असा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

भारत म्हणजे विविधतेने नटलेला देश आहे. इथे बऱ्याच जाती- धर्माचे लोक राहतात, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सनसुद इथं साजरी करताना पाहायला मिळतात. पण अख्ख्या देशात २ सण असे आहेत, जो प्रत्येक भारतीय मोठ्या अभिमानाने साजरी करतो. एक म्हणजे १५ ऑगस्ट आणि दुसरा म्हणजे २६ जानेवारी .

२६ जानेवारी १९५० रोजी राजधानी दिल्लीत सकाळपासून सगळीकडं जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण होता. सगळीकडं रोषणाईचा झगमगारट होता. आजूबाजूच्या गावांतून, शहरांतून लोकांचे जध्येच्या जध्ये सकाळपासून शहरात दाखल झाले होते आणि दिल्लीच्या घुमटाकार ‘गव्हर्नमेंट हाऊसच्या म्हणजे आजच्या राष्ट्रपतीभवन आवाराजवळ उत्सुकतेने जमा होत होते. कारण याच गव्हर्नमेट हाऊस’च्या दरबार सभागृहात प्रजासत्ताकाच्या घोषणेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.

सभागृहात सुमारे ५०० प्रतिष्ठित जन उपस्थित होते. त्यांत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व इतर मंत्रिगण, कायदेमंडळाचे पहिले सभापती जी. व्ही. मावळणकर, घटना समितीचे सभासद, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मावळते गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी व त्याचप्रमाणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकानों आणि इतर अनेक देशांचे राजनैतिक अधिकारी उपस्थित होते. 

पण त्या सगळ्या गर्दीत मंचावर सर्वांत जास्त उठून दिसत होते ते डॉ राजेंद्र प्रसाद, त्या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांचा शपथग्रहण समारंभ होणार होता. सफेद चुडीदार, काळी अचकन म्हणजे कुर्ता आणि डोक्यावर गांधी टोपी, असा पेहराव त्यांनी केला होता. दरबार हॉलमध्ये पूर्वी ब्रिटिश व्हॉइसरॉय बसत होता. त्या सिंहासनामागे सर्वप्रथमच राष्ट्रीय बोधचिन्हाची त्रिमूर्ती आणि हसऱ्या बुद्धांचे पुतळे ठळकपणे दिसतील असे ठेवलेले दिसत होते. 

टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम सुरू झाला. मावळते गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी २९ नोव्हेंबर, १९४९ रोजी घटना समितीने स्वीकृत केलेलं संविधान देशात या दिवसापासून म्हणजे २६ जानेवारी १९५०पासून  अमलात आलं असल्याची आसनी  ‘भारत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक’ झाल्याची घोषणा केली. 

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हिरालाल कनिया यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपतिपदाची शपथ दिली. राजगोपालाचारी यांच्याकडून त्यांनी राष्ट्रप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली आणि बंदुकांच्या २१ फेरीची मानवंदना त्यांना दिली गेली. तुतान्यांच्या निनादांनी परिसर दुमदुमून गेला.

या प्रसंगी आपल्या छोटेखानी औपचारिक भाषणात डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या अनेकांबद्दल आणि त्यासाठी त्याग करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्यामुळेच देश एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक होऊ शकला, असे त्यांनी प्रतिपादन केलं,

हा सोहळा झाल्यावर राष्ट्रपतींनी खुल्या गाडीतून शहरात फेरफटका मारला. ‘गांधीजी की जय’, ‘भारतमाता की जय’, ‘वंन्दे मातरम’ आदी घोषणा देत लोकांनी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केलं. पुढे इर्विन स्टेडियमवर राष्ट्रपतींनी राष्ट्राचा तिरंगा ध्वज फडकवला हा अविस्मरणीय क्षण राष्ट्रवादाने भारलेल्या जनसमूहाने डोळ्यांत साठवून घेतला,

त्या दिवशी राजगोपालाचारी व राजेंद्र प्रसाद यांनी जनतेला उद्देशून रेडिओवरून संदेशही दिला, राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या संदेशात राष्ट्रपिता गांधीजीनो एक मुक्त, सहकार्याचा अवलंब करणारा व वर्गविहीन असा सुखसंपन्न समाज या देशात निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुन्हा नव्याने आपल्याला समर्पित करावं’ असं आवाहन केलं.

हे ही वाच भिडू :

web title: Republic day 2022: How was the first republic day celebrated

Leave A Reply

Your email address will not be published.