एकेकाळी ‘बाहुबली’ देवाचं नावं होतं, पण राजकारणात त्याची दहशत निर्माण झाली

मागच्या काही वर्षात उत्तरप्रदेश निवडणुकीचा विषय निघाल्यावर एक प्रश्न विचारण्यात येतो. यंदा किती बाहुबली नेते निवडणूक लढविणार आहेत. उत्तरप्रदेश, बिहार आदी राज्यात बाहुबली नेत्याचा बोलबाला असतो.

 बाहुबली हा शब्द धार्मिक बाबींशी जोडण्यात येत होता

बाहुबली सिनेमा सिरीज झाल्यानंतर बाहुबली या शब्द अनेकांच्या जिभेवर राज्य करत असल्याचे आपण पाहतोच आहे. मात्र शब्दाचा अर्थ वेळोवेळी बदलत गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

सगळ्यात पहिले बाहुबली हा शब्द हनुमानजी यांच्याशी जोडला गेल्याचे पाहायला मिळते.

बाहुबलीचा अर्थ होतो ज्याचा बाहुत प्रचंड ताकत असते. बलवान, शक्तिमान आणि पराक्रमी असा होतो. कुठल्याही सामान्य माणसाकडे हि शक्ती नसेल ती बाहुबलीकडे असते असा अर्थ याचा होतो.

जेव्हा ताकत हा विषय आपल्यापुढे येते त्यावेळी सर्वात अगोदर आठवतात ते हनुमान जी. हनुमानाने संजीवनी बुटीसाठी पूर्ण डोंगर आपल्या हातांनी उचलला आणला होता असा उल्लेख आपल्या धार्मिक ग्रंथात आढळून येतो.

बाहुबली नेते

वर म्हणल्याप्रमाणे उत्तरप्रदेश, बिहार राज्यात अनेक नेत्यांना, आमदारांना बाहुबली हा शब्द वापरला जातो. एक आर्थनाने नकारात्मक म्हणनूच हा शब्द वापरला जातो. गुन्हेगारीच्या दुनियेतून राजकारणात आलेले लोक बाहुबली हे विशेषण आवडीने लावतात. माध्यमे सुद्धा अशा नेत्यांपुढे बाहुबली हा टॅग लावायला विसरत नाही.

२००६ मध्ये ओमकारा हा चित्रपट आला होता. तो चित्रपट गुन्हेगारी-राजकारणावर आधारित होता. असं सांगण्यात येत की, याच सिनेमानंतर गुन्हेगारीतून राजकारणात आलेल्या नेत्यांना बाहुबली असे विशेषण लावण्यात येऊ लागले. पण हे नाव अनेक नेत्यांनी हि टॅग लाईन प्रतिष्ठेची बनवली.

मध्यंतरी साउथचा बाहुबली सिनेमा आला आणि शब्दाला अजून धार मिळाली

२०१५ मध्ये आलेला बाहुबली सिनेमा पहिला आणि तो शब्द अधिकच डोक्यात घट्ट बसला. चित्रपटाने आपल्या सेटची भव्यता, सिनेमॅटोग्राफी, अॅक्शन आणि सस्पेन्सने मन जिंकले. चित्रपटातील टर्निंग पॉइंट संपला, शक्तिशाली बाहुबलीबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली आणि ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ हा प्रश्न उरला. लोक ‘बाहुबली २’ ची वाट पाहू लागले होते.

या चित्रपटाने बाहुबली या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. लहान मुलांनाही स्वतःला बाहुबली म्हणवायला आवडायला लागले.

यामुळे सर्वच पक्षांना बाहुबली नेते आवडतात

पैशाची शक्ती

मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असुद्या तिला किती पैसे लागतात हे सर्वश्रुत आहे. यामुळे सध्याच्या घडीला तरीही सर्वच उमेदवार हे आर्थिक बलाढ्य असणारेच उमेदवार पाहतात. तर काही बाहुबली नेते असे आहेत जे निवडणूक लढवण्याचा खर्च उचलण्यासोबतच पक्षनिधीसाठी मदत करतात.  पैशांमुळे राजकीय पक्ष बाहुबली उमेदवाराला अधिक पसंती देत असल्याचे सांगण्यात येते.

धार्मिक ध्रुवीकरण

बाहुबली नेते धर्म आणि जात यावर प्रभाव टाकतात. मग ते कुठल्याही धर्माचे, जातीचे का असेना. बाहुबली कुठल्याही धर्माचा, जातीचा असुद्या त्याला सोबत घेतले जाते. मुख्य म्हणजे लोक पाठिंबा सुद्धा चांगलाच देतात.

बाहुबली नेते राजा भाऊ म्हणतात 

उत्तरप्रदेश मध्ये सध्या प्रामुख्याने बाहुबली नेता म्ह्णून  राजा भैया या नेत्याचे नाव घेण्यात येते. त्यांना बाहुबली नेते म्हणजे काय असं एकदा विचारण्यात आले होते. त्याने दिलेले उत्तर सगळ्यानांच बुचकळ्यात पडणारे आहे. बाहुबली नेता म्हणजे लोकशाही मार्गाने जनतेच्या हक्कांसाठी लढणारा लढाऊ नेता. त्यांचे मते ते एक लढाऊ नेते आहेत आणि त्यांच्या सोबत कोणी कट्ट्पा सुद्धा नाही.
याआधीही जनतेच्या हक्कासाठी लढायचो आणि यापुढेही लढत राहतील असं ते म्हणतात.

आता या बाहुबली नेत्यांचं  लोण इतर राज्यात पसरू नये म्हणजे झालं. कधी काळी धार्मिक बाबींशी जोडण्यात येणारा चांगला शब्द सर्रास राजकीय गुन्हेगारांना वारपण्यात येऊ लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.