा जास्त कडक होते.

नक्की कोणते निर्बंध या देशांनी भारतावर लादले होते.

  • या निर्बंधांमध्ये अमेरिकेने भारताला अन्नधान्य आणि कृषी यासारखी लोकांच्या दैनंदिन गरजा सोडल्या तर इतर कोणत्याही गरजांसाठी भारताला आर्थिक सहाय्य्य करण्यास बंदी घातली होती.
  •  याच बरोबर अमेरिकेतल्या बँकाना आणि वर्ल्ड बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनाही भारताला डेव्हलपमेंटसाठी जे कर्ज लागणार होतं ते देण्यास मज्जाव करण्यात आला होता.
  •  याचबरॊबर भारताला शस्त्रास्त्रे पुरवणे, आण्विक क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी भारत ज्या वस्तूंचा उपयोग करू शकतोय त्यावरही बंधनं घालण्यात आली होती.

मात्र भारत याने झुकणार होता…

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हे देश असा खोडा घालणार याचा अगोदरच कयास बांधला होता. याची कल्पना त्यांनी तेव्हाचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना आगाऊच देऊन ठेवली होती.

मे १९९८ मध्ये एका सकाळी वाजपेयींच्या निवासस्थानी सिन्हा बोलावण्यात आले. ते तिथे पोहोचल्यावर त्यांना पंतप्रधानांच्या बेडरूममध्ये नेण्यात आले. सिन्हा सांगतात,

“मला लगेच अंदाज आला की तो मला जे सांगणार होता ते केवळ महत्त्वाचेच नाही तर अत्यंत गोपनीय देखील आहे,” आणि तिथं वाजपेयेंनी एक आश्चर्यकारक बातमी दिली ज्यामुळे त्यांना अभिमान आणि धक्का बसला.

“मी पुढील काही दिवसांत अणुचाचण्या घेण्याचे ठरवले आहे. हे अत्यंत गुप्त ऑपरेशन आहे कारण जागतिक शक्तींना ते आवडणार नाही. ते  आपल्यावर विशेषत: आर्थिक क्षेत्रात दंडात्मक कारवाई करू शकतात.”

“म्हणून, आपण आर्थिक आघाडीवर कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असले पाहिजे. मला वाटले की मी तुम्हाला आगाऊ चेतावणी द्यावी जेणेकरून ज्यामुळं तुम्हाला ऐन टाईमला धक्का बसणार नाही  ” वाजपेयींनी सिन्हा यांना सांगितले.

आपल्या रेलेण्टलेस या आत्मचरित्रात यशवंत सिन्हा यांनी हा प्रसंग सांगितला आहे. 

निर्बंधांनंतर  एका रात्रीत, भारतीय अर्थव्यवस्थेत येणारी परदेशी विकास मदत आणि खाजगी गुंतवणूक आटली. शिवाय, भारताला तात्काळ आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे दरवाजेही बंद केले गेले होते.

या आर्थिक कोंडीतून कसा मार्ग काढला यावर सिन्हा सांगतात  

“आम्ही अनिवासी भारतीय (अनिवासी भारतीय) आणि पीआयओ (पीपल ऑफ इंडियन ओरिजिन) यांच्याशी रिसर्जंट इंडिया बाँड्सद्वारे संपर्क साधण्याचा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा पाठिंबा असलेल्या या बाँडद्वारे परकीय चलन निधी उभारण्याचे ठरवले आहे,” . आणि या आइडियाला जोरदार प्रतिसाद मिळाला. 

१० दिवसांत भारताने ४.५अब्ज डॉलर उभारले होते.

त्याचबरोबर  सरकारने राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रम आणि ग्रामीण रस्ते प्रकल्प वाढवून आणि माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा  करून देशांतर्गत मागणी वाढवण्याच्या दिशेने काम केले होते. अखेरीस राजनैतिक वाटाघाटी करत भारतावरील आर्थिक निर्बंध हटवण्यात आले.

आता भारताने अणुबॉम्ब केला म्हणून त्याचवेळी अजून एका देशाने तसेच केले आणि  निर्बंधांमध्ये त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची दाणादाण उडाली होती. आणि तो देश म्हणजे आपला शेजारी पाकिस्तान.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.