आणि पुतिनच्या वडिलांनी मृतदेहांच्या ढिगाऱ्यातून आपल्या बायकोचा देह बाहेर काढला
व्लादिमिर पुतीन. सध्या न्यूज चॅनेल्स असू दे की पेपर सगळ्यात एकच नाव चर्चेत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्याने अख्ख जग ढवळून निघालं आहे. युद्धात होत असलेलेले माणसांचे हाल , जीवितहानी इतक्या दिवस इतिहासाच्या पुस्तकात बघणारी आपली पिढी आज मोबाइलवर वर्तमानात पाहतेय. या युद्धाला जगभरातून विरोध होत आहे. मात्र या युद्ध ज्यांनी सुरु केले असेल त्या पुतीन यांना या युद्धात एवढी माणसं मारतायेत, लोकांची घरं दारं उध्वस्त होतायेत, लहान मुलं आणि बायका यांचे अगणित हाल दिसत नसतील का?
आता जरी एव्हरीथिंग इजे फेअर इन लव्ह अँड वॉर असलं काय तरी लॉजिक मांडण्यासाठी आपण पुतीन यांच्याकडे थोड्या दर्यादलीची अपेक्षा करावी त्यामागंही एक स्टोरी आहे.
दुसऱ्या महायुद्धात पुतीन यांच्या आई मरण त्यांच्या पुढे ठाकलं होतं.
काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा जेव्हा पुतीन यांचा जन्मही झाला नव्हता….
हिटलरच्या नाझी सैन्याने आपला मोर्चा रशियाकडे वळवला होता.ऐन कडाक्याचा थंडीत चालू झालेल्या या नाझी आक्रमणाला रशियातून जोरदार प्रत्युत्तर मिळत होतं. त्यामुळं जेव्हा नाझी सैन्याने लेनिनग्राडला ताब्यात घेण्याचं ठरवलं तेव्हा रस्त्यावर हेड तो हेड फाईट नं करता शहराची नाकेबंदी करण्याचा आदेश हिटलरनं काढला.
आणि ८ सप्टेंबर १९४१ साली चालू झाला इतिहासातील सर्वात मोठया घेराबंदी पैकी एक असलेला लेनिनग्राडचा सीज…
तब्बल ८७१ दिवस नाझी सैन्यानं लेनिनग्राडला वेढा घातला होता.
DW या वेबसाइटनुसार ११ लाख लोकं या वेढ्यात मारले गेले होते.
जवळपास तीन वर्षे चाललेल्या या वेढ्यात शहरातील अन्नधान्य पूर्णपणे रिते झाले होते. हळू हळू रोज हजारो लोक भुकेने तडफडून मरत होते. सुरवातीला शहरातील मांजरं, कुत्री नाहीशी झाल्यानंतर शहरातल्या लोकांचा वॉलपेपर, विंडो पुट्टी आणि उकडलेल्या चामड्याचे सूप हा लोकांचा रोजचा मेनू झाला होता. शहरात कॅनिबीनिज्म म्हणजे माणसाने माणसांना खाण्याचा गोष्टी नवीन राहिली नव्हती.
या वेढ्यातून वाचलेल्या रशियन लेखक डॅनिल ग्रॅनिन एक हृदय पिळवटून टाकणारे वर्णन सांगितले आहे
” एक तीन वर्षाचे मुल जेव्हा वारलं तेव्हा एका आईने त्या मुलीचे तुकडे खायला घालून आपल्या दुसऱ्या मुलीला वाचवले होते “
परिस्थिती एवढी भीषण होती की शहरातून रोज हजारो मृतदेह ऑथॉरीटेज कडून ट्रक मधून भरून नेले जात होते.
एक दिवस वॉर फ्रंटवरून लढून आलेला सैनिकाला हे हृदयाद्रावक दृश्य पाहून धक्काच बसला. सरकारी अधिकारी उचलणारे मुडद्यांचा ढिगाऱ्याकडे हताशपणे पाहत असताना त्याला एका बॉडीच्या पायात ओळखीचा बूट दिसला. तो बूट अगदी सेम टु सेम त्याने आपल्या बायकोला गिफ्ट केलेल्या बुटासारखाच होता. हडबडलेल्या सैनिकाने लागलीच पुढे गेला आणि बॉडीची खात्री करण्यासाठी त्याने चेहरा पहिला. सैनिकाला ज्याची भीती होती तेच झालं होतं. त्या मृतदेहांच्या ढिगाऱ्यातलं ते शरीर त्याच्या बायकोचे होते.
त्याला आता काहीहि करून मृतदेह ताब्यात घ्यायचा होता. मात्र डेड बॉडी जमा करणारी ती मंडळी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यांना त्यांचे काम संपवायचे होते. बराच वेळ गयावया, विनंती आणि बाचाबाची झाल्यानंतर त्याला यश मिळाले. त्याच्या पत्नीची बॉडी घेऊन खिन्न मनाने व अतिशय जड पावलाने तो त्याच्या घराकडे निघाला. आपण आपल्या बायकोचा अंतिम संस्कार करू शकतो एखाद्या लावारिस व्यक्ती सारखं तिचं होणार नाही, असा विचार त्याचा मनात डोकावला असेल.
पण तेवढयात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली…
त्याच्या बायकोने डोळे उघडले. तिच्या हृदयाची धडधड अजूनही चालू असते. हळूहळू तिच्यावर उपचार करत तो तिला वाचवतो. पुढे ती पूर्णपणे बरी होते. पुढे दुसरं महायुद्ध संपतं.
आणि आठ वर्षानंतर ती महिला एका गोंडस बाळाला जन्म देते.
आणि ते बाळ दुसरं तिसरं कोण नसून आजचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन होतं.
२०१४ मध्ये प्रकाशित ‘हार्ड चॉईस’ या पुस्तकात हिलरी क्लिंटन यांनी पुतिन यांनी स्वतः त्यांना ही गोष्ट सांगितली असल्याचं म्हटलं आहे.