कॉम्प्युटरच्या जगात गॅरेजमध्ये सुरू झालेल्या कंपन्यांची परंपरा HP पासून सुरु झाली ..

आज संपूर्ण जग टेक्नोलॉजीवर चालतयं. बोटांच्या काही जादूनं जगभरातला डेटा काही सेकंदात आपल्याजवळ ठेवू शकतोय. कागदपत्रांवर लिहून ठेवलेल्या नोंदीपासून ते आजकालच्या हार्ड डिस्कपर्यंतचा प्रवास आपण केलायं.

मात्र हे सर्व शक्य झालं, कम्प्युटर्स आणि लॅपटॉपमूळं. टेक्नॉलॉजीला सुरुवात झाली तेव्हा गणिताच्या आकडेमोडीसाठी आधी विकसित केला गेला भला मोठा कम्प्युटर. कालांतराने त्याच्या टेक्नॉलॉजी आणि आकारात बरेच बदल होत गेले.

मोठं – मोठे कम्प्युटर्स कुठेही नेणं सोपं नव्हतं, त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी विकसित केला गेला लॅपटॉप. 

आता लॅपटॉप म्हंटलं की, काही मोजक्या कंपनीची नावं समोर येतात. पण त्यातला सगळ्यांचा आवडता ब्रँड म्हणालं तर ह्युलेट-पॅकार्ड.

संगणक, प्रिंटर निर्मितीमधील ही आघाडीची ‘ह्युलेट-पॅकार्ड’ कंपनी एचपी (HP) नावाने फेमस आहे. मूळची अमेरिकेची असणारी ही कंपनी सध्या डेस्कटॉप व लॅपटॉपचे उत्पादन आहे विक्री नंबर वनची कंपनी आहे. 

पण तुम्हाला माहितेय का आज जगात टॉपला असलेली ही कंपनी एका गॅरेजमध्ये सुरू करण्यात आली होती.

बिल हेवलेट आणि डेव्हिड पॅकार्ड या दोघा दोस्तांनी १९३५ मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली. तो मंदीचा काळ होता. नुकताच पदवी मिळाल्याने कुठे चांगली नोकरी मिळणं अवघड होतं.

त्यावेळी स्टॅनफोर्ड येथील प्राध्यापक फ्रेडरिक टर्मन यांच्याबरोबर त्यांची फेलोशिप सुरू होती. पण फेलोशिप संपल्यानंतर पुढे करायचे काय असा प्रश्न दोघांच्या समोर होता. त्यावेळी प्राध्यापकाच्या सल्ल्यावरून या दोघांनी स्वत: ची कंपनी सुरू करण्याचं ठरवलं. त्यातूवतम पालो अल्टोच्या गॅरेजमध्ये कंपनीला सुरुवात करण्यात आली. 

१९३८ मध्ये पॅकार्ड आणि हेवलेटने भाड्याच्या गॅरेजमध्ये पार्ट टाइम काम सुरू केले, या कंपनीत त्यांनी सुरूवातीला ५३८ अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली.  

पुढे १९३९ मध्ये हेवलेट आणि पॅकार्डने त्यांची भागीदारी औपचारिक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्थापन केलेली कंपनी हेवलेट-पॅकार्ड (एचपी) किंवा पॅकार्ड-हेवलेट म्हणावी की नाही हे ठरवण्यासाठी त्यांनी नाणेफेक करण्याचं ठरवलं. शेवटी नाणं हेवलेट-पॅकार्ड या बाजूनं पडलं आणि कंपनी एचपी नावानं सुरु करण्यात आली.

 १८ ऑगस्ट १९४७ ला कंपनीला अधिकृतरीत्या मानता मिळाली आणि १० वर्षांनी म्हणजेचं ६ नोव्हेंबर १९५७ ला कंपनी सार्वजनिक झाली.

हेवलेट आणि पॅकार्डचे पहिले आर्थिकदृष्ट्या यशस्वी उत्पादन हे HP २०० A म्हणून ओळखले जाणारे एक ऑडिओ ऑसीलेटर होते. कंपनीने आपले हे उत्पादन ८९.४० डॉलरमध्ये विकले. जेव्हा बाकीच्या कंपनी ते २०० डॉलरला पेक्षा जास्त किमतीत विकत होत्या.

कंपनीचे पहिले ग्राहक होते वॉल्ट डिस्ने स्टुडिओचे साऊंड इंजिनिअर बड हॉकिन्स, ज्यांनी फँटेशिया या अॅनिमेटेड चित्रपटात वापरण्यासाठी आठ एचपी २०० एबी ऑडिओ ऑसिलेटर खरेदी केल्या, ज्याची प्रत्येकी किंमत ७१.६० डॉलर इतकी होती. 

त्यानंतर कंपनीसोबत अनेक ग्राहक जोडले गेले आणि कंपनी यशस्वीरित्या वाटचाल करू लागली.

कंपनीने १९७३ पर्यंत २००AB म्हणून उत्पादन चालू ठेवले, दरम्यान वर्षानुवर्षे याच्या डिझाइनमध्ये सुधारणा होत गेली.

कंपनी नफ्यात होती. १९४२ मध्ये त्यांनी त्यांची पहिली इमारत ३९५ पेज मिल रोड येथे बांधली. त्यांंच्या यशस्वी उत्पादनात बद्दल त्यांना १९४३ आर्मी-नेव्ही “ई” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

आणि पुढे एचपीने ऑडिओ ऑसीलेटर, वेव्ह अॅनालायझर, डिस्टॉर्शन अॅनालायझर्स, ऑडिओ-सिग्नल जनरेटर, आणि युद्धादरम्यान मॉडेल ४०० ए व्हॅक्यूम-ट्यूब व्होल्टमीटर अशा नवनवीन उत्पादन बनवायला सुरुवात केली. ज्यातून युद्धाच्या काळातही कंपनीने २०० लोकांना रोजगार दिला.

 १९५१ मध्ये २१५ कर्मचाऱ्यांसह कंपनीचा टर्नओवर ५.५ मिलीयन डॉलर्सवर पोहोचला.

त्यानंतर कंपनीने एकामागून एक नवीन नवीन उत्पादनांची रांगच लावली. ज्यात प्रिंटर, टाईपरायटर, पॉकेट पीसी, कम्प्युटर ॲक्सेसरीज, लॅपटॉप, कॅमेरा, नॉट पॅड आयपॉड, अशा कित्येक गोष्टी त्यांनी बाजारात उतवल्या.

या उत्पादनांना ग्राहकांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला आणि आज ही कंपनी एक ब्रँड म्हणून जगभरात फेमस आहे. आज कंपनीचा अॅनियूअल टर्नओव्हर ५६ बिलीयन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे.

हे ही वाचं भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.