मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इलेक्शनचं सगळं राजकारण असं असतंय…

शरद पवार-एकनाथ शिंदे एकत्र आले, मिलिंद नार्वेकरांनी फडणवीसांचे आभार मानले, क्रिकेटरला हरवायला राजकारण्यांनी टीम बनवली, अमोल काळे जिंकले, पण क्रिकेटर संदीप पाटील हरले आणि उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे मतदानाला आलेच नाहीत, मागच्या दोन दिवसांपासून सतत आपल्या कानावर पडतायत त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या बातम्या. 

युती, आघाडी, डावपेच या राजकारणात होणाऱ्या सगळ्या गोष्टी एमसीएच्या इलेक्शनमध्येही झाल्या आणि या सगळ्या झांगडगुत्त्यामुळं प्रश्न पडले की, हे इलेक्शन कसं पार पडतं ? क्रिकेट न खेळलेले पण इलेक्शनला उभे राहू शकतात का ? यातले मतदार नेमके असतात तरी कोण ? आणि हे एमसीए नेमकं काम काय करतं ? प्रश्न लय असले तरी लोड नाही, कारण उत्तर द्यायला बोल भिडू आहेच.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.