IAS राणी सोयमोईच्या ‘इमोशनल’ कहाणीवर डोळे ओलं करणाऱ्यांनो तुम्ही सपशेल गंडलाय

फॅमिली व्हाटसऍप ग्रुपवर एक मेसेज पडला…..

🚩🙏कलेक्टर मेकअप का करत नाही…?

मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती. राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
…………………………………………
तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.
सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नव्हती.
भाषण इंग्रजीत आहे (खाली मराठी मध्ये स्वैर अनुवाद आहे).
ती फक्त एक-दोन मिनिटेच बोलली, पण तिचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते.
त्यानंतर मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले

एवढे बारीक सारीक डिटेल्स देऊन स्टोरीची सुरवात झाली होती.

आजकाल  बऱ्याच IAS झालेल्या लोकांच्या स्टोऱ्या अगदी पिक्चचरला लाजवेल एवढ्या रंगवून फॉरवर्ड केल्या जातात त्यामुळं नवीन आश्चर्य वाटलं नाही.

मॅडमना नाव गाव विचारून झाल्यावर एका मुलीने IAS मॅडमना एक प्रश्न विचारला

“मॅडम, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप का वापरत नाही?” 

यावर मॅडमनी दिलेला उत्तर , त्यांच्या झारखंडमध्ये आदिवासी गरीब घरात गेलेलं बालपण , लहानपणी  अभ्राखाच्या खाणीत केलेलं जीवघेणं काम,पुढे मग त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू आणि मग राणीला एक कलेक्टरच सरकारी शाळेत घालतो आणि मग राणी कलेक्टर होते  हे सगळं या स्टोरीच्या लेखकानं खिळवून ठेवण्यासारखंच लिहलं होतं.

मग शेवटी माझ्यासारखा शेकडो लहान मुलांच्या जीवावर चालणाऱ्या खाणींमधील अभ्रकाचा उपयोग मेकअप साहित्यात होतो त्यामुल मी मेकअप लावत नसल्याच राणीचं उत्तर. त्यात खाली ‘मल्याळममधुन अनुवादित’ अशी तळटीप पण होती.

आता या स्टोरी मधल्या IAS राणी सोयमोई यांच्याबद्दल अजून माहिती घ्यावी म्हटलं आणि वेगळीच माहिती समोर आली.

तर IAS राणी सोयमोई यांच्या नावानं जी स्टोरी फिरतेय तिला कोणत्या एका दुसऱ्याच IAS ऑफीसरचा फोटो लावण्यात आलाय.

केरळच्या दुसऱ्या एक IAS ऑफिसर शाईनमोल यांच्या फेसबुकचा प्रोफाइल फोटोच या स्टोरी बरोबर लावण्यात आलाय.

IAS ऑफिसर शाईनमोल सध्या केरळच्या वॉटर ऑथॉरीटीच्या मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. त्यांचा भाऊ SP तर बहीण शीला हाय देखील IAS आहेत. त्यांच्या गावात त्यांच्या घराला IAS जंक्शन पण म्हणतात. आता हे झालं फोटो खोटं असल्याचं.

या व्हाटसऍप  फॉरवर्डवर आलेली ही स्टोरीची पण हीच गत आहे.

IAS राणी सोयमोई हे पूर्ण पात्रच काल्पनिक आहे.

IAS राणी सोयमोई अशी ऑफिसरच अस्तित्वात नाहीये.मल्याळम लेखक हकीम मोरायुर यांनी लिहलेली “शायनिंग फेसेस” या कथेचा भाग या व्हाटसऍप वरील स्टोरीमध्ये जशाच्या तसा उचलण्यात आला आहे. राणी सोयमोई  हे त्यांच्याच पुस्तकातील एक काल्पनिक पात्र आहे. राणी सोयमोई या खऱ्या जिल्हाधिकारी असल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करण्यासाठी हकीम मोरायुर यांनी फेसबुकवर ही माहिती दिली आहे.

त्यामुळं पूर्णच्या पूर्ण व्हाटसऍप मॅसेजचं खोटा आहे .

त्यामुळं हि स्टोरी फॉरवर्ड करून मुलींच्या मेकपवर कोणी ज्ञान पाजळलं असेल तर त्याला टॅग करून ही पोस्ट जरूर दाखवा. बाकी तुम्हाला अजून कुठले व्हाटसअप मेसेज खोटे वाटत असतील तर आम्हाला खाली कंमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

6 Comments
  1. आकाश says

    हे फॉरवर्ड खोटं असलं तरी अभ्रकाच्या खाणी आणि तिथं काम करणारी मुले खरी आहेत. त्यांच्या वर एखादा लेख येऊद्या.

  2. Kasat says

    हे खोट आहे पण अर्ध सत्य आहे… Abhrak च्या khani म्हणजे kala patthar टाइप aahe…

  3. Shrikant Ghuge says

    The dark secret behind your favorite makeup… खूप साऱ्या डॉक्युमेंट्री मिळतील तुम्हाला… कथेतून काय देण्याचा प्रयत्न केलाय ते समजून घेणे महत्वाचे…! आणि जर कथा खोटीच तर बोधकथा समजून वाचा ना!

  4. Sam says

    Make up is not part of daily life. If story affecting the uses of beauty products then what’s wrong in it

  5. Kafil Shaikh says

    अशीच एक महाराष्ट्रातील पंढरपूर जवळ जाधववाडी या कथित आदश॔ गावाबाबत पोस्ट वायरल झाली आहे. त्याची पडताळणी व्व्हावी.

  6. Datta Bele says

    खोट असेल तरी पन कहानी प्रेरणादायक आहे. झारखंड मधील अभ्रक ख़ाणीतिल काम करणारे मजूर त्यांचे जीवन वास्तव आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.