1,044 लोकांच्या साक्षी आणि 500 व्हिडीओ कॅसेट : असा झालेला राजीव गांधींच्या हत्येचा तपास

आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे रोजी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. 21 मे 1991 रोजी श्रीपेरंबदूर येथे आत्मघाती हल्ला करत ही हत्या करण्यात आली.

मात्र या हत्येचा तपास कसा होता. इंदिरा गांधींची हत्या आणि महात्मा गांधींची हत्या यात आणि राजीव गांधींच्या हत्येत काय फरक होता व याचा तपास कोणत्या पातळ्यांवर कसा कसा होत गेला ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे.

झालेलं अस की राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर लिट्टे या आतंकवादी संघटनेचं नाव समोर आलं. पण हत्या कोणी केली, कशी केली यात कोण कोण होतं हा तपासाचा विषय होता. हा तपास कोण करणार? तपासप्रमुख कोण असणार यावर उच्चस्तरिय बैठका सुरू झाल्या. पण झालेलं अस की लिट्टेच्या भितीने चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांनी यातून पळ काढला. कारण त्यांना आपल्या कुटूंबाची भिती वाटत होती.. 

अशा वेळी एक नाव समोर आलं. ते म्हणजे आयपीएस अधिकारी डीआर कार्तिकेयन. कार्तिकेयन तेव्हा हैद्राबादमध्ये पोस्टिंगला होते. आंध्रच्या सीआरपीएफ चे आयजी होते. कार्तिकेयन यांना तत्काळ चैन्नईला बोलवून घेण्यात आलं. तपासाची सुत्र हातात घेणार का विचारताच एका क्षणात त्यांनी होकार कळवला. 

त्यांना जेव्हा नंतरच्या काळात माध्यमांनी विचारलेलं की तूम्हाला का भिती वाटली नाही तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं की, प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचं आहे. कुटूंब किंवा स्वत:च्या जीवाच्या भितीसाठी मी इतक्या महत्वाच्या केसपासून दूर गेलो नसतो. 

झालं पण तसच कार्तिकेयन यांनी तपासाची सुत्र हातात घेतली. एसआयडी स्थापन करण्यात आली व यासाठी एक स्वतंत्र कंट्रोल रूम उभारण्यात आली. एक स्वंतत्र टोल फ्री क्रमांक देवून ज्यांना ज्यांना या घटनेबद्दल काहीही माहिती असेल त्यांनी ती माहिती टोल फ्रि क्रमांकावर सांगण्याची सूचना करण्यात आली.. 

आत्ता सुरू झाला तो हत्या घडवण्याचा प्रवास…  

तारीख होती 21 मे 1991. लोकसभेच्या निवडणूका चालू होत्या व त्या प्रचारासाठी राजीव गांधी चैन्नई एअरपोर्टवर रात्री ठीक आठ वाजून वीस मिनटांनी उतरले. त्यानंतर आपल्या बुलेटप्रुफ गाडीने ते श्रीपेरंबदूरला जाणार होते. राजीव गांधींच्या स्वागतासाठी श्रीपेरंबदूर येथे म्यूझिकल प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. पण इथेच पहिला प्रॉब्लेम झालेला. तो म्हणजे 17 मे रोजी स्थानिक प्रशासनाला राजीव गांधींच्या दौऱ्याची माहिती देण्यात आलेली होती. घटनास्थळावर एकूण 300 पोलीसांचा फौजफाटा उपस्थित होता तर आयजी आरके राघवन यांच्याकडे सिक्युरिटीची जबाबदारी देण्यात आली होती. 

राजीव गांधींच्या गळ्यात फुलांचा हार घालण्याचा प्रयत्न करत असताना हा बॉम्बस्फोट झालेला. तिथे कोणती चूक झाली होती. तर एकूण 23 लोकांना पोलीसांकडून हार घालण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या 23 जणांमध्ये कॉंग्रेस पक्षाची स्थानिक कार्यकर्ती लता व आणि त्यांची मुलगी कोकीला यांच नाव नव्हतं. पण शेवटच्या दोन दिवसात त्यांच नाव जोडण्यात आलं. पोलीसांकडून देखील त्यांच्या नावाला परवानगी देण्यात आली होती. याच वेळी ग्रीन आणि ऑरेंज रंगाची सलवार घातलेली, डोळ्यांवर चष्मा लावलेली एक महिला देखील या लता सोबत उपस्थित होती. 

या महिलेसोबत हरिबाबू नावाचा फोटोग्राफर व इतर तीन जण देखील कार्यक्रम स्थळावर उपस्थित होते.  हरिबाबू. ती सलवार कुर्ता घातलेली मुलगी, तीन जणांपैकी दोन महिला ज्यांनी साड्या घातल्या होत्या. हे सर्व लोक एकच प्रयत्न करत होते तो म्हणजे राजीव गांधींना हार घालणाऱ्या लोकांच्यात कस घुसता येईल. 

पोलीसांनी 25 लोकांनाच परवानगी दिली होती. त्यांचे बॅकग्राऊंड देखील चेक करण्यात आलं होतं. घटनास्थळावर सलवार कुर्ता घातलेली हातात हार घेवून रांगेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मुलीवर पहिला संशय आलेला तो अनुसूईया नावाच्या लेडिज कॉन्स्टेबलला. या कॉन्स्टेबलने तीला हटकलं पण होतं… 

त्याचवेळी राजीव गांधींची बुलेटप्रुफ गाडी कार्यक्रम स्थळावर आली. आत्ता पोलीस क्लियरन्स मिळालेल्या लोकांनी राजीव गांधींना हार घालायचा होता. इथे त्या मुलीला प्रवेश करायचा होता. पण इतक्यात म्युझिक थांबवून लाऊडस्पीकरवरून घोषणा झाली. ज्या ज्या लोकांना राजीव गांधींना हार घालण्याची इच्छा आहे त्यांनी हार घालावा.. 

यामुळे कन्फ्यूजन झालं. कारण फक्त क्लियरन्स मिळाल्यांना हार घालायचे होते. पण सूचनेचा फायदा घेवून ती मुलगी हार घेवून पुढे आली. तेव्हा त्याचं लेडीज कॉन्स्टेबलने तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण या गोष्टीकडे नजर गेली ती राजीव गांधींची. राजीव गांधींनी हातानेच तीला हार घालूदे अस खुणावलं. ती तरुण पुढे आली व तिने हार घातला. आत्ता आशिर्वाद घेण्यासाठी ती वाकली अन् त्याचवेळी मोठ्ठा धमाका झाला.

बॉम्बस्फोट झाला आणि एका क्षणात सर्वकाही संपलं..  

रात्रीचे दहा वाजून वीस मिनिटे झाली होती.

या आत्मघातकी हल्ल्यात एकूण 18 जण दगावले होते. यामध्ये राजीव गांधी, राजीव गांधींचे खाजगी सुरक्षा रक्षक, एसपी, पत्रकार आणि कार्यकर्ते होते. राजीव गांधींच शव पोस्टमार्टमसाठी घेवून जाण्यात आलं. या सगळ्या काळात सोनिया गांधींना त्यांच्या मुलांसहित चैन्नईला आणण्यात आलं होतं.. 

आत्ता तपास कसा झाला, घटनास्थळावर तामिळनाडू फॉरेन्सिक टिम पोहचली होती. त्यांनी संशयास्पद गोष्टी ताब्यात घेतल्या होत्या. ज्यामध्ये निळ्या रंगाचे फाटलेले कपडे व त्याला जोडण्यात आलेलं इलेक्ट्रॉनिक्स वायरच सर्किट दिसलं होतं. या सर्किटला ती लेयर होते जे एका जॅकेटमध्ये ठेवण्यात आलेलं. 

कापड डेनिमचं होतं. सोबत हिरव्या आणि ऑरेज रंगाचे फाटलेले कपडे देखील होते. या कपड्यांमध्ये रक्त आणि मांस होतं. त्यांचे नमुने ठेवण्यात आले होते. सेट्रल फोरेन्सिक टिम, एनएसजी आणि तामिळनाडू स्टेटची फॉरेन्सिक टिम अशा तिन्ही टिमने मिळून इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 9 व्होल्टची बॅटरी हस्तगत केलेली.. 

कपड्यांवर लागलेल्या रक्ताचे आणि मांसाचे सेम्पल डिएनए टेस्टसाठी पाठवण्यात आली. CCMB हैद्राबादच्या तपासानंतर कळालं ज्या मुलीची बॉडी मिळाली होती व सर्किटवर, कपड्यांवर जे मांस मिळालेलं ते नमुने एकच आहेत. त्यामुळे सापडलेल्या बॉ़डीपैकी नेमकी आत्मघातकी हल्ला करणारी तरूण पोलीसांना आयडेंटीफाय करता आली. त्यानंतर हरिबाबूचा कॅमेरा चेक करण्यात आला. यातील फोटो सुरक्षित होते. हे फोटो तपासण्यात आले. 

या फोटोंमध्येच ग्रीन आणि ऑरेंज कलरचे कपडे घातलेली ती मुलगी दिसून आली.  

घटनेच्या मुळाशी जात असताना पाळेमुळे मिळाली ती श्रीलंकेच्या जाफना मध्ये. 1990 मध्ये श्रीलंकेतील जंगलात लिट्टे प्रमुख प्रभाकरण सोबत सुब्रह्मण्यम, मुथुराजा, मुरूगन आणि शिवरासन  यांनी राजीव गांधींच्या हत्येची योजना आखली होती व त्यासाठी धून या मुलीची मदत घेण्यात आली. 

धनूचा तपास लागल्यानंतर एकामागून एक साक्षीदार मिळवण्यात आले.

एसआयटीच्या टिमने सहा महिन्याच्या आत 1 हजार 44 लोकांच्या साक्षी नोंद केल्या. एकूण दहा हजार पानांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या होत्या. राजीव गांधींच्या फक्त तामिळनाडूच्याच दौऱ्याचे व्हिडीओ कॅसेट पाहून फायदा नव्हता. त्यांच्या प्रत्येक दौऱ्याच्या सोबत इतर ठिकाणच्या अशा मिळून तपास टिमने एकूण 500 व्हिडीओ कॅसेट पाहिले. त्यातील एकूण 1 लाख लोकांना आयटेंडिफाय करत हस्तकांपर्यन्त पोहचण्याचा प्रयत्न केला. 

20 मे 1992 रोजी म्हणजे एक वर्ष होण्याचा बरोबर एक दिवस अगोदर तपास यंत्रणेने घटनेतील सर्वच्या सर्व 26 आरोपींविरोधात चार्जशीट कोर्टात सादर केली. यामध्ये त्यांनी 26 आरोपींच्या विरोधात एकूण 251 आरोप लावले होते. तर 288 साक्षिदारांनी कोर्टामध्ये साक्षी दिल्या. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.