मतदार राजाला आता वोटर आयडीला आधार कार्डशी लिंक करावं लागणारय .

आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्वाचे विधेयक मंजूर केले आहे. २० डिसेंबर रोजी लोकसभेत निवडणूक सुधारणांशी संबंधित विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची तरतूद आहे.  

म्हणजेच आता मतदार राजाला त्याचे मतदार ओळखपत्र आता आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे. 

देशात निवडणूक सुधारणा घडवून आणणे हा या विधेयकाचा उद्देश आहे, असं केंद्र  सांगण्यात आले आहे. यापूर्वी गावात किंवा शहरात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यांचे मतदार ओळखपत्र दोन्ही ठिकाणांहून मिळू शकत होते. एका निवडणुकीत दोनदा मतदान करता येत होते. पण आता वोटर आयडी आता आधार कार्डशी लिंक केल्यानंतर, आता हे शक्य होणार नाही. त्याचा आणखी  एक सकारात्मक परिणाम म्हणजे, निवडणुकीत पारदर्शकता येईल.

कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२१  सादर केले. याद्वारे लोकप्रतिनिधी कायदा, १९५० आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

विधेयकाला विरोध करत विरोधी खासदारांनी सभागृहात घोषणाबाजीही केली.

मात्र, विरोधकांनी सभागृहात या विधेयकाला विरोध केलाय जर का वोटर आयडी आधार कार्डशी लिंक केली तर त्याही लोकांना मतदान करण्याची संधी मिळेल, जे या देशाचे नागरिकच नाहीत,असे सांगितले.

या विधेयकाला विरोध करताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लोकसभेत सांगितले की, “आधारचा वापर निवासी पत्त्याचा पुरावा म्हणून केला जाणार होता. जर तुम्ही मतदाराचे आधार कार्ड मागितले तरच तो कुठे राहतो हे कळू शकेल. एक प्रकारे तुम्ही नागरिक नसलेल्यांना मतदानाचा अधिकार देत आहात”, तर तृणमूल काँग्रेसचे खासदार सुग्तो राय यांनी विरोध करत म्हणलं आहे कि,                         “या विधेयकाद्वारे केंद्र सरकार निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे,या विधेयकाचा वापर करत भाजप सरकार, निवडणूक प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहे, त्यामुळे माझा या विधेयकाला विरोध आहे” अशी टीका करत त्यांनी विरोध दर्शवला आहे. 

तर त्यावर सरकारने विरोधी पक्षांचा आक्षेप निराधार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. ते म्हणाले, सरकारला बोगस मतदान आणि बनावट मतदान थांबवायचे आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला साथ द्यावी, उलट विरोधक विरोध करत सुटले आहेत.

आता कोणताही विधेयक पारित होणे आणि न होण्यावर टीका-टिपण्या होत राहणार…पण आपण बघूया या दोन्ही ओळखपत्रांना लिंक करण्याची प्रक्रिया काय आहे?

तुमचे वोटर आयडी आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. 

  • वोटर आयडी आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, सुरुवातीला तुम्हाला राष्ट्रीय मतदार पोर्टल https://voterportal.eci.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि व्होटर आयडी कार्ड नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचे राज्य, जिल्हा, नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव इत्यादी वैयक्तिक माहिती भरायला लागेल.
  • ही प्रक्रिया केल्यानंतर, पुढे सर्च बटणावर क्लिक करा. आपण प्रविष्ट केलेली माहिती योग्य असल्यास, तपशील स्क्रीनवर दिसून येईल.
  • आता तुम्हाला फीड आधार क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय तुम्हाला स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसेल.
  • पुढील टप्प्यावर, तुम्हाला आधार कार्ड, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक इत्यादी तपशील काळजीपूर्वक भरावे लागतील.
  • ही संपूर्ण टाकलेली माहिती एकदा काळजीपूर्वक तपासा मगच ती सबमिट करा.
  • त्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीपणे स्वीकारला जाईल.

 हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.