भारतातनं पाठवलं जाणार पेट्रोल नेपाळ – श्रीलंकेत स्वस्त कसं आहे?

भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी नुकतंच एक ट्विट केलं आणि यात रामाच्या भारतात पेट्रोलचे दर ९३ रुपये, सीतेच्या नेपाळमध्ये ५३ रुपये आणि रावणाच्या लंकेत ५१ रुपये असल्याचं सांगितलं. आता यानंतर सोशल मीडियावाल्यांनी लगेचच हे ट्विट पसरवत सरकारच्या  डोळ्यावर आणून द्यायला सुरुवात केली.

त्यातल्या चौकस बुद्धीच्या दोघा-चौघांनी हे कसं शक्य आहे असं प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातल्या एका लयचं हुशार असणाऱ्याने सांगितलं की हे पेट्रोल तर आपणचं निर्यात करतो. आता हे जर खरं असेल तर याच उत्तर तर शोधायलाचं पाहिजे की,

जर भारत या दोन्ही देशांना पेट्रोल पाठवतं असेल तर तिथं दर कमी कसे काय असतात?

पहिल्यांदा नेपाळचं बघू.

नेपाळमध्ये जे पेट्रोल पाठवलं जातं ते सगळं भारतातूनच पाठवलं जातं. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आईओसी) भारतातून रोज जवळपास १८०० टँकर तेल रिफाईन करून पाठवत असते. सोबतच ६९ किलोमीटर लांबीची मोतीहारी-अमलेखगंज या पाईपलाईनद्वारे अमलेखगंज डेपोमध्ये पाठवलं जातं. याच उद्धघाटन सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं.

नेपाळच्या सीमा तिन्ही बाजुंनी भारताला लागून आहे. तर उत्तरच्या सीमा चीनला लागून आहे. याच शेजारच्या देशांमध्ये नेपाळच्या संबंधातील तेल आणि तेल उत्पादनासंबंधीची सगळी पूर्तता भारतातुनच केली जाते.

आता आणखी एक गोष्ट. भारताचा रुपया हा नेपाळच्या रुपया पेक्षा बराचं स्ट्रॉंग आहे. नेपाळचा १ रुपया भारताच्या ६२ पैशांच्या बरोबर असतो. म्हणजेच नेपाळचे १०० रुपये भारताच्या जवळपास ६२ रुपयांच्या बरोबर असतो.

पण यानंतर देखील स्वस्त का आहे?

पेट्रोलियम तज्ञ सुनिल सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार,

भारत केवळ नेपाळ, श्रीलंकेलाच नाही तर अगदी अमेरिका, संयुक्त अरब अमिरात यांना देखील रिफाईन तेल निर्यात करतो. याची बरीच कारण आहेत.

तर हे तेल जेव्हा निर्यात होते तेव्हा त्यात केवळ कच्च्या तेलाची किंमत, रिफाइनरीसाठी येणारा खर्च आणि रिफाइनरी कंपनीचा नफा एवढ्याच गोष्टींचा समावेश असतो. बाकी इरत सर्व प्रकारचा कर माफ असतो.

त्यामुळे त्यांना पेट्रोल मिळतानाच कमी दरात मिळते. म्हणजे जर २७ रुपयांच्या आसपास कच्च तेल असेल तर ते विकताना ३५ ते ३७ रुपये या दरम्यान दर असतात.

आता दुसरं गणित आहे ते नेपाळमध्ये पेट्रोलवर लागणाऱ्या टॅक्सवर.

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किमती या २७-२८ रुपयांच्या आसपास असतात. त्यावर केंद्र सरकारच एक्साईज आणि राज्य सरकारच व्हॅट अधिक इतर सरचार्ज, डीलर्स कमिशन असा मिळून जवळपास ६४ रुपयांचा कर आकारला जातो.

त्याच वेळी नेपाळमध्ये तेलावर टॅक्स तर आकारला जातो. पण तो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. मागच्या वर्षी तिथं पेट्रोल वर इंफ्रास्ट्रक्चर टॅक्सच्या नावावर ५ रुपये प्रतिलिटर कर लावायचा निर्णय घेतला होता, पण स्थानिकांनी त्याविरोधात सगळ्या देशात निदर्शन सुरु केली होती.

सध्या नेपाळ मध्ये पेट्रोलवर जो कर आकारला जातो तो जवळपास भारतीय रुपयात ४० रुपयांच्या आसपास आहे. यात प्रदूषण नियंत्रण, पेट्रोलियम इंफ्रास्ट्रक्चर, रोड मेंटेनन्स आणि इंफ्रास्ट्रक्चर अशा करांचा समावेश आहे. तर दराच निर्धारण महिन्यातुन एकदा नेपाळ ऑईल कॉर्पोरेशन द्वारे केलं जातं

दोन्ही देशातील सध्याच्या पेट्रोलच्या दरात कसा फरक आहे?

नेपाळ तेल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाईटच्या नुसार १९ जानेवारीला बिरगंज मध्ये तेलाचे दर १०८. ५० नेपाळी रुपया (६७.९५ भारतीय रुपया) इतका होता. त्याचवेळी नेपाळचा दुसरा सीमावर्ती भाग असलेला रक्सौल या भागात तेलाचे दर १४०.७६ नेपाळी रुपया म्हणजेच भारताच्या हिशोबाने ८८.१५ रुपये होता.

३ फेब्रुवारी रोजी भारतातील विविध देशांमधले पेट्रोलचे दर ८७ रुपयांपासून ९२ रुपयांपर्यंत होते. याच दिवशी नेपाळमधील पेट्रोलचे दर ६७ रुपये प्रति लिटर विकल जात होते.

यामुळे नेपाळच्या सीमेवर एक वेगळीच समस्या उद्भवली आहे. सीमेवरील पेट्रोल पंपाची संख्या लक्षणीय आहे. आणि दर देखील भारताच्या तुलनेत कमी असल्यामुळे भारतातील लोक मोठ्या संख्येने तिथं खास तेल भरण्यासाठी म्हणून गाड्या घेऊन जात असल्याच्या बातम्या अधुन मधून येत असतात.

श्रीलंकेमधील गणित.

wits.worldbank.org या वेबसाईटनुसार श्रीलंकेच्या पेट्रोलियमच्या गरजेपैकी भारतातुन २१.६२ टक्के तेल श्रीलंकेत आयात केले जाते. मात्र त्यानंतर देखील श्रीलंकेत भारतापेक्षा पेट्रोलचे दर कमीच आहेत.

श्रीलंकेचे १०० रुपये हे भारताच्या ३८ रुपयांच्या बरोबर आहे.

तर श्रीलंकेमध्ये सध्याचे पेट्रोलचे दर १६१ श्रीलंकन रुपये आहे. म्हणजेच भारतीय रुपयात सांगायच झालं तर ६१ रुपये प्रतिलिटर.

यावर केवळ २० रुपये प्रतिलिटर कर आकारला जातो.

तर त्याच वेळी सल्फर सुपर डिझेलवर ३० रूपये आणि इतर डिझेलवर १२ रुपये ते २० रूपये अशा स्वरुपातील कर लावला जातो.

श्रीलंकाचे माजी अर्थमंत्री मंगला समरवीरा यांनी आपल्या कॅल्क्युलेशन नुसार दावा केला होता की सरकारने ठरवलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २० श्रीलंकन रुपये प्रति लिटर पर्यंत कमी करू शकते.

पाकिस्तान :

पाकिस्तानमध्ये तेलाचे दर १११.९० पाकिस्तानी रुपये आहे. भारतीय रुपयात ५०.९९ भारतीय रुपया. तर डिझेलची किंमत ११६.०७ पाकिस्तानी रूपये अशी आहे. तर भारतीय रुपयात सांगायचं म्हंटल तर ५२ रुपये ८१ भारतीय रुपया इतकी किंमत होते.

भुटान :

भारताच्या आजुबाजूच्या देशांपैकी सर्वात कमी दर भुटान मध्ये आहेत. तिथं पेट्रोलचे दर ४९ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ४६ रुपये प्रतिलिटर असे आहेत. भुटानला देखील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच पेट्रोल पाठवत आहे.

भुटानमध्ये सर्वात कमी कर आकारणी आणि वाहनांच्या वापरावर बंधन अशा कारणांमुळे तिथला दर कमी आहे.

बांग्लादेश :

तर बांग्लादेशमध्ये पेट्रोलचे दर ८९ रुपये प्रतिलिटर आहेत. भारतीय रूपयाय ७६ रुपये प्रति लीटर.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.