स्वप्नं मुख्यमंत्रीपदाची होती, पण आज शशिकला संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यात…

घटना पहिली, १८ ऑक्टोबरची. न्यायाधीश ए. मुरुगास्वामी यांच्या अध्यक्षतेखालच्या चौकशी आयोगानं आपला अहवाल सादर केला. या अहवालात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी चार जणांची चौकशी करण्याची शिफारस करण्यात आलीये. या चार जणांपैकी एक नाव आहे, व्हीके शशिकला.

घटना दुसरी, १९८७ मधली. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजीआर यांचं निधन झालं, त्यांच्या अंत्ययात्रेवेळी जयललिता तब्बल २१ तास एमजीआर यांच्या डोक्याजवळ बसून होत्या. मात्र जेव्हा अंत्ययात्रा निघाली तेव्हा जयललिता यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. जयललिता एकट्या पडल्या, तेव्हा त्यांच्यासोबत एकच व्यक्ती ठामपणे उभी राहिली, व्हीके शशिकला.

 तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता अम्मा म्हणून प्रसिद्ध होत्या तर, शशिकला चिनम्मा. ही जोडी जमली कशी ? फुटली कशी ? आणि आजही शशिकला चर्चेत का असतात ? हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.