अजय सिंग बिश्टचे योगी आदित्यनाथ कसे झाले ते वाचा..

योगी आदित्यनाथ हे नाव असं जे पुन्हा पुन्हा बातम्यांमध्ये येतं. त्यांचं कट्टर हिंदुत्व असेल व बुलडोझर बाबा किंव्हा युपी मध्ये होत असलेले एंकॉउंटरमुळे चर्चेत येतात तर कधी मोदींचे वारसदार म्हणून चर्चेत येतात.

काही काही लोकं तर मोदींपेक्षा योगी उजवे असल्याचे दाखले देतात. आत्ता मोदींचे वारसदार म्हणून उद्या योगी पंतप्रधान होतील का नाही ते काळच ठरवेल पण तुर्तास तो विषय नाहीए. विषय आहे योगींच्या नाव बदलाच्या कार्यक्रमाचा.

योगींनी अलाहाबादचं प्रयागराज केलं, फैजाबादच अयोध्या केलं, मुघलसराय च पंडित दिनदयाल उपाध्याय नगर वगैरे वगैरे केलं. योगींची लिस्ट मोठ्ठी आहे. या लिस्टमुळ लोकं आत्ता योगींना भारताची आत्त्या घोषीत करा म्हणू लागलेत.

आत्ता काय असायचं ते असो,

पण योगी भविष्यात काय काय बदलणार हे आम्ही सांगू शकत नाही. आम्ही योगी आदित्यनाथ याचं मुळ नाव सांगू शकतो. त्यांच मुळ नाव आहे,

अजित सिंग बिश्ट

आणि हा किस्सा आहे अजित सिंग बिश्ट चे योगी आदित्यनाथ कसे झाले ते सांगणारा..

वयाच्या २६ वर्षी गोरखपुर लोकसभा मतदारसंघावर स्वतच्या कर्तत्वानं झेंडा फडकवणारा नेता. स्वकर्तृत्वानं युपीच्या राजकारणात डेरेदाखल झालेला उत्तराखंडचा मुलगा.

योगींचा जन्म. उत्तराखंडमधल्या पंचुर गावचा. वडिल फॉरेस्टमध्ये नोकरीला तर आई हाऊसवाईफ. घरात तीन बहिणी आणि तीन भाऊ. एकूण सातजण. या सात मुलांच्यात आईचा लाडका दोडकां म्हणून योगींचा उल्लेख होत असे. वडिल सतत बाहेर असल्यानं आईबरोबरचं त्यांच नातं घट्ट झालं होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर योगी हे घरात रमणारे ममाज बॉय होते.

आपण जस शिक्षणाच्या नावानं पुण्याला यायचा निर्णय घेतो तसच योगी गोरखपुरला आले. तिथ त्यांनी BSC ला ॲडमिशन घेतलं. शिक्षण हा एकमेव मार्ग त्यांना दिसत असावा मात्र याच काळात योगींच्या आयुष्यात एक कांड झालं. योगींच्या रुमवर चोरी झाली. त्यात त्यांचे पदवी पुर्ण केल्याची प्रमाणपत्र हरवली. योगींना पुढचं शिक्षण घेण अवघड वाटत होतं.

अशातच एक दिवस त्यांच्या वडिलांना निरोप मिळाला,

ते साल होतं १९९४.

आपला मुलगा संन्याशी झाल्याची ती बातमी होती. आई आणि वडिल तात्काळ गोरखपूरच्या मठात दाखल झाले. कोणत्याही कुटूंबाला आपला मुलगा असा अचानक संन्याशी होणं पटणारं नव्हतं. ते गोरखनाथ मठाचे सर्वेसर्वो अवैद्यनाथ महाराज यांना भेटले. आईनं आपल्या मुलालां परत घेवून जाण्याची विनंती महाराजांना केली. तर महाराजांनी आईला त्यांच्या मुलाला इथेच ठेवण्याची विनंती केली.

2 1496573368
facebook

आदित्यनाथांनी आईला आपण मठाच्या सेवेसाठी राहत असल्याचं सांगितलं. तुमच्या आमच्या आईला जे वाटलं असेल तेच त्यांच्या आईला वाटलं. आई वडिल दोघेही रिकाम्या हातानं परत आले. काही वर्षात योगी खासदार झाले. ते ही वयाच्या सव्वीसाव्या वर्षी. निवडून आल्यानंतर योगी घरी आले. त्यानंतर ते अध्ये मध्ये घरी जावू लागले. त्यांचा एक भाउ स्थानिक कॉलेजमध्ये कॉम्युटर ऑपरेटर आहे. एक तिथेच शिपाई आहे. बहिणी संसारास लागली आहे.

आणि आई सांगते योगीने लहानपणी एक बाग केली होती. हल्ली योगीच्या आठवणी म्हणून आम्ही तिच बाग जीवापाड जपतो.

योगींचे वडिल म्हणाले होते,

योगींच्या वाढदिवसाला आम्ही केक कापत नाही. आमच्याकडे वाढदिवसाला केक कापलाच जात नाही. आमच्याकडे पूजा असते. योगीच्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही पूजा करतो. अध्ये मध्ये योगी आम्हाला भेटतात आम्ही योगींना. सध्या आम्ही अजय सिंग बिश्टला योगी आदित्यनाथच म्हणतो ! 

मधल्या काळात योगींचे वडील वारले, पण आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे योगी अंतीमदर्शनाला जावू शकले नाहीत. खऱ्या अर्थाने अजय सिंग बिश्ट योगी झाल्याचं हेच ते उदाहरण म्हणता येईल.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.