पॉर्न स्टार पैसे कसे कमवतात?

पॉर्नइंडस्ट्री मध्ये राज कुंद्राचं नाव आल्यापासनं पॉर्न इंडस्ट्रीचा नुसता बाजार उठलाय. तसा पॉर्न हा काही आपल्याला नवा विषय नाही. शाळेतल्या पौगंडावस्थेतल्या कवळ्या पोरांपासनं ते म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो.

म्हणजे हे असय ना, की

ये होता सभी के पास, मगर देता कोई नहीं, सब छुपाके राखते है

म्हणजे आजच्या घडीला कोणाचा फोन उघडला तर एक तरी शो असणारच त्यात. बरं लोक फक्त शोच बघत्यात. त्यातल्या त्यात सगळ्यांस्नी मिया खलिफा, सन्नी लिओनी एवढंच माहिती. त्याच्यापुढं आपली गाडी कधी गेलीच न्हाई.

आज जरा आपण पुढं जाऊन शोधूया हे पॉर्न स्टार पैसे कसे कमवतात.

जगभरात पॉर्नवर खुलेपणानं चर्चा होते. आज पॉर्न मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क, इंटरनेट असं सगळीकडं सापडतंय. बिजनेस इनसायडरच्या एका रिपोर्टनुसार जगभरात पॉर्न इंडस्ट्री १०० बिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ ७.४ लाख करोड भारतीय रुपये एवढी आहे. आता यातला १० टक्के हिस्सा तर एकट्या अमेरिकेचा आहे. शेवटी इथं पण दादाच आहे तो.

पॉर्न वाढतंय कसं?

फ्री पॉर्न हि कन्सेप्ट पॉर्न वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजे आज बऱ्याच ढीग साईट्स आहेत ज्यावर पॉर्न फ्री आहे. खरं तर पायरसीमुळे या फ्री पॉर्न व्हिडिओ वाढले. २००९ च्या दरम्यान पॉर्न इंडस्ट्रीच्या एका प्रोड्युसरने सांगितलं होतं कि, पायरसीमुळे आमच्या नफ्यात ३० ते ५० टक्क्यांची घट झाली आहे.

मग आता फ्री पॉर्न तर सुरु झालं. पण मग हे पैसे कसे मिळवतात?

तर या पॉर्न साईट्सवर तुम्ही गेलात तर तुम्हाला वर खूप साऱ्या ऍड पॉप होताना दिसतील. या पेड ऍड घेऊन थोडी फार कमाई केली जाते. पण जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघता तेव्हा याची क्वालिटी थोडी खराब असते. यात स्टोरी वैगरे असा काही फॉरमॅट नसतो.

त्यामुळे या इंडस्ट्रीवाल्यांनी एक नवा फंडा शोधून काढला. प्रीमियम कंटेंट 

त्यांची कामे वाढविण्यासाठी या वेबसाईट आता प्रीमियम कंन्टेट देतात. यात फ्री कंन्टेट असतोच. पण हाय रिजोल्यूशन सोबत त्या पॉर्न विडिओ मध्ये एखादी स्टोरीलाईन क्रिएट केली जाते. यात नो एड/पॉप-अप, अनलिमिटेड डाउनलोड, ऑनलाइन लाइव कॅमेरा स्ट्रीमिंग सोबत बऱ्याच गोष्टी मिळतात. या वेबसाईट त्यांच्या ग्राहकांना कंटेंट की ई-मेल किंवा फिजिकल डिलिवर करतात. आता यातून मिळणारा पैसा काही थोडा थोडका नाही.

हल्ली ऑनलाइन लाइव कॅमेरा स्ट्रीमिंगला जास्त मागणी आहे. 

या वेबसाईट्सचे १ पासून १५ डॉलर प्रति दिवस आहेत चार्जेस

आता या पॉर्न साईट्स आणि त्यांचे मालक पण बरेच स्मार्ट झालेत. कमाई वाढवण्यासाठी या पोर्न साइट्स बऱ्याच मोडमध्ये पेमेंट ऑप्शन ऑफर करतात. यात डेली, विकली, मंथली, क्वार्टरली, इयरली असे  सब्सक्रिप्शन दिले जातात. जस तुम्ही नेटफ्लिक्सच, हॉटस्टारच किंवा मग एखाद्या डेली पेपरच ऑनलाईन सब्सक्रिप्शन घेता अगदी तसं. यात एक डॉलर पासून १५ डॉलर पर डे चार्ज केले जातात. आता शेवटी तुम्हाला काय बघायचंय यावर पण थोडं डिपेंड करतं.

पूर्ण जगभरात २.५ करोड पेक्षा जास्त पॉर्न साईट्स अव्हेलेबल आहेत.

बिजनेस इनसायडरच्या एका रिपोर्टनुसार पूर्ण जगभरात २.५ करोड पेक्षा जास्त पॉर्न साईट्स अव्हेलेबल आहेत. आता जगातल्या सगळ्या वेबसाइटबरोबर याची टक्केवारी काढली तर ती एकूण १२ टक्के आहे. जर वेब ट्रॅफिकचे बोलायला गेलं तर ३० टक्के हुन जास्त ट्राफिक पॉर्न साईट्सवर असतं.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधल्या सनफर्नांडो व्हॅलीला पॉर्नच ग्लोबल हब मानलं जात. या भागात एका वर्षभरात नाही म्हणलं तरी ११ हजरांपेक्षा जास्त मुव्हीज शूट होतात. ९० च्या दशकात पॉर्न फक्त डीवीडी मध्ये मिळायचं. पण आता वेबसाइट्स यूजर-बेस वाढलेला बघून लोकांना नेहमीच काहीतरी नवीन हवं असतं. त्यामुळे या  मुव्हीजची संख्या वाढली आहे.

आता हे झालं वेबसाईटच, मग पॉर्नस्टार मुव्हीज सोडून काही कमवतात का?

पैसे कमवण्याच्या बाबतीत हे पॉर्नस्टार या वेबसाईटच्या पण पुढं गेलेत.अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोप कन्ट्रीज जिथं पॉर्न इंडस्ट्री आहे तिथले पॉर्न स्टार स्वतःच्या कम्युनिटीचे खास कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमात या स्टार्सच्या लॉयल फॅन्सना बोलावलं जात.

हे फॅन्स आपल्या आवडीच्या पॉर्नस्टारला बघण्यासाठी हवे तेवढे पैसे मोजतात. म्हणजे यासाठी तिकीट असतं. ज्यातून या स्टार्सना पैसे मिळतात. त्याव्यतिरिक्त बरीच मोठी मोठी हॉटेल्स, पब्स ‘इन-रुम एंटरटेनमेंट’ सारख्या सेवा देतात. ज्यात एका रात्रीसाठी या पॉर्न स्टार्सना बरेच पैसे मिळतात.

अशाप्रकारे हे लोक पैसे कमवतात. आपण पण जरा कामधंद्याला लागूया..पैसे कमवुया, किती दिवस कोरोना कोरोना करणार, नाही का?

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.