ब्रेकअप नंतर काय काय होतं ?

आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी, एक रोमँटिक रिलेशनचा Break Up अतिशय धक्कादायक असतो. आपल्याला दुखःप्रती वाटते आणि आपल्याला असे वाटू शकते की आपण पुन्हा कधीही प्रेम करू शकणार नाही, पण त्या भ्रामक भावनांचे फक्त भावनिक लक्षण असतंय. 

जोपर्यंत त्यांना कोण सोडून जात नसतय तो पर्यंत त्या लोकांना लय पॉसिटीव्ह गोष्टय असं वाटत असतंय. पण ज्याच्या बरोबर झालंय त्याचीच लागलेली असतीय.

आपल्या भागीदाराने आपले हृदय खंडित केल्यानंतर आपल्या शरीरात आणी मनात होणारे काही बदलावं खालील प्रमाणे…

 • तुमच्या शरीराला जे खुश ठेवत असतं “न्यूरोट्रांसमीटर” हे तुमच्या शरीरातून काढून घेतलं जात असत. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमच्या शरीरातील डोपामाइन, ऑक्सीटॉसिन आणी सेरोटोनिनच प्रमाण वाढलं असत, पण ब्रेकअप नंतर ऑक्सीटॉसिनच्या कमीमुळे शारीरिक दर्द जाणवू लागतो.
 • ब्रेकअप नंतर वजन कमी होणं ही सगळ्यात कॉमन गोष्ट आहे कारण तुमचं तुमच्या आहारावर अजिबात लक्ष नसतंय.
 • ब्रेकअप नंतर निद्रानाशाचा (इन्सोम्निया) चा आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण असं की आपली स्वप्न, विचार तुटलेले असतात, भूतकाळात घडलेल्या गोड गोष्टींची आठवण आणि आपल्या प्रेयसीला परत मिळवण्याची प्रबळ इच्छा तुम्हाला झोपू देत नसते.
 • काही शात्रज्ञानी ब्रेकअप झालेल्या लोकांच्या चेहऱ्याच्या अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवलं की ते एका डिवाइस मध्ये त्या लोकांच्या डोळ्यातून येणारी नेगेटिव्ह विद्युत गतिविधी मोजू शकत होते जी सामान्य डोळ्यांनी दिसून येऊ शकत नाही.

सगळं ठिक चालू होतं, पण एके दिवशी ती ‘जेवलो’ म्हणाली आणि…. 

प्रेमाची कोड लॅंग्वेज माहित आहे का ?

 • तुम्ही स्वतः कोण आहेत हे विसरू लागता. तुमच्या मध्ये एवढी निगेटिव्ह एनर्जी निर्माण झाली असते की तुम्हाला आपण सोडून गेलेल्या व्यक्तीशिवाय काहीच नाही असं वाटू लागत.
 • तुम्ही जर या इमोशनल त्रासातून बाहेर पडण्यासाठी एक टेम्पररी हुकअप (सेक्स ड्राईव्ह) चा विचार करत असाल तर तुमच्या कडून हे होत नसतंय.
 • तुमची लाईफ रिस्क वर असते. जे लोक डिप्रेशन मध्ये गेलेले असतात त्यांना आत्महत्या करण्याच्या, किंवा आत्महत्या कशी करावी किंवा काहीजण स्वतःला मारून सुद्धा घेतात.
 • ब्रेकअप नंतर भावनिक ताण आपल्या शरीरात जमा होतात आणि तणाव संप्रेरक कॉर्टिसॉलच्या उच्च पातळीमधून प्रतिबिंबित होतो. कॉर्टिसॉलमुळे तुमचे हृद्यविकार वाढते, आपण जलद श्वास घेतो आणि आपले रक्तदाब अधिक असते हे खूप नकारात्मक आरोग्य परिणाम आहेत, उदाहरणार्थ हृदयविकाराचा एक उच्च धोका, आणि ते दीर्घकालीन झाल्यास त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

पण वरती झाली ती सगळी शास्त्रीय कारण आहेत. त्याच्याशी कोणाला घेणं देणं नसतय कारण ज्याची त्याची बरोबर लागलेली असते. वरची कारण आपल्या भाषेत सांगायची झाली तर ती अशी आहेत.

 • आपण सगळे प्रेमाच्या सवयीचे गुलाम झालेले असतो..तुम्हाला माहित असतंय की दररोज तुम्हाला झोपेच्या आवाजात एकदम फ्रेश असं “गुड मॉर्निंग, उठल का माझं पिलू” असा फोन येणार असतोय पण तो अचानक बंद झालेला असतोय. 
 • तीच सगळं यावरून झाल्यावर मी आज कशी दिसते, तिने काय घातलं आहे हे दाखवायला येणारा व्हिडीओ कॉल बंद झालेला असतोय. शनिवार,रविवार मित्रांची बैठक का तिच्या बरोबर बाहेर फिरायला जाण ही द्विधा मनस्थिती आता बंद झालेली असते, प्रत्येक शनिवार, रविवार तुम्ही मित्रांच्यात घालवत असताय.
 • रविवारी मुव्हीला बाजूच्या सीटवरच्या राकट हाताला स्पर्श झाल्यावर जाणीव होती की ते आपलं रूममेट/मित्र असतंय.
 • रस्त्याने फिरत असताना अचानक कोणीतरी कोणाला तरी आवाज देत आणि अचानक तुमच्या लक्षात येत की आपण आपल्याला मुलगा किंवा मुलगी झाली की हे नाव ठेवायचं असं ठरवलं असत. तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक जोडी मध्ये तुम्ही तिला बघू लागता, कदाचित ती तर नाही ना तिच्या प्रियकरा, नवऱ्याबरोबर ह्या भासात तुम्ही राहत असताय.

न भेटलेल्या, प्रेमाची गोष्ट –

मधुबाला आणि दिलीपकुमारच्या प्रेमातला शाकाल…

 • मूवीमध्ये एखादा कामुक सीन पहिल्यानंतर तुम्ही तिला तिच्या नवऱ्याबरोबर किंवा नव्या प्रियकरा त्या अवस्थेत इमॅजिन करू लागता आणि इथे तुमच्या त्रासात अजून गंभीर अशी भर पडू लागते.
 • तुम्ही फेसबुक वर फेक अकाउंट काढून तिला फोल्लो करायला चालू करत असताय, कारण लग्न झालं असेल तर तिच्या नवऱ्याला कळू नये म्हणून तिने तुम्हाला ब्लॉक केलं असतंय आणि जर दुसऱ्या प्रियकराकडे गेली असेल तर त्यानं जबरदस्ती तुम्हाला ब्लॉक करायला सांगितलं असतंय.
 • पण ह्या फेसबुकी चाळ्यामुळे तुम्हाला अजून त्रास होत असतोय याच कारण असं की तुम्ही तिला हनिमूनला स्वित्झरलँडला घेऊन जाण्याचं स्वप्न दाखवलं असतं आणि तिने बाली नायतर सिंगापूरमध्ये नवऱ्याला टॅग करून “विथ स्वीट हबी” असं खाली लिहल असतं आणि नव्या प्रियकराकडे गेली असेल तर तिने गोवा, कोकण मध्ये फेबु चेकइन केलं असतंय.
 • अशावेळी तुम्ही डेटिंग अँप सारखे विचार करू लागता पण आपण आरशात थोबाड पाहिलं की परत गप्प बसता कारण तुम्ही एवढे “यो” टाईप दिसायला नसताय. शेवटी “पालखी” मध्ये जाऊन ओल्ड मोंक घेऊन बसता आणी तिचे मोबाईल मधले फोटो आणी वॉट्सअँपवरचे ते जुने रोमँटिक असे चॅट वाचायला लागताय.

एक मात्र नक्की ब्रेकअप साठी चुकी तुमची असो वा समोरच्याची त्रास हा दोघांना होणार असतो. परिस्थिती नुसार तो क्षणिक असू शकतो किंवा दीर्घ असू शकतो. एकदाच मिळालेला जन्म कसा कारणी लावायचा हा ज्याच्या त्याच्या प्रश्न आहे कारण आयुष्य हे कोणासाठी थांबत नसतंय.

आमचे जवळचे मित्र आहेत ते मला कायम सांगतात “२-३ प्रेत जळताना बघितली की मरणाची भीती जाते मालक सरतेशेवटी आपण कोणाला रडायला खांदा देतोय आण आपल्याला शेवटच्या प्रवासाला खांदा देतय यावर सगळं आहे एकंदरीत”.

असो जिथं असल तिथं सुखी रहा एवढच म्हणू शकतोय आपण…!!!

यावर एकच उपाय अस काहीतरी लिहायचं, बोलभिडूवाले छापतात ! फक्त लिखाण ब्रेकअप सारखचं मनापासून पाहीजे.

सारवासारवी –  

सदर लेख हा पुरुषाच्या नजरेतून लिहला गेला आहे. स्त्रीच्या नजरेतून मतभिन्नता असू शकते. कारण सदर मुलगी सोडून जाण्याचे कारण वेगवेगळे असू शकते जसे की सामाजिक दडपण, आई-वडिलांविषयीचा आदर, प्रेमात तुम्ही तिच्या स्वातंत्र्यावर आणलेल्या गदा किंवा तुम्ही सोडून खरच दुसरी व्यक्ती आवडू लागणे इत्यादी इत्यादी. प्रेम हे जबरदस्ती करून बांधून ठेवता येत नसतंय याची जाणीव असावी. 

 • ऋषिकेश चव्हाण. 
Leave A Reply

Your email address will not be published.