बिहारच्या या चोरट्याच्या मास्टरमाईंड पुढं ऋतिक रोशनचा धूम सुद्धा फ्लॉप आहे

‘चोरी करून अमूक- अमूक किमतीचे दागिने लंपास’, ‘चोरट्यांनी एवढी रोकड पळवली,’ बँक लुटून दरोडेखोर फरार, अशा कितीतरी हेडलाईनच्या बातम्या आपण रोजचं बघत असतो. आता चोर पकडला की त्याच्यावर कारवाई तर होतेचं, पण बरेच शातीर चोर पोलीसांच्या हातावर तुरी देऊन जातात. पण बिहारमधल्या एका चोरट्याची स्टोरी फारचं इंटरेस्टिंग आहे.

म्हणजे भिडू या मास्टरमाईंड चोराचा चोरी करण्याचा प्लॅन जर तुम्ही ऐकला ना तर दोन मिनीटासाठी डोकं हँग झाल्याशिवाय राहणार नाही. पार ऋतिक रोशनचा तो धूम पिक्चर नाही का ज्यात तो म्हताऱ्या माणसाचा नकली अवतार करून पोलीसांंसमोरचं चोरी करत असतो, पण बिहारच्या या पठ्ठ्याच्या प्लॅनपुढं त्या पिक्चरची स्टोरी सुद्धा फिकी आहे.

आता बातमी अशी की, बिहारची राजधानी पटणामधल्या बकरगंज इथं शुक्रवारी दिवसाढवळ्या सोन्याच्या दागिन्यांचे घाऊक व्यापारी एसएस ज्वेलर्सवर दरोडा पडला, जो तब्बल 14.14 कोटी रुपयांचा होता, आता एवढी मोठी चोरी म्हटल्यावर खळखळत उडणं साहजिकच होतं. 

बरं हा दरोडा करणारे गुन्हेगार पटणा आणि जहानाबाद मधलेचं असल्याचं समोर आलं. आजूबाजूच्या दुकानदारांनी मोठं धाडस करून यातल्या एका गुन्हेगाराला पकडलं आणि पोलीसांच्या हवाली केलं.

साधू असं या चोरट्यातं नाव, त्यानं एका फटक्यात पोलीसांना आपल्या बाकीच्या तीन साथीदारांची नावं विथ अॅड्रेस सांगितली. साधूच्या या चौकशी नंतर आणि तब्बल 36 तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी परिसरातील 11 ठिकाणी छापे टाकले. पण यासगळ्यात साधूनं त्यांच्या मास्टरमाईंडचं नाव सुद्धा सांगून टाकलं.

या चोरीचा मास्टरमाईंड म्हणजे रवी पेशेंट. ज्याला त्याचे मित्र त्याला मास्टरजी म्हणतात. तसं रवीला पोलिसांनी या आधी सुद्धा पकडलं होतं, पण नंतर तो पाटणा दिवाणी न्यायालयाच्या आवारातून पळून गेला.

पण आता परिस्थिती अशी आहे की रवीची ओळख पटवणं पोलिसांना सुद्धा अवघड होऊन बसलयं. त्याचा फोटो आहे पण तरी त्याला ओळखणं म्हणजे अवघड कोडं होऊन बसलयं.

कारण हा मोठा दरोडा आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी या बहाद्दर रवीनं आपला चेहराचं बदललाय. पोलिस सुद्धा या रवीचा फोटो बघून चाट पडलीत. रवीच्या नव्या चेहऱ्याची नेमकी ओळख आता कोणालाच करता येईना.

अटकेनंतर साधूने दिलेल्या जबानीत रवी नावाच्या दोन गुन्हेगारांवर संशय व्यक्त केला जातोय, मात्र त्यातील एकाची गुन्ह्याची स्टाईल या ताज्या दरोड्यासारखीचं आहे. त्याआधारेच पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या कुख्यात रवी पेशंटनेच ही घटना घडवून आणल्याची पोलिसांची खात्री आहे.

मास्टरजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या रवीने पटणा दिवाणी न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्यानंतर चेहरा आणि केशरचना बदलून आपली जुनी ओळख पुसून टाकली आहे. त्याचा चेहरा एवढा बदलला आहे की जेव्हा पोलिसांनी त्याच्या सहकारी साधूला त्याचा जुना फोटो दाखवला तेव्हा तो सुद्धा रवीला ओळखू शकला नाही. 

पण त्यांनी जेव्हा पोलीसांना रवीच्या चेहऱ्याच्या खाणाखुणा सांगितल्या, तेव्हा पोलीसांनी त्याचं स्केचं बनवून घेतलं आणि नंतर जे चित्र समोर आलं ते रवीच्या जून्या फोटोशी ६० टक्के मिळतं – जूळतं आहे.

कारण जून्या रवीत आणि नव्या रवीत जमीन आसमानचा फरक आहे. रवीने आपल्या चेहऱ्याची ओळख बदलण्यासाठी सर्जरी केल्याचं पोलीसांना वाटतयं.

रवीच्या शोधात पोलीस पार वैशाली येथे राहणाऱ्या तरुणीच्या घरी पोहोचले. ही मुलगी दुसरी कोणी नसून रवीची मैत्रीण होती. पोलीसांना डाऊट आहे की, त्याची ही मैत्रीण सुद्धा या प्लॅनमध्ये आहे. 

आता भिडूच्या हातात जशी माहिती मिळालीये त्यानूसार, त्याच्या नाकाची सर्जरी झालीये. याशिवाय, त्या हेअरस्टाईलसाठी वीगचा वापर केलायं. आणि चष्म्याचा वापर करतोय.

आता पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३९७ अंतर्गत एफआयआर दाखल तर केलाय, रवी सापडेल तेव्हा सापडेल, पण या मास्टरमाईंडच्या डोक्यालीटीवर जरा विचार करायलाचं लागतोय…. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.