कार्तिक आर्यनच्या सिनेमामध्ये AIB मधलं “हम तो उड गये” ढापलय ?

ऑल इंडिया बकचोद आठवते का? आपलं AIB हो. दोनतीन वर्षापूर्वी युट्युब इंटरनेटवर त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांची प्रत्येक गोष्ट तुफान चालायची. त्यांनी केलेले वेब स्केचेस असो वां त्यांचे रोस्ट. बऱ्याचदा त्यांना त्या बद्दल टीकाही करण्यात आली होती. पण त्यांनी त्याकाळात केलेले प्रयोग नाविन्यपूर्ण होते.

अशातच एकदा त्यांनी नेहमीच्या व्हिडीओ ऐवजी एक गाण्याचा व्हिडीओ बनवला. तो प्रचंड व्हायरल झालं. ते गाण होतं,

“हम तो उड गये”

हे गाण बनवलं होतं रित्वीज नावाच्या एका डीजे ने. हे गाण एवढ हिट झाल की AIB च अन्थम म्हणून ते प्रसिद्ध झालं.

या गोष्टीला बरेच दिवस झाले. आता तर मधल्या काही वादानंतर AIB च बंद पडलंय. लोक सुद्धा या सगळ्याला विसरून गेले होते. पण काही दिवसापासून हम तो उड गये हे गाण परत चर्चेत आलं.

कारण होतं कार्तिक आर्यनचा सिनेमा पती पत्नी और वो. 

मुद्दसर अझीझ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात, कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा समावेश आहे. याच चित्रपटात रित्विजचं ” हम तो उड गये” या गाण्याची सर्रास नक्कल केलेली आहे,

एवढंच नाही तर गाण्याची पाहिलं ओळ सुद्धा ” हम तो उड गये ” हीच ठेवण्यात आली आहे.

रित्विज मागच्या महिन्यात हा सिनेमा बघायला गेला होता. तिथे त्याला जवळपास निम्मा सिनेमा झाल्यावर चित्रपटात हे गाणं ऐकू आलं. त्याला शंका आली. त्याने काल आपल्या ट्विटर वरून T-Series ची चांगली उजळणी घेतली.

संगीत क्षेत्रात मौलिकतेचा मुद्दा नवा नाही. कुठलं गाणं नवीन आणि कुठलं नक्कल केलेलं हा वाद नेहमीच चालू असतो. मोठे संगीतकार, मोठ्या म्युजिक कंपनी आपलं वजन वापरून सहज या गोष्टी खपवून नेतात.

यावेळी मात्र रित्विजने म्युजिक कंपन्यांची दादागिरी सहन करायची नाही अस ठरवलंय.

पुण्यात जन्माला आलेला रित्विज श्रीवास्तव, हा बॉलीवूड च्या व्यतिरिक्त जे लोक आपलं स्वतंत्र संगीत तयार करून सोशल मीडियाच्या साहाय्याने लोकांपर्यंत पोचतात त्यांच्या यादीत तो अग्रणी मानला जातो…

आई-वडिल दोघेही शास्त्रीय संगीतकार आणि रित्विज हा लहानपणापासून शास्त्रिय संगीत ऐकत मोठा झालेला मुलगा.

वयाच्या 15-16 व्या वर्षी त्याने स्वतःच संगीत दिग्दर्शन सुरु केलं, हे करत असताना तो ‘इलेक्ट्रॉनिक म्यूजिकशी’ परिचित झाला आणि त्यानंतर त्याला मागे वळून बघण्याची गरज पडली नाही. बकार्डी हाउसपार्टी आणि AIB च्या साहाय्याने त्याने स्वतःच पहिलं गाणं “हम तो उड गये” प्रदर्शित केलं.

या गाण्याचे युट्यूब वर आज 40 million पेक्षा जास्त व्हीयूज आहेत. सगळ्या तरुणाईमधे आज रित्विज सुप्रसिद्ध आहे. कॉलेज चा वार्षीक फेस्टिवल असो वा भरतभर होणारे म्युजिक फेस्टिवल त्याची हजेरी असलेला कार्यक्रम प्रेक्षकांनी ओथंबुन भरलेला असतो. “सेज”, “बरसो बादल” आणी “जित” सारखी त्याची गाणी कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना ताल धरायला लावणारी आहेत.

काल पासून हम तो उड गयेची चर्चा परत रंगात आली आहे.

अजूनपर्यंत मात्र म्युजिक कंपनीचं त्यावर काहीही उत्तर आलेला नाही. या गाण्याचा समावेश कंपनी ने आपल्या यादीमध्ये केलेला नाही या मागचं कारण काय ? हा नक्की विचारण्यासारखा प्रश्न आहे…

तुम्हाला रित्विज ने सुरु केलेल्या नवीन ट्रेंड मधे सामील व्हायचे असेल तर त्याचे “चलो चले” हे गाणे हेडफोन मधे ऐका, त्याचं संगीत दिग्दर्शन हे तरुणाईला का भावतं ते नक्की कळेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.