द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धवार काय म्हणतायेत?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केलयं. आता हे आक्रमण झालंय लोकांच्या हातात लोकांच्या फ्रीचं इंटरनेट असताना. त्यात प्रत्येक जण फेसबुक, ट्विटर एक्स्पर्ट असल्याच्या अविर्भावात ग्यान पाजळतोय. आणि टीव्हीवर बघायचं म्हटलं तर ते कधीच तिसरं महायुद्ध चालू करून बॅकग्राऊंडला अणुबॉम्ब पडल्याचे फोटो दाखवून मोकळे झालेत.  हद्द तर तेव्हा झाली जेव्हा युक्रेनवर हल्याचा व्हिडिओ म्हणून काही मीडियावाले थेट व्हिडिओ गेमचं फुटेज दाखवायला लागले.

त्यामुळं आता नक्की या वादावर जागतिक मीडिया काय छापतंय ते बघू.

वॉशिंग्टन पोस्ट

Screenshot 2022 02 25 at 1.40.07 PM

https://thewashingtonpost.newspaperdirect.com/epaper/viewer.aspx

रशियाने युक्रेनवर  इन्वेजन म्हणजेच लष्करी आक्रमण केल्याची हेडलाइन वॉशिंग्टन पोस्टनं दिले आहे.

त्यांच्या टॉप अपडेट्समध्ये वॉशिंग्टन पोस्टने लिहलं आहे की युनायटेड स्टेट्सने वॉर्निंग दिली आहे की रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीच्या बाहेर फक्त २० मैलांच्या अंतरावर आहे आणि युक्रेनची राजधानी  कीव लवकरच पडू शकते.

तसेच अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी संध्याकाळी सांगितले की क्रेमलिन कीवला लक्ष्य करत आहे आणि त्यांची  खात्री आहे की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनियचं सध्याचं सरकारचा पाडायाचं आहे.

रशिया इन्व्हेड युक्रेन या सदराखाली वॉशिन्गतोने पोस्टने युक्रेनमधल्या ग्राउंड रिपोर्टचे अपडेट्स दिले आहेत. त्यामध्ये मेट्रोच्या भुयारात लपलेले युक्रेनियन नागरिक किंवा रशियाच्या हल्यांनंतर उध्वस्त झालेले युक्रेनचे प्रदेश दाखवले आहेत.

अल जझीरा

Screenshot 2022 02 25 at 1.41.15 PM

https://www.aljazeera.com/news/

अल जझीरा ने वादात न्यूट्रल राहत असल्याची भूमिका घेत ‘क्रिमियन क्रायसिस’ या मथळ्याखाली अपडेट्स दिलेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायेत की ”रशियाचा नंबर वन टार्गेट मी आहे” हे अल-जझिराने हेडलाईन  म्हणून छापलं आहे. त्याचबरोबर कोणतयाही परिस्तिथीत आपण राजधानी कीव सोडून जाणार नाही असंही प्रेसिडेंट म्हणत आहेत असा वृतांत अल जझिरामध्ये पाहायला मिळतो. युनायटेड स्टेट्स आणि युक्रेनियन अधिकार्‍यांच्या नुसार रशियाचा हेतू कीववर कब्जा करणे आणि सरकार पाडणे आहे,  कारण रशियाच्या मते सध्याचे युक्रेनमधील सरकार हे अमेरिकेच्या हातातली कठपुतली आहे हा एक अल जझीराच्या बातमीतील महत्वाचा पॉईंट.

कीववर ताबा मिळवण्यासाठी रशियाने उत्तेरकडून बेलारूस मधून आक्रमण केलं आहे आणि राजधानी पासून अवघ्या ९० किलोमीटरवर असलेल्या चेर्नोबिल अणुभट्टीच्या ताबा घेतल्याचेही वृत्त  अल-जझीरा ने दिले आहे.

तसेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलयं की, आतापर्यंत १३७ नागरिक आणि लष्करी सैनिक मारले गेले आहेत आणि यूएन निर्वासित एजन्सी म्हणते की अंदाजे एक लाख युक्रेनियन लोक पळून गेले आहेत. त्याचबरोबर रशियाने युक्रेनवर केलेल्या मिसाइलच्या माऱ्याची आणि युक्रेनने रशियाचे एक विमान राजधानी किव्हवर पडल्याचंही वृत्त छापलंय.

ग्लोबल टाइम्स

https://www.globaltimes.cn/

 

https://www.globaltimes.cn/

बाकीच्या वेबसाइट्सवर नुसते रशिया युक्रेनचा विषय असताना चीनमधून निघणाऱ्या ग्लोबल टाइम्सयावर मात्र शुकशुकाट आहे. युक्रेनची कंबर मोडल्यानंतर रशिया चर्चेस तयार आहे अशी त्यांनी पहिल्या पेज वर बातमी छापली आहे.

त्याचबरोबर

ज्याप्रमाणे युक्रेनला अमेरिकेने एकटं सोडलं त्याचप्रमाणे तैवानचंही होईल

अशा आशयाची बातमी ग्लोबल टाइम्स नं नेटिझन्स म्हणतायेत या नावाखाली छापलीय. तसेच रशियासारखं मेनलॅन्ड चीननेही तैवानचं लष्करी कारवाईच्या  एकत्रीकरण करावं असं लोकांची भावना झाल्याचं ग्लोबल टाइम्सने लिहलं आहे.

द गार्डियन

पुतिनचे आक्रमण अशी आजची द गार्डियनची हेडलाईन आहे. ब्रिटमधून पब्लिश होणाऱ्या या पेपरमध्ये रशियाने युक्रेनवर ”लष्करी आक्रमण” केल्याचं म्हटलं आहे.  तसेच द गार्डियन बरोबर ब्रिटनमधल्या इतर पेपरांनीपण युद्धात जखमी झालेल्या एका महिलेचा फोटो फ्रंट पेजवर छापत रशियाच्या ‘आक्रमचा’ सामान्य नागरिकांवर भीषण परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. 

या युद्धाचा आपल्या खायच्या तेलापासून ते अगदी शेअर मार्केटपर्यंत परिणाम होत आहे त्यामुळं तुम्हला अगदी क्लिअर आयडिया असावी यासाठी हा प्रयत्न.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.