आईडीएफसी बँकेच्या CEO ने ट्रेनर, मोलकरीण, ड्रायव्हरला नऊ लाखाचे शेअर्स गिफ्ट केलेत

वर्ल्ड इणेक्वालिटी इंडेक्स २०२२ नुसार, टॉप १० टक्के भारतीयांचे उत्पन्न तळातील ५० टक्क्यांपेक्षा सरासरी ९६ पट अधिक आहे. त्याचप्रमाणे, ऑक्सफॅम इंटरनॅशनलने दावा केला आहे त्याप्रमाणे २०२१ मध्ये भारतातील टॉप १ टक्के लोकांकडे देशाची सुमारे ७७ टक्के संपत्ती होती. त्यामुळं भारतात संपत्ती तर वाढतेय मात्र एक विशिष्ट वर्गाकडेच ही जमा होत आहे.

एकदा भारतात संपत्ती आली का तळागाळातल्या लोकांकडे ती आपोआप जाईल असं सांगण्यात येत होतं. मात्र  ते फक्त पेपरात राहिल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर आता सरकार संपत्तीचं वितरण करण्यास नाकाम ठरल्याने आता गरिबांना श्रीमंतांच्या सद्सद् विवेकबुद्धीवरच विसंबून राहवं का असा प्रश्न पडतो. आणि काही घटना अशा घडत देखील आहे ज्यामुळं याला खतपाणी देखील मिळत आहे. आता हीच गोष्ट बघा की.

IDFC FIRST बँकेचे MD आणि CEO व्ही वैद्यनाथन यांनी त्यांच्याकडे असलेल्या बँकेचे ३.९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ९ लाख समभाग, त्यांचे ट्रेनर, हाऊस हेल्प आणि ड्रायव्हर यांच्यासह पाच व्यक्तींना घरे खरेदी करण्यात मदत करण्यासाठी भेट दिली आहे. 

या पाच जणांचा खासगी क्षेत्रातील बँकेच्या या उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी रक्ताने कोणताही संबंध नाही फक्त मदतीच्या भावनेने त्यांनी ही मदत केली आहे.

त्यांनी त्यांचे ट्रेनर रमेश राजू यांना ३ लाख शेअर्स भेट दिले आहेत. तर त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या प्रांजल नार्वेकर आणि ड्रायव्हर अल्गारसामी सी मुनापर यांना प्रत्येकी २ लाख शेअर्स गिफ्ट केलेत. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक कर्मचारी दीपक पठारे आणि  संतोष जोगळे यांना प्रत्येकी १ लाख शेअर्स त्यांनी भेट म्हणून दिले आहेत.

BSE वर सोमवारच्या क्लोजिंग प्राइस ४३.९० रुपये प्रति शेअर यानुसार वैद्यनाथन यांनी भेट दिलेल्या ९ लाख शेअर्सचे मूल्य ३,९५,१०,०० रुपये म्हणजेच चार कोटींच्या घरात आहे. याचबरोबर रुक्मणी सोशल वेल्फेअर ट्रस्टला सामाजिक उपक्रमांसाठी २ लाख शेअर्सही देण्यात आले आहेत.

व्ही. वैद्यनाथन यांनी यापूर्वीही मदत केली आहे. 

व्ही. वैद्यनाथन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घर खरेदी करण्यासाठी शेअर्स देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०२१ मध्ये त्यांनी २.४३ कोटी किमतीचे ४.५ लाख शेअर्स त्यांच्या कर्मचाऱ्यांना घर खरेदी करण्यासाठी दिले आहेत. २०२० मध्ये, त्यांनी ३० लाख रुपयांचे १ लाख शेअर्स त्यांच्या शाळेतील जुन्या गणित शिक्षकाला भेट दिले होते.

त्यामुळं आयुष्यभर कष्ट केलं तरी जेवढे पैसे कमवता आले नसते तेवढे पैसे  व्ही. वैद्यनाथन यांच्या एका निर्णयामुळं त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत.

आता हे तर सगळ्यांना भेटत नाही. त्यामुळं तुम्हा आम्हाला तुटपुंज्या संपत्तीवरच भागवाव लागतं. जेव्हा एक माणूस एवढ्या उंचीवर जातो त्यामागे लाखो माणसांची श्रमचोरी असते असं सांगण्यात येतं. त्यामुळं व्ही. वैद्यनाथन यांनी जे आपल्या कर्मचारांच्या कामाचे मोल जाणलंय तसेच बाकिच्यांनीही जाणावं तर खाली कमेंट करून तुमचं मत जरूर मांडा. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.