जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱ्या BCCI च्या अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? कोण मतदान करतं

बीसीसीआय बद्दल सगळ्यांकडून एक गोष्ट सांगितले जाते ते म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. भारतीय क्रिकेट बोर्डाची एवढीच ओळख नाही तर जगभरात क्रिकेटचा प्रचार, प्रसार करण्यात बीसीसीआयची मोठा वाटा आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे जगभरातील क्रिकेट बोर्डाचे लक्ष लागलेलं असत.

बीसीसीआयची जबाबदारी ही अध्यक्षांवर  भारताच्या संपूर्ण क्रिकेट प्रशासनाची जबाबदारी असते. तसेच बीसीसीआयच्या आर्थिक चाव्या सुद्धा त्यांच्या हातात असतात. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक महत्वाची आहे.  

१८ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि खजिनदार पदासाठी निवडणूक होत आहे. जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱ्या बीसीसीआयच्या अध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण मतदान करत ? ते समजून घेऊ 

अगोदर बीसीसीआयच्या निवडणुकीत कोण मतदान करत हे पाहुयात

बीसीसीआयची निवडणुकीत मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या ही कमी आहे. बीसीसीआयचे पूर्ण वेळ सदस्य असणारे मतदान करतात. हे सदस्य राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असतात. देशभरातील  २९ राज्यातील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे मतदार असतात. 

गुजरात आणि महाराष्ट्र हे राज्य ३-३ मते देतात. इतर राज्याला १ मत देता येत. गुजरातमध्ये- गुजरात क्रिकेट असोसिएशन, बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मतदान करत तर महाराष्ट्रातून महाराष्ट्र क्रिकेट सोसिएशन, पुणे क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन मतदान करत असतं. 

भारतीय रेल्वे, सशस्त्र दल आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे प्रत्येकी एक सदस्य निवणुकीत मतदान करतात. बीसीसीआयचे काही सहयोगी सदस्यही आहेत मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही.

बीसीसीआयच्या अध्यक्षांची निवडणूक अशी पार पडते 

सगळ्यात आधी बीसीसीआय या निवडणुकीसाठी  निवडणूक अधिकाऱ्याची १ महिना अगोदर निवड करतात. यासाठी  मात्र एक अट आहे. निवडणूक अधिकारी हे निवडणूक आयोगाचे माजी सदस्य असायला हवेत. यंदाच्या निवडणुकीसाठी ए. के. ज्योती हे निवडणूक अधिकारी असणार आहेत. ते भारताचे २१ वे मुख्य आयुक्त होते.

एकदा निवडणूक अधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर बीसीसीआयच्या निवणुकीची तारीख घोषित करतात. यांच्या देखरेखीखाली पदाधिकाऱ्यांचे उमेदवारी अर्ज, मतदारांची यादी याची सगळी तयारी हे निवडणूक अधिकारी करून घेत असतात. तसेच बीसीसीआयच्या राज्य संघटना प्रथम त्यांचे प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल करतात. 

त्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार केली जाते. ही यादी तयार केल्यानंतर या नावांवर कोणाचा आक्षेप असेल तर तो नोंदवण्यासाठी वेळ देण्यात येतो. या नावावर काही आक्षेप असतील तर तपासणी केली जाते आणि त्यानंतर बीसीसीआय अंतिम मतदार तयार करतात. 

यानंतर बीसीसीआय उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची तारीख घोषित करतात. त्या तारखेपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी केली जाते आणि त्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाते.  ज्या प्रमाणे भारतातील इतर निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी तारीख असते तसेच बीसीसीआयच्या निवडणुकीत सुद्धा अर्ज मागे घेण्यासाठी तारीख दिली जाते. यानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकारी करतात.

यानंतर सर्वसाधारण सभा भरविण्यात येते आणि त्यात मतदान घेण्यात येते. आणि यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि खजिनदार निवडले जातात. 

बीसीसीआयच्या अध्यक्ष म्हणजे देशातील सगळ्यात शक्तिमान क्रिकेट अधिकारी असतो. 

 भारताच्या संपूर्ण क्रिकेट प्रशासनाची जबाबदारी त्याच्यावर आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष हे जनरल बॉडी आणि सर्व बैठकांच्या अध्यक्षस्थानी असतात. अध्यक्षांकडे बीसीसीआयची आर्थिक चावी असते. तसेच सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर अध्यक्षांची सही असते. 

अध्यक्ष पदासाठी रॉजर बिन्नी यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे तेच अध्यक्ष होतील. राजीव शुक्ला उपाध्यक्ष पदी, सचिव पदी जय शहा  कायम राहू शकतात. तर सहसचिव पदी देवजित सैकिया असणारा आहे. कोषाध्यक्ष पदी आशिष शेलार निवडून येणार आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.