पहिली पत्नी सोडून गेल्यांनतर बालविधवेशी लग्न केलं आणि मुंशी प्रेमचंदांचं आयुष्याचं पालटलं

गोदान, सदन यांसारख्या कादंबर्‍या आणि ईदगाह, पूस की रात यांसारख्या उत्कृष्ट कथा लिहिणाऱ्या प्रेमचंद यांच्याबद्दल माहिती नाही असा साहित्य रसिक भेटणार नाही. प्रेमचंद यांच्या कथा आजही तेवढ्याच लागू होतात जेवढ्या त्या लिहलेल्या काळात होत होत्या. 

पण प्रेमचंद यांच्या यशामागे आणखी एक व्यक्तिमत्त्व होते जे इतिहासाच्या पानात हरवून गेले. 

हे व्यक्तिमत्व प्रेमचंद यांच्या अनेक कथांमधील प्रेरणांबरोबरच भारतातील पहिल्या महिला लेखांकांपैकी एक होते.

या व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्याआधी मुन्शी प्रेमचंद यांच्या आयुष्याबद्दल थोडं सांगतो. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांची पहिली बायको त्यांच्यापेक्षा वयाने मोठी होती. प्रेमाचंद आणि भांडखोर स्वभवाच्या असणाऱ्या त्यांची यांचं कधी पटलंच नाही. आपल्या या लग्नाच्या दुःखद अनुभवाबद्दल लिहताना प्रेमचंद सांगतात 

‘वडिलांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ठेच खाल्ली आणि केवळ स्वतःच नाही तर मला बुडवले. मी विचार न करता लग्न केले”. 

लवकरच त्यांची पहिली बायको त्यांना सोडून गेली.

आता आर्य समाजी असलेल्या प्रेमचंद यांनी विधवेशीच लग्न करण्याची प्रतिज्ञा केली होती.

आणि त्यानुसार त्यांनी शिवरानी देवी यांच्याशी लग्न केलं. आता मात्र प्रेमचंदना मनासारखा जोडीदार मिळला  होता.शिवराणी यांच्या  सुरुवातीच्या वर्षाबद्दल फारसे माहिती नाही. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पण तीन महिन्यांतच त्या विधवा झाल्या. आणि मग पुढे त्यांचे प्रेमचंदयांच्याशी दुसरे लग्न झाले.शिवराणी त्यांच्या चरित्रात सांगतात की त्या लग्नाआधी अशिक्षित होत्या. पण पुरोगामी विचारवंत असलेल्या प्रेमचंदांनी त्यांना भाषा आणि कथालेखन कौशल्य शिकवले. 

अनेकदा प्रेमचंद इंग्रजी वर्तमानपत्रे वाचायचे आणि शिवराणी यांना अनुवाद वाचायला लावयाचे.  

कधी कधी शिवरानी यांनी लिहलेल्या रचना प्रेमचंद वाचायचे. या वातावरणात शिवराणी यांची पुस्तकांची आवडही वाढली. पहिल्या लग्नातील भांडणांना कंटाळलेल्या प्रेमचंद यांनाही हा बदल मानवत होता.

सुखी कौटुंबिक वातवरणात त्यांच्या अनेक रचना बहरत होत्या.

पुढे जाऊन शिवराणीही पट्टीच्या लेखिका झाल्या. शिवरानी यांच्या लेखनानं खरी उंची गाठली 1924 साली.  ‘त्यांची ‘साहस’ ही कथा ‘चांद’ या मासिकात छापून आली. प्रेमचंद ज्या मासिकात काम करत होते त्याच मासिकात त्यांची कथा पब्लिश झाली होती .ज्या काळात भारतातील स्त्रीची ओळख तिच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांमागे दडलेली होती, तेव्हा एक पुरोगामी लेखक म्हणून प्रेमचंद यांनी शिवराणी यांना कथा लिहिण्यास प्रोत्साहित केले.

 शिवराणी यांनी त्यांच्या हयातीत एकूण ४६ लघुकथा लिहिल्या. ‘नारी हृदय’ आणि ‘कौमुदी’  या कथासंग्रहांमध्ये या कथा लिहल्या गेल्या मात्र  काही आजही संकलित नाहीत. 

कौमुदीचे पहिल्या छपाईनंतर सत्तर वर्षांनी पुनर्मुद्रण झाले असले तरी ‘नारी हृदय’ आजही उपलब्ध नाही. ज्यात तिने ‘प्रेमचंद घर में’ या चरित्रात स्त्रीवादाचे अचूक चित्रण केले आहे. प्रेमचंद यांच्या काही अज्ञात पैलूंवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

लेखनासोबतच शिवराणी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय होत्या. १९२१ मध्ये, प्रेमचंद यांनी गोरखपूरमधील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि असहकार चळवळीच्या अंतर्गत लेखनात पूर्णपणे सक्रिय झाले, तेव्हा शिवराणी यांनी आयुष्यभर दागिने न घालण्याची शपथ घेतली.

१९४४ पर्यंत त्या लेखनात सक्रिय होत्या, परंतु त्यानंतरच्या त्यांच्या जीवनाची माहिती अजूनही रहस्याच्या चादरीत आहे. शिवराणी यांनी ५ डिसेंबर १९७६ रोजी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.