सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे पक्ष, चिन्ह, शिवसेना भवन, सेना पक्षप्रमुखपद शिंदेंना मिळणार का ?
एकनाथ शिंदेना दिलासा तर उद्धव ठाकरे अडचणीत. एका वाक्यात सांगायचं, तर कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सर्व माध्यमांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सांगितलेला हा सार. आता निवडणूक आयोगात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं एकनाथ शिंदेना दिलासा मिळाल्याचं सांगण्यात आलं खरं, पण याचा शिंदेना फायदा काय होणार? निवडणूक आयोगामुळे संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेंच्या ताब्यात येणार का?
पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह यासोबत शिवसेना भवन देखील एकनाथ शिंदेकडे येवू शकतं का? एकनाथ शिंदे हे भविष्यातले शिवसेनाप्रमुख ठरतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. पण आता नेमकं पुढे काय होणार ? आणि राज्याच्या राजकारणाची नेमकी काय दिशा ठरणार हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
Related Posts