एका दिवसासाठी का होईना, या राज्याला स्वतंत्र पंतप्रधान मिळाला…

एका दिवसासाठी राज्याचा झालेला पंतप्रधान ! कस शक्य आहे ते देखील भारतात. जास्तीत जास्त मुख्यमंत्री झाले असतील. तर नाही पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान आणि ते ही सध्या केंद्रशासित असणारा व भारताचा अविभाज्य असणाऱ्या भागाचा. कुठल्या तर दादरा व नगर हवेलीचा !

काय आहे किस्सा ! तर करा सुरवात वाचायला !!

दादरा व नगर हवेली महाराष्ट्र आणि गुजरातच्या दरम्यान येणारा ५०० स्केअर किलोमीटरचा पट्टा. याच भागाचा एक दिवसाचा कारभार भारताच्या पंतप्रधानांनी नाही तर एक दिवसासाठी झालेल्या दादरा नगर हवेलीच्या पंतप्रधानांनी संभाळली होती.

१७८३ साली नगर हवेली हा भाग मराठा साम्राज्याकडून पोर्तुगिजांच्या ताब्यामध्ये गेला. काही वर्षातच पोर्तुगिजांनी दादरा हा भाग देखील आपल्या साम्राज्याला जोडून घेतला. त्यानंतर १८१८ च्या मराठ्यांच्या पराभवानंतर पोर्तुगिज साम्राज्याचा या भागावर एकछत्री अंमल सुरू झाला. हा अंमल भारतात ब्रिटीशांची सत्ता असताना देखील सुरूच होता. गोवा, दादरा व नगर हवेली, दिव दमण ही पोर्तुगिजांची सत्ता होती तर पॉन्डीचेरी फ्रेंचांची सत्ता होती.

भारत स्वतंत्र झाला आणि प्रश्न उभा राहीला तो फ्रेंन्च आणि पोर्तुगीज सत्तांचा. फ्रेंन्चांनी आपली वसाहत अर्थात पॉन्डिचेरी मुक्त केले पण दादरा व नगर हवेली आणि गोव्यावरचा आपला अधिकार सोडण्यासाठी पोर्तुगीज तयार नव्हते.

त्यातून गोव्यासोबतच दादरा व नगर हवेलीमध्ये देखील आंदोलन सुरू झाले. क्रांन्तीकारकांच्या प्रयत्नातून २१ जुलै १९५४ साली दादरा मुक्त करण्यात आले तर दोनच आठवड्यात नगर हवेली देखील स्वतंत्र झाली.स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकावत वंदे मातरम च्या घोषणांच्या आवाजात दादरा आणि नगर हवेलीचा स्वातंत्र उत्सव साजरा केला जावू लागला. याच क्रांन्तीकारकांनी वरिष्ठ पंचायतीद्वारे दादरा व नगर हवेलीचा कारभार आपल्या हाती घेतला.   

या पंचायतीद्वारे १ जून १९६१ पर्यन्त राज्यकारभार केला गेला आणि त्यानंतर अधिकृतरित्या भारतात सहभागी होण्याबद्दल भारत सरकारकडे निवेदन देण्यात आलं.

हे निवेदन स्वीकारुन भारताने अधिकृतरित्या दादर व नगर हवेली सोबत करार करण्याच्या हेतून IAS अधिकारी के.जी बदलानी यांना दादरा व नगर हवेलीमध्ये पाठवले.

याच अधिकाऱ्यांनी दिनांक ११ ऑगस्ट १९६१ साली दादरा व नगर हवेलीचा संपुर्ण कारभार हाती घेतला. त्याच वेळी स्वतंत्र राज्य दादरा आणि नगर हवेलीचा पंतप्रधान म्हणून कारभार स्वीकारला.

राज्याचा प्रमुख अर्थात पंतप्रधान म्हणून त्यांनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासोबत करार केला आणि भारतात सामिल होण्याच्या अधिकृत सामीलनाम्यावर सह्या केल्या.दादर व नगर हवेली भारतात सहभागी होताच पोर्तुगीज शासनाने दादर व नगर हवेली मधील कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्यानंतर पोर्तुगीज शासनाने आत्मसमर्पण केलं व पुढे हा भाग भारताच्या ताब्यात आला.

हे ही वाच भिडू –

Leave A Reply

Your email address will not be published.