टोल कसा चुकवायचा..? 

वाह वा भिडू. तुमच कसय तुम्ही दोन तिन दिवस नॉर्मल गेले की एखाद्या विषयाला अशी काय वाचा फोडता की आमची वाचा बसते.

चालायचं खरी दुख: जाणणारा एकमेव भिडू उरलाय यावर आमचा विश्वासाय. लोकांच्या समस्या, तळागाळातील समस्यांची व्याप्ती, त्यावर गोरगरिब जनतेकडून काढले जाणारे मार्ग यावर आमचा विश्वास आहे. आत्ता भिडू लोकांच्य़ा समस्या कोणत्या याची लिस्ट घेवून आम्ही बसलो तेव्हा पहिल्या नंबरवर आलं ते म्हणजे टोल लय झालाय, हल्ली परवडत नाही. 

आदरणीय राज ठाकरेंनी देखील यावर उत्तर देवून झालय, फक्त ते म्हणले याला मनसैनिक ठाकरे स्टाईलने उत्तर देईल. दोन दिवस काचा वाजल्या आणि परत टोलवाले आमच्या उरावर बसले. त्यात टोलवरचे टगे. च्या गावात या पोरांना तालमीत पाठवलं तर वर्षाला दहाच्या सरासरीने महाराष्ट्र केसरी आणतील. बर हि पोरं करतात काय तर पैसै घे चिठ्या दे. लय त्रास झाला आणि दमात घ्यायच म्हणलं तरी तिथ आमचं काय चालण्यासारखं नसतय. म्हणजे भांडाभाडी, राजकिय मुद्दा करणं यातून टोल कसा चुकवायचा हा प्रश्न सुटत नाही हे आजवर आमच्या लक्षात आलय, म्हणूनच म्हणलं अस्सल बिलंदर माणसांना फोन घुमवून विचारावं की, नेमका टोल चुकवायचा तर कसा. 

सर्वप्रथम टोलची मालकी कोणाकडे याचा डिप अभ्यास असणे आवश्यक. 

टोलची मालकी कोणाकडे आहे याचा अभ्यास तुम्ही केला असेल तर पाच दहा टक्के चान्सेस वाढलेले असतात. म्हणजे कस नेटवर जायचं. पुणे सातारा हायवेवर असणारे टोल बघायचे आणि अरे हा तर रिलायन्स आपल्याला काय होत नाही म्हणून खूष व्हायचं. जर तुम्ही खूष झाला तर एकशे एक टक्के टोल नाक्यावर कुत्र्यागत मार खाताय. भावांनो तस नसतय ते. सब टेंडर वगैरे सारखे किडे असतात. नावाला फक्त रिलायन्स वगैरेची नाव असतात. टोल ताब्यात असतो तो लोकल बॉडीच्या. आत्ता नुकतचं टोलवरुन भांडण झालेले महाराष्ट्राचे दोन दिग्गज तुम्हाला माहितच असतील. तर प्रत्येक ठिकाणी अशाच एका मोठ्या माणसाकडं टोलनाका असतोय. पहिल्या पातळीवर त्या माणसाचं नाव डिटेलिंग मध्ये काढायचं. किती पैलवान, कस मारत्यात, किती मारत्यात, मर्डर कि हाफमर्डर याची डिटेल घ्यायची. कायच मिळत नसलं तर पोलिस टाईम्स वाचायला सुरवात करायची. शंभर टक्के माहिती मिळते. 

आत्ता काय करायचं त्या माणसाचा एक कटआऊट गाडीच्या समोर लावायचं. एकदम ठसक्यात. गॉगल घातलेला फोटो वगैरे वरच्या काचेवर लावायचा. साहेब, दादा, राजे हे भावी आमदार, माजी आमदार, हे ओघान येतच असतय ते चिटकवायचं. 

एक पांढरा शर्ट गाडीत ठेवायचा आणि थेट गाडी घालायची. खिडकीतनं नुस्ता हात करायचां. बऱ्यापैकी पोरं सोडत्यात हा अनुभव आहे. काय विचारला तर दादा, साहेब एवढच करायचं. त्याच कसय काय टोलनाक्यांचे लोकल पासवर्ड आहेत. तिथ त्यांच नाव घेतलं की सुटतं. हा प्रकार त्यातच येतोय. फक्त अट एकच किमान स्कोर्पिओ नायकर थार तरी पाहिजे तुम्ही अल्टो नायतर क्विड वगैरे घेवून गेलात तर मोक्कार मार खाण्याची शक्यता असत्या. 

आत्ता दूसरा प्रकार बनावट आयकार्ड.

यात बनावट हा शब्द शब्दश: मनावर घेतलात तर टोकनाक्यावरच्या लोकांचे वेगळे नंतर पोलीसांचे वेगळे फटके खायला लागत्यात. बनावट म्हणजे आपल्या परिचयाच्या माणसांच एक्स्ट्रा आयकार्ड दाखवायचं. सख्खा भाऊ असला तर आयकार्ड वापरणं सोप्प असतय. म्हणजे चेहरेपट्टी जुळते. फुल्ल कॉन्फिडन्समध्ये गाडी घालायची आणि आयडी बाहेर काढायची. आत्ता इथं काय करायचं तर कुत्र्याच्या डोळ्यात डोळे घातले की तो कसा मागं लागतो तसा प्रकार असतोय त्यामुळ  डोळ्यात डोळे घालायचे नाहीत. एकतर फोन कानाला लावायचा. गडबडीत असल्यासारखं दाखवायचं. इथं तुमच्या बॉडी लॅग्वेजचं स्किल असतय. ते जमल की पुढचं सगळं समतय. 

आत्ता पुढचा चॅप्टर असला तर तो म्हणतो हे चालत नाही. भले तुम्ही पंतप्रधानांच आयडी दाखवा तो चालत नाही म्हणला की आयडी घ्यायचं आणि पैसै द्यायचे वाद घालायचा नाही. कारण कार्ड असतय भावाचं आणि ताल असतोय आपला. त्यामुळं सटकन हा एकमेव पर्याय असतोय. आत्ता आयडी कुठले चालत्यात तर सेंटरचे कसलेही आयडी असले तरी गाडी सुसाट जात्या. आमच्या एक मित्र मर्चेंट नेव्ही मध्ये आहे. तर त्याच्या डब्बल आयडीवर आमचा दूसरा मित्र गेली चार वर्ष टोल चुकवतोय. मर्चेंट नेव्हीच आयडी असतय ते अप्रुव्ह होतं सेंटर गव्हरमेंटच्या मिनिस्ट्रीकडून त्यावर भारताचा अशोकस्तंभ वगैरे असतो. म्हणजे आपल्या पासपोर्टवर असतोय तसाच. आणि हात हे पासबूक सारखी कागद असतात. फोटो शिका वगैरे. त्यात शशी थरुर सारखं इंग्लीश. टोलवाले ते घेतात वरुन खाली बघतात. त्यांना फक्त अशोकस्तंभ आणि मर्चंट नेव्हीच्या पोशाखातला फोटो दिसतो. बिचारा लगेच सोडतो. 

फक्त अशी कार्ड मुंबई परिसरात वापरायची नसत्यात. तिथ जरा हुशार प्राणी असत्यात. त्यांनी पकडलं न तर आयुष्यभर समुद्रात जायला लागलं. 

आत्ता लोकलं स्ट्रॅटेजी झाली. बनावट आयडी झालं. याशिवाय काय प्रकार असेल तर तो कोल्हापूरकरांचा. व्यापक जनमत गोळा करुन राडा करायचा. म्हणजे कोल्हापूरकरांनी रस्ते बांधताना, प्रोसेस पुर्ण होताना एका शब्दान राडा केला नाही पण टोल द्यायची वेळ आली की भल्यामोठ्या कंपनीला ठणकावून सांगितलं टोल देत नाय रांडीच्या. लय जण असल्यानं कंपनीनं माघार घेतली. बाकी अधले मधले रस्ते माहित असणारे मोक्कार आहेत पण त्याला काय स्ट्रॅटेजी म्हणत नाही, खरा मर्द तोच जो टोल ला सामोरं जावून तो चुकवतो. 

विशेष सुचना. तुमच्या अवती भवती कुणी काय असून अक्कल लावली असल्यास, गंडवागंडवी केली असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा. चांगली कमेंट टाकणाऱ्या पुणे-मुंबई वन टाईम टोल भरण्याची जबाबदारी आम्ही घेवू शकतो. 

हे ही वाचा. 

 

2 Comments
 1. Prasad says

  तळेगाव दाभाडे ला midc चौकातून मुंबई-पुणे express highway ला गेल्यावर जो पहिला टोल लागतो तिथं गाडी डायरेक्ट बॅरिगेट पाशी घालायची,2 वेळा horn द्यायचा न काच खाली घेऊन दाबत म्हणायचं “ए लोकल मार”…

  एकदा करून बघा नक्की….????

 2. Ashish Bhagwat says

  Solapur la RTO checking point ahe
  Tithe lok ahe na check point Adhi 2 km ani
  Check point nantar 2 km gadi shetatun gheun jatat ani jyach शेत to paise gheto paise gheto .

Leave A Reply

Your email address will not be published.