कपड्यांच्या दुकानात असे आरसे लावले जातात, ज्यातून चित्रीत केले जातात अश्लिल व्हिडीओ.

शॉपिंग मॉल मधील ट्रायल रूम मध्ये महिलांना नेहमी सावधानता बाळगावी लागते. आपल्याकडे कोणी चोरून बघत नसेल ना किंवा आपला कोणी व्हिडीओ बनवू नये म्हणून महिला ट्रायल रूम मध्ये जाताच कोपरान कोपरा तपासून पाहतात. तरिही महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी छुप्या कॅमेऱ्याचा वापर केला जातोच.
ज्या आरशाच्या मदतीने महिला आपल्या कपड्यांची फिटिंग तपासून पाहत असतात त्या आरशा सोबत छेडछाड करून असे व्हिडीओ बनवत असतो. अशा आरशांना वे टू मिरर असे म्हणतात. वे टू मिररचा आधार घेवून आरश्याच्या पाठीमागे एखादी व्यक्ती तुम्हाला सहज पाहू शकते. मात्र तुम्ही त्या व्यक्तीला पाहू शकत नाही.

ट्रायल रुममध्ये असे आरशे लावण्यात आले आहेत का यासाठी महिलांनी पुढील गोष्टी कराव्यात. 

१) आरशाला बोट टेकवून पाहणे. 

आपल्या बोटाने आरशाला स्पर्श करायचा. जर बोट आणि त्याच्या प्रतीमेमध्ये अंतर असेल तर आरसा व्यवस्थित आहे म्हणून समजायचे. पण बोट आणि त्याच्या प्रतिबिंबात अंतर नसेल तर त्यात काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या बाजूने तुम्हांला कोणी तरी बघत असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे महिलांना अशा वेळेस सावध राहण्याची गरज आहे.

२) फ्लॅश लाईट चा वापर. 

सामान्य आरशावर आपण फ्लॅश लाईट मारली तर लाईट रिफ्लेक्ट होते. पण जर का टू-वे-मिरर वर फ्लॅश मारला तर लाईट रिफ्लेक्ट होऊ शकत नाही. आपल्याला त्याच्या पलीकडील असणाऱ्या गोष्टी दिसू शकतात. त्यामुळे महिला स्वतःच संरक्षण करू शकतात.

३) नॉक करुन पाहणे. 

ज्या प्रमाणे आपण दरवाज्यावर नॉक करतो ठीक त्याच प्रमाणे आरशावर हळूहळू नॉक करून आपण आरसा खरा आहे कि खोटा ते तपासू शकतो. जर सामान्य ठक-ठक असा आवाज आला तर समजायच कि आरसा व्यवस्थित आहे. कारण त्याला जर भिंतीच्या किंवा पार्टिशन च्या सहायाने लावलं असेल तर असा आवाज येईल.

पण आवाजात थोडासा पण वेगळेपण आला म्हणजे आवाज घुमू लागला तर सावधान व्हा. आणि खात्री करून घ्या कि ट्रायल रूम मध्ये कॅमेरे तर लावले नाहीयेत ना.

४) आरशाच्या अगदी जवळून बघणे. 

टू वे मिरर मध्ये खूप वेळेस जवळून पाहिलं कि समोरच दिसत. त्यासाठी ट्रायल रूम मध्ये गेलात तर आरशाला जवळून पहा. आणि समजा त्यातून पलीकडचं जर काही दिसलं तर समजून घ्या कि तो आरास चुकीच्या कामासाठी वापर होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.