ना पक्ष असतोय ना चिन्ह, मग ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा पक्ष करतात तरी कशाच्या आधारावर..?

मोठ-मोठे विचारवंत आणि पत्रकार सांगुन गेले, दिल्लीतल्या राजकारणावर अभ्यास करा पण गावकी-भावकी आणि गल्लीतल्या, गावातल्या राजकारणावर जास्त विचार करु नका. ते खूप खोल आणि गंभीर असतयं.

तर झालय असं की महाराष्ट्रातल्या ५४७ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीनंतर आता ग्रामपंचायतीच्या निकालावर राज्याच्या सत्तेचे अंदाज लावले जातायत. या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजप आणि शिंदे गट युतीला स्पष्ट कौल दिला असून ५४७ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये भाजप-शिंदे गटाचे सरपंच निवडून आले आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीने भाजपचा हा दावा खोटा असल्याचं म्हणत पक्षाच्या निवडणूक चिन्हावर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या जात नाहीत, असा खुलासा करत आम्हीच ३०० हून अधिक जागा जिंकल्याचे म्हटले आहे.

दोन्हीकडच्या दाव्यांमुळं होतंय असं की, निवडणूका झाल्या ५४७ जागांसाठी आणि दावे होतायत ६१८ जागांचे. पण या सगळ्या ग्रामपंचायत निकालाच्या गोंधळात आमच्या बऱ्याच भिडूंनी विचारलं की ग्रामपंचायतीत पक्ष नसतो, पक्षाचं चिन्ह नसतं तरी हे पक्ष आम्हीच जास्त जागा जिंकल्या असे दावे का करतात…

तर याचं उत्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन व्हिडीओ पहा…

 हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.