सुल्ली डील्स हे ॲप काढणाऱ्या पोरांचं ब्रेनवॉश हे ट्रॅड ग्रुप करत होते.

सुल्ली डील्स , बुल्ली बाई अशी ॲप काढून मुस्लिम महिलांची लिलाव करत असल्याचे दाखवून बदनामी करणाऱ्यांना आता अटक करण्यात आलीय. अवघ्या १८, २१ आणि २३ वयाची ही पोरं आहेत. जरी ह्यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली असली तरी खरे मास्टरमाईंड दुसरेच असल्याचं सांगण्यात येतंय.

 त्यातलेच एक सोशल मीडियावर असणारे ट्रॅड ग्रुप या कोवळ्या वयातील पोरांची माथी भडकवण्यात पुढे असल्याचं सांगण्यात येतंय.

ओमकारेश्वर ठाकूरला मुस्लिम महिलांची छायाचित्रे लिलावासाठी टाकण्यासाठी वापरण्यात आलेले सुल्ली डील्स ॲपतयार केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या ठाकूरने पोलिसांना सांगितले की तो ट्रेडचा सदस्य होता, तिथून मुस्लिम महिलांचे फोटो वापरून लिलाव करण्याची आयडिया आली होती.जानेवारी २०२० मध्ये ठाकूर ट्विटरवर अशाच एका ग्रुपमध्ये सामील झाला होता. त्यामुळं मग भिडू पण ठरवलं की बघावं तरी हे ग्रुप्स काय आहेत की ज्यांनी या पोरांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रेन वॉश केलंय.

तर पहिला बघू ह्या ग्रुप्स ना ट्रॅड का म्हणतात. 

तर ट्रॅड हा ट्रॅडिशनल शब्दाचा जरा ‘कूल’ वाटणारा  शॉर्टफॉर्म आहे. मात्र या ग्रुपचे विचार मात्र जरा जास्तच ‘अनकूल’ असल्याचं दिसतंय. ट्रॅडिशनल म्हणजेच पारंपरिक विचार करणारे, परंपरांचं पालन करणारे अशी ह्या ग्रुप्सची संकल्पना असली तरी ह्यांचे विचार परंपरावाद्यांच्या पार पुढचे आहेत. ‘अल्ट्रा राईट विंग’ या कॅटेगरीमध्ये हे ग्रुप्स येतात.

अमेरिकेत ट्रम्प यांना सपोर्ट करणारे हे ट्रॅड ग्रुपचं होते.

भारतातले ट्रॅड ग्रुप्स हे जातीवर आधारित व्यवस्थेचं समर्थन करतात.हिटलर सारखंच रक्ताच्या शुद्धतेच्या तत्वावर हे ट्रॅड ग्रुप्स विश्वास ठेवतात. आणि त्यातूनच मग विविध जाती आणि धर्मातील स्त्री-पुरुष यांच्यातील जातीय समानता आणि आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह या कल्पनेला ते विरोध करतात.या ग्रुप्सचे सोशल मीडिया हँडल आणि प्लॅटफॉर्म वूमन एम्पॉवरमेन्ट आणि दलितांच्या उत्थानाला विरोध करणार्‍या विचारांना समर्थन देणाऱ्या संदर्भांनी भरलेले आहेत.

मुस्लिमांविरुद्ध मोहीम हा ट्रॅड ग्रुप्समधील आणखी एक चर्चेचा विषय असतो. 

मुस्लिमांना टार्गेट करणारे पोस्ट पद्धतशीरपणे या ग्रुप्स कढून व्हायरल केले जातात. 

राइट विंग मधल्या ‘लिबरल’ विचार करणाऱ्यांनापण हे ग्रुप्स सुट्टी देत नाहीत. त्यांना ‘रायता’ या नावानं तेय चिडवतात. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी यांनी हिंदुत्व स्वीकारल्याचा त्यांचं म्हणणं असतं. नथुराम गोडसे , बाबू बजरंगी ही ह्या ग्रुप्सची श्रद्धस्थानं असतात.

सध्या याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. परंतु हे निश्चितपणे म्हणता येईल की हे व्यापार नेटवर्क फ्रिंज नेटवर्क नाहीए. जाणकारांच्या म्हणण्यानुसार या ग्रुप्स तर्फे सातत्याने विष पसरवले जात असून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. ट्रॅड गटाशी निगडित लोकांची विचारसरणी अत्यंत मागासलेली आहे.त्यामुळं कायदेशीर कारवाईबरोबरच त्यांना समुपदेशनाचीही गरज आहे. कारण त्यांच्या विचाराने ते समाजासाठी धोक्याचे आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.