भारत चीन युद्ध झालं तर कोण भारी पडू शकतं ?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीन धोरणा बाबत पुन्हा एकदा भारत सरकारवर टिका केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषेदेत बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, चीन युद्धाची तयारी करत आहे. मात्र भारत सरकार ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला तयार नाही. चीन बाबतीची परिस्थिती न समजून घेता भारत सरकार झोपेत आहे. चीन फक्त घुसखोरी करत नाही तर युद्धाची तयारी करत आहे.

राहुल गांधींच्या या वक्त्यावनंतर भाजप अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर अनेकजण विचारत आहेत की, जर भारत चीन दरम्यान युद्ध झाल्यास कुठला देश वरचढ ठरू शकतो. कुठल्या देशाची लष्करी जास्त आहे ?

महत्वकांक्षा आणि विस्तारवादी धोरणामुळे शेजारील सगळ्या देशांशी चीनचे वाद आहे. भारत सुद्धा त्याला अपवाद नाही. 

चीन हा भारताचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी समजला जातो. भारताचे क्षेत्रफळ पाहायला गेलं तर ३२ लाख ८७ हजार २६३ स्वेअर किलोमीटर आहे. याचा अर्थ चीन भारता पेक्षा तिप्पट मोठा आहे.

ग्लोबल फायरपॉवर ही संस्था जगभरातील देशाच्या लष्कराची तुलना करत असते. १४० देशाचे तुलनेत भारत लष्करी ताकतीच्या बाबतीत चौथ्या नंबरवर असल्याचे या वर्षीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. लष्करी जवानांच्या संख्येच्या बाबतीत चीनच्या नंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र लष्करी क्षमतेचा विचार केला तर भारताला मोठा पल्ला गाठावा लागणार असल्याचे सांगितलं जात.

चीन जवळ २० लाख लष्करी जवान आहेत तर भारताच्या लष्करात १४ लाख ५० हजार जवान आहेत. याचा अर्थ असा होतो की, भारता पेक्षा साडे पाच लाख जास्त लष्करी जवान आहेत. यामुळे मनुष्यबळाच्या बाबतीत चीन भारताच्या बराच पुढे आहे.  

तर दुसरीकडे विचार करायला गेले तर निमलष्करी दलाच्या सैनिकांची संख्या चीनच्या तुलनेत भारताच्या जवानांची संख्या जास्त आहे. भारताच्या निमलष्करी दलात २५ लाख २७ हजार जवान आहेत. तर दुसरीकडे चीनच्या निमलष्करी दलात फक्त ६ लाख २४ हजार जवान आहे. या बाबतीत भारत चीनच्या बराच पुढे आहे. चीन पेक्षा भारताकडे १९ लाख जास्त निमलष्करी जवान आहे. यातील जवान हे युद्धावेळी महत्वाची भूमिका बजावू शकतात.

भारतातील निमलष्करी दलात बीएसएफ, सीआरपीएफचा समावेश होतो.

भारताचे संरक्षण बजेट ४९ अब्ज ६०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ३.७ लाख कोटी रुपये आहे. या प्रमाणात १४० देशांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे. ७७० अब्ज डॉलरच्या संरक्षण बजेटसह अमेरिका आघाडीवर आहे. त्यानंतर २५० अब्ज डॉलर्ससह चीन दुसऱ्या आणि १५४ अब्ज डॉलरच्या संरक्षण बजेटसह रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मागच्या काही वर्षात भारतीय वायू दलाबद्दल बोलण्यात येते. याच कारण म्हणजे वायू दलातील लढाऊ विमानांची कमी होत जाणारी संख्या. भारताच्या वायू दलाच्या ताफ्यात असणाऱ्या लढाऊ विमानाचे आयुर्मान संपले आहे. मात्र पर्याय नसल्याने आपल्याला वापरावे लागतात. त्यामुळे अनेकवेळा अपघात हिऊन वैमानिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

भारताच्या वायू दलाच्या ताफ्यात फक्त १७३ लढाऊ विमान आहेत तर चीनच्या वायुदलाच्या ताफ्यात १ हजार ४९ लढाऊ विमान आहेत. भारताच्या तुलनेत चीनकडे असणाऱ्या लढाऊ विमानांची संख्या खूप जास्त असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे सामान वाहून नेणारे विमान सुद्धा भारताच्या तुलनेत चीनकडे जास्त आहेत. चीनच्या वायुदलाकडे एकूण ४ हजार ६०० तर भारताच्या वायुदलाकडे २ हजार २६३ विमाने आहेत.

जमिनीवरील युद्धात महत्वाची भूमिका बजावत ते टॅंक. याबाबतीत सुद्धा चीन भारताच्या पुढे आहे. भारताकडे ४ हजार ६१४ तर चीनकडे ५ हजार ७५० टॅंक आहेत. तर इंफेंट्री कॉम्बेट वीइकल चीनकडे १४ हजार आहेत तर भारताकडे ८ हजार ६०० आहेत. लांब वर मारा करणाऱ्या आर्टलरी भारताकडे ३ हजाराच्या जवळपास आहे तर चीनकडे ७ हजार आहे.

हे झालं भूदल आणि वायू दलाबद्दल. चीनच्या नौदलपण भारताच्या तुलनेत तगड आहे.

चीनच्या नौदलात एकूण ७४२ युद्ध नौका आहेत तर भारताकडे २६७ नौका आहेत. तर चीनकडे ४ नौका या विमानवाहू आहे. भारताकडे फक्त एकच विमानवाहू युद्ध नौका असल्याचे सांगितलं जात. तसेच अजून एक म्हणजे चीनकडे तब्बल ७४ पाणबुड्या आहेत तर भारताकडे १६ पाणबुड्या आहेत.   

भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांत या वर्षी नौदलात सामील होणार आहे. ही भारताची दुसरी विमानवाहू युद्धनौका असेल.

भारत आणि चीन दरम्यान १९६२ मध्ये युद्ध झाले होते. त्यावेळी भारताला हार पत्करावी लागली होती. २० ऑक्टोबर १९६२ ला भारत चीन युद्धाला सुरुवात झाली होती. या युद्धाच्या आधी भारताला तयारी करायला वेळ मिळाला नव्हता.

एक महिना हे युद्ध चालले. २१ नोव्हेंबरला युद्ध संपले होते. या युद्धात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र १९६२ ची परिस्थिती आणि आताच्या परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे आज जर या दोन देशांदरम्यान युद्ध झालं काय होऊ शकत ते आतातरी सांगता येत येणार नाही.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.