कॅमेरा म्हटला की कोडॅकचाच असं असताना कार्यक्रम नक्की कुठं गंडला

एक काळ असं होता का घराघरात नुसता कोडॅकचाच कॅमेरा असायचा. फोटो काढण्याच्या कलेला खऱ्या अर्थानं कोणी फोटो स्टुडिओच्या बाहेर काढलं तर ते कोडॅकनच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोडॅकचे ते रिल्स आणि मग त्याच्यावर ऊन पडू नये म्हणून केली जाणारी धडपड आता नुसत्या आठवणीत राहिलंय.

मात्र कोडॅकचा कॅमेरा बऱ्याचजणांच्या हातात येण्यामागं एक स्ट्रॅटेजी होती. कोडॅकचा कॅमेरा तसा कमी किंमतीत यायचा.

‘रेझर अँड ब्लेड्स’ स्ट्रॅटेजी वापरून कोडॅकने अख्ख मार्केट मारलं होतं.

आता ही स्ट्रॅटेजी सोपी आहे भिडू. रेझर कमी किंमतीत विकायचे आणि जेव्हा लोक ब्लेड घ्यायला येणार तेव्हा मग प्रॉफिट मारायचं. कोडॅकनंपण हेच केलं. नफ्यासाठी कॅमेरे परवडणाऱ्या किमतीत विकणे आणि नंतर रिल्स, फोटोचे कागद,छपाई उपकरणे आणि इतर उपकरणे यांसारख्या मोठ्या नफ्याच्या फरकाने विकणे ही कोडॅकची स्ट्रॅटेजी होती. त्यामुळं कॅमेरानं ब्रँड लोकांपर्यंत पोहचला आणि मग इतर वस्तू विकून कोडॅकनं तुफान पैसे कमवला.

मात्र हीच स्ट्रॅटेजि कोडॅकच्या अंगलट येणार होती. 

जग बदलत होतं, तंत्रज्ञानात बदल घडत होते. कोडॅकच्या मॅनेजमेंटकढून पण हीच अपेक्षा होती. कोडॅकने नेमकी ती चूक केली होती जी जॉर्ज ईस्टमन, त्याचे संस्थापक, यांनी यापूर्वी दोनदा टाळली होती. जेव्हा त्याने चित्रपटाकडे जाण्यासाठी फायदेशीर ड्राय-प्लेटचा व्यवसाय सोडला होता. त्यांनतर त्याने रंगीत चित्रपटात गुंतवणूक केली होती, जरी ती सुरवातीला ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापेक्षा निदर्शनास निकृष्ट होती. मात्र एक बदल कोडॅकनं लक्षात नाही घेतला आणि कोडॅक मागे पडलं.

जग डिजिटल टेकनॉलॉजिकडे चाललं आहे हे कोडॅकच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमनं ओळखलं होतं.

 स्टीव्ह सॅसन, कोडॅक इंजिनिअरने १९७५ मध्ये पहिला डिजिटल कॅमेरा शोधला होता. जर तो कोडॅकनं बाजारात आणला असता तर कोडॅकणं डिजिटल युगात पण दबदबा राखला असता. मात्र हे इन्वेशन  पाहून कोडॅकच्या मॅनेजमेंटची  प्रतिक्रिया होती ”it’s cute..पण कोणाला सांगू नकोस”.

कारण डिजिटल कॅमेरामध्ये रोल्स नसतात, तसेच कागदापासून, छपाई यंत्रांचाही खप कमी होणार होता. त्यामुळं मॅनेजमेन्टनं डिजिटल कॅमेरा स्वीकारण्यास नकार दिला होता. 

जेव्हा नंतर कोडॅक डिजिटलमध्ये उतरलं तेव्हा खूप उशीर झाला होता.

कोडॅक हे समजण्यात अपयशी ठरले की पारंपारिक फिल्म कॅमेर्‍यांवर भर देण्याचे त्यांचे धोरण (जे एका वेळी प्रभावी होते) आता कंपनीला यशापासून वंचित ठेवत आहे. झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि विकसित होत असलेल्या बाजाराच्या गरजा यामुळे धोरण अप्रचलित झाले होते.

२०१२ मध्ये कोडॅकने स्वतःला दिवाळखोर घोषित केले. सध्या, कोडॅक जगभरातील व्यवसायांसाठी पॅकेजिंग, फंक्शनल प्रिंटिंग, ग्राफिक कम्युनिकेशन्स आणि व्यावसायिक सेवा प्रदान करते. कॅमेरे बनवण्‍यासाठी प्रसिध्‍द असलेले, Kodak ने आता औषधं बनवण्‍यामध्‍ये पाऊल टाकले आहे आणि  २०२० मध्‍ये यूएस सरकारकडून $७६५ मिलियन कर्ज मिळवले होते. आता या कोडॅकच्या गंडलेल्या कार्यक्रमातून तुम्हाला काय कळलं ते खाली कमेण्ट करून नक्की सांगा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.