तर भारतावर मराठ्यांचं साम्राज्य असतं म्हणणाऱ्या शशी थरुर यांचा इतिहास काही साधा नाही

आपल्या गावात जरा कुठं माणूस वाकड्या रस्त्याला गेला तर माणसं म्हणतात बाई आणि बाटलीचा नाद लय वाईट. आता बाटलीचं माहित नाही पण या माणसाचा उल्लेख केला की लोकांना फक्त त्यांच्या आजूबाजूला असलेल्या महिलाच आठवतात. बरं तुमचं आमचं जाऊदे ओ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण त्यांच्या पत्नीचा उल्लेख ५० करोडची गर्लफ्रेन्ड असा केला होता.

आता हा मुद्दा सांगितल्यावर लक्षात आलं असेल आपण कोणाबद्दल बोलतोय. तर हा माणूस आहे शशी थरूर.

त्यांच्या आजूबाजूला असणारी नेहमीचीच महिलांची गर्दी आणि त्यांचं टॉप क्लास इंग्लिश यापलीकडे हा माणूस लय बाप आहे. ट्विटरवर पहिल्यांदा कोणत्या भारतीयाला १० हजार फॉलोअर्स झाले असतील, तर ते शशी थरूरच. ट्विटरवर पहिल्यांदा कोणत्या भारतीयाने १ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला असेल तर ते पण शशी थरूरच. २०१३ पुर्वी मोदींसह कोणत्या भारतीय नेत्याचे सर्वाधिक फॉलोअर्स होते तर ते पण शशी थरूरच.

पण विषय फक्त ट्विटरचा नाही. याच माणसाने थेट इंग्लंडमध्ये जाऊन ब्रिटीशांचा रितसर हिशोब मांडला, याच माणसाने सांगितलं की, ब्रिटीश भारतात आले नसते तर भारतावर मराठ्यांचं साम्राज्य असतं. शशी थरूर ही नेमकी किती हाय लेवलची व्यक्ती आहे, हे समजून घेण्यासाठीच हा व्हिडीओ.

Leave A Reply

Your email address will not be published.