लॉकडाऊनमध्ये जेव्हा तुम्ही बायकोसाठी केक, कॉफी बनवत होता या भाऊंनी WORDLE काढलं

इन्स्टा, फेसबुकच्या आणि सगळ्यात जास्त बायोमध्ये सॅपिओसेक्शुअल लिहण्याचा मध्ये एक ट्रेंड आला होता. आता सॅपिओसेक्शुअल म्हणजे काय तर जे बुद्धीनं ‘आकर्षित’ होतात. आता टिंडर, इन्स्टावर नुसता लुक्सचा गेम असताना ही लोकं सॅपिओसेक्शुअली कशी जवळ येतात हे त्यांनाच माहीत. आता अशांना जरा तुमच्या बाजूला बसवा आणि त्यांना ही वर्डल खेळायला लावा.

या गेमचा शोध कसा लागला तर त्याची कहाणी पण इंटरेस्टिंग आहे. 

तर हा गेम बनवला आहे जॉश वर्डल या रेडीफमध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरनं. त्याची  बायको पलक शहा हिला स्पील बी आणि क्रॉसवर्ड खेळायचं लै नाद. मग कोविडच्या लॉकडाऊनमध्ये  बाकीचे नवरे नुसते केक बनवत होते तेव्हा या भाऊंनी आपल्या बायकोसाठी हा गेम काढला. त्याची बायकोनच हा गेम पहिल्यांदा खेळला. त्यांना पहिल्यांदा आपल्या मित्रांना हा गेम दाखवाल होता पण मित्राचं बोलणं सिरिअसली घेणारे मित्र कसले. 

गेम एवढा का चालतोय ?

पाहिलं म्हणजे दिवसातनं एकदाच हा गेम खेळता येतॊय. त्यामुळं एकदा चान्स हुकला का दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागतोय. म्हणजे आपल्या क्युरिऑसिटीला हळूच कांडी करतेत आणि मग दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबायला लावतात. बाकी डिस्प्ले आणि गेम एकदम प्लेन आणि सिम्पल. 

त्यात तुम्ही तुमची अचिव्हमेंट ट्विटर, फेसबुक वर टाकून तुमच्या ‘सॅपिओसेक्शुअल’ असण्याचं प्रूफ देऊ शकताय. त्यात वर्डलवर बनलेल्या मिम्सनी या गेमची क्रेझ अजूनच वाढवलेय. आणि महत्वाचं म्हणजे दिवसातनं एकच वर्ड ऑफ द डे असतोय जो सगळ्यांना सेम असतो. त्यामुळं स्पॉयलेऱ सांगणाऱ्यांपासून जरा सांभाळून. 

तर आधी हि गेम कशी खेळतात ते बघा. 

गुगलवर WORDLE अशी बरोबर स्पेल्लिंग टाकली का पॉवरलँग्वेज या वेबसाइटवर हा गेम ओपन होतोय. मग तिथं येतो शब्दकोडं किंवा सुडको सारखा एक बॉक्स. गेम बिलकुल फ्री आहे. तर गेम सोपा आहे. रोज एक WORDLE वर्ड ऑफ द डे असतो तो तुम्हाला ओळखायचा असतो. आत हे ओळखण्यासाठी तुम्हाला पाच शब्दांचे सहा इंग्लिश शब्द टाकता येतात. अजून पण नाही समजला का. थांबा विस्कटून सांगतो.

आता एवढं लक्षात ठेवा तुम्हाला वर्ड ऑफ द डे गेस करायचा आहे. 

आत पहिल्या प्रयत्नात तुम्हाला तर तुम्हाला ते जमणार नाही त्यामुळं मग एक रँडम पाच अक्षरी शब्द टाका. समजा तुम्ही ‘PARTY’ हा शब्द पहिल्या रो मध्ये टाकला. P-A-R-T-Y या ५अक्षरांपैकी कोणतेही एक अक्षर असेल तर त्या अक्षराचा बॉक्स पिवळा किंवा हिरवा होईल. पाच अक्षरांपैकी एकही शब्दात  वर्ड ऑफ द डे मध्ये असल्यास, परंतु चुकीच्या जागी ठेवली असल्यास ते पिवळे होईल.जर ते अक्षर त्या दिवशीच्या शब्दात त्याच जागी असेल तर बॉक्स हिरवा होईल. आणि बॉक्स राखाडी झाला तर समजायचं  P-A-R-T-Y मधलं एकही अक्षर वर्ड ऑफ द डे मध्ये नाहीये.  आता एवढं वाचून पण समजलं नसेल तर लिंक टाकतोय तिथं जाऊन डायरेक्ट खेळाचं की https://www.powerlanguage.co.uk/wordle/

बाकी तुमची स्ट्रॅटेजि खाली कमेंट करून सांगा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.