भारताने फक्त ठरवायला पाहिजे, मग पाकिस्तान क्रिकेट बंद पडलंच म्हणून समजा.

भारताने फक्त ठरवायला पाहिजे, मग पाकिस्तान क्रिकेट बंद पडलंच म्हणून समजा.

असं काय आम्ही म्हणायला नाही. दस्तुरखुद्द पाकिस्तानच असं म्हणतय. होय तर आपल्या मोदींना घाबरतंय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड.

पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड असं का म्हणतंय ते आधी बघूया..

तर त्याच झालंय असं की, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी पाकिस्तानच्या ग्राऊंडवर न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ मालिका खेळणार होते. पण ऐनवेळी सुरक्षिततेचा मुद्दा पुढं करून  न्यूझीलंडने मालिका सुरू होण्याच्या काही तास अगोदर सामन्यातून काढता पाय घेतला. त्यानंतर इंग्लंडनेही न्यूझीलंडचा मुद्दा पुढं करून दौरा रद्द केला.

आता याचा मोठा आर्थिक फटका पाकिस्तान क्रिकेट मंडळाला म्हणजे पीसीबीला बसला. मग आता हे खापर कोणावर फोडायचं असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी याचं खापर भारतावर फोडलं होतं.

यात एका मुंबईच्या मुलाने न्यूझीलंडच्या क्रिकेटरच्या बायकोला म्हणे मेल केला होता आणि त्यामुळंच तो दौरा रद्द झाला. या घटनेला महिना उलटतो ना उलटतो तोच, आता पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू रमीझ रजा म्हणतायत की,

भारताने ठरवलं तर पाकिस्तानमधील क्रिकेट भारत संपुष्टात आणू शकते. मोदींनी ठरवलं तर आयसीसीकडून पाकिस्तानला कोणतेही आर्थिक साह्य मिळू शकत नाही आणि तसं जर झालं तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल. 

पाकिस्तान क्रिकेट सिनेटची स्टँडिंग मिटिंग सुरु होती. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोणत्या कोणत्या अडचणी आहेत यावर चर्चा सुरु होती. त्यात मग सगळ्याच सिनेट सदस्यांनी पाकिस्तानमधील क्रिकेट मालिका इतर देशांनी रद्द करण्याला भारतास जबाबदार धरलं.

आणि त्याच्या पुढं दोन पाऊल जाऊन रमीझ रजा म्हंटले, भारताने ठरवलं तर पाकिस्तानमधील क्रिकेट भारत संपुष्टात आणू शकते.

पाकिस्तान क्रिकेटची व्यथा मांडताना रमीझ रजा यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाचा उल्लेख केला. मोदींनी ठरवलं तर आयसीसीकडून पाकिस्तानला कोणतेही आर्थिक साह्य मिळू शकत नाही आणि तसे झाले तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल, असे रजा यांनी जाहीरपणे म्हटले.

पाकिस्तान मंडळाला आयसीसीकडून ५० टक्के आर्थिक साह्य मिळते. आयसीसी ज्या टुर्नामेंट्स खेळवते, त्यातुन जो पैसे येतो तो मेंबर बोर्ड्स मध्ये वाटलं जातो. आणि आयसीसीला ९० टक्के पैसा हा भारतीय व्यावसायिकांकडून मिळतो.

सिनेटच्या स्टँडिंग मिटिंगमध्ये आपली ही भावना व्यक्त करण्यापूर्वी रजा यांनी गेल्या आठवड्यापासून हाच सूर लावलेला आहे. आयसीसीकडून येणारे साह्य अचानक थांबले तर मोठी अडचण येऊ शकते, त्यासाठी पाकिस्तानी उद्योगपतींनी पुढे येऊन पाकिस्तानला सुपरपॉवर बनवण्यासाठी मदत केली पाहिजे, असे आर्जव त्यांनी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये पाक उद्योगपतींशी बोलताना केले होते.

क्रिकेट मध्ये तर भारत बाप आहेच, पण मोदी ही आता क्रिकेटमध्ये टशन देऊ शकतात हे कित्ती भारीय राव. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.