पुण्यात तुम्हाला प्रसाद नायक ओळख देत नसले तर समजून घ्या अजून काम करायची गरज आहे
स्टेटस सिम्बॉल.
कुणी यासाठी बीएमडब्लू वापरत, दुबईला राहायला जात, आयफोन वापरत, मालदीवला फिरायला जात. हे झाले इतर लोकांसाठी. पुणेकर इतर पेक्षा वेगळे आहेत. याची असंख्य उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतील. असो मुद्द्यावर येवूयात.
हॉटेल वैशाली
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर फिरण्यासाठी असंख्य कारणे आहेत. त्यातील एक आहे वैशाली आणि रुपाली साउथ इंडियन रेस्टॉरंट. पुणेकरांसाठी वैशाली आणि रुपाली हे एक प्रकारचे स्टेटस सिम्बॉलच आहे.
इथे येणाऱ्यांचे चेहरे जरी तपासले तरी तुमच्या लक्षात येईल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आणि वैशाली ते गेले नाहीत असे कधी होत नाही. त्यामुळे हॉटेल वैशाली किती प्रसिद्ध आहे हे सांगायची गरज नाही. सकाळी ६ ते रात्री ११ या दरम्यान गेलात आणि तुम्हाला लगेच जागा मिळाली अस कधीच होत नाही.
तुम्ही वैशालीत गेला आणि तुम्हाला नावानिशी हाक मारून मॅनेजरने जागा मिळवून दिली. तर, विचार करा मित्रांमध्ये तुमची किती हवा होईल. वैशाली मध्ये येणारा ८० टक्के ग्राहक हा वारंवार येणाऱ्यातील आहे. काही जणांचे आजोबा, वडील येत होते. त्यांची मुल सुद्धा नित्यनियमाने हॉटेल वैशालीत येतात.
इथे गेल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. एक जण येणाऱ्या प्रत्येकाला जागा करून देतो. रोज येणाऱ्या ग्राहकांची आवडती जागा कोणती आहे हे लक्षात घेवून ती मिळवून देतो. त्याचबरोबर नित्यनियमाने येणारा ग्राहक सुद्धा त्याची तेवढीच अस्थाने विचारपूस करतोय. हे चित्र वैशालीत नक्कीच पाहायला मिळेल.
महत्वाचे म्हणजे ‘ज्याला हा माणूस माहितीये तोच खरा पुणेकर’ असा जोक सुद्धा तुम्हाला सोशल मिडीयावर वाचायला मिळेल.
प्रसाद नायक
होय हेच ते प्रसाद नायक. गेली २५ वर्ष पुणेकरांना वैशालीत आपली हक्काची जागा करून देणारा अवलिया. हॉटेल मध्ये होणारी गर्दी मॅनेज करणे आणि येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला चांगली वागणूक देणे हे काम प्रसाद नायक नित्यनियमाने करत आहेत.
वर सांगितल्या प्रमाणे वैशाली हे पुणेकरांसाठी स्टेटस सिम्बॉल आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या ग्राहकांना जर नावानिशी हक मारून जागा करून दिली तर कौतुक वाटणारच की.
नेहमी येणाऱ्या ग्राहकांना अस वाटत की, वैशालीत आल्यावर आपल्याला प्राधान्याने जागा मिळायला हवी. अनेक असे ग्राहक आहे की, ते वर्षोनुवर्षे नियमित येतात. त्यामुळे त्यांची जागा फिक्स आहे. मात्र, गर्दी असल्याने ती मिळू शकत नाही. अशावेळी प्रसाद नायक ती जागा प्राधान्याने मिळवून देतो.
हॉटेल मध्ये येणाऱ्या काहीना आतमध्ये तर कोणाला बाहेर बसायचे असते मग अशावेळी कोण मदत करू शकतो तर प्रसाद. त्यामुळे वैशालीत येणारा ग्राहक सुद्धा प्रसाद यांच्याशी हसून खेळून वागतो.
प्रसाद नायक यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,
जस कळायला लागले तेव्हा पासून वैशालीत कामाला आहे. पहिले काही दिवस बिल बनविण्याचे काम केले. नंतर मॅनेजरने म्हणून बढती मिळाली.
गेली २५ वर्ष ग्राहकांना जागा मिळवून देण्याचे काम करतोय.
हॉटेल मध्ये ८० टक्के ग्राहक हे दररोज येणाऱ्यातील आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे, आवडीनिवडी माहित झाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. ते जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. ग्राहकासोबत चांगले संबध असल्याने इतरांना थांबवून जेष्ठ नागरिकांना जागा मिळवून देता येते. यामुळे माझ्याकडे लोक आस्थेने पाहतात.
२ दिवस दिसलो नाही, सुट्टी घेतली, हॉटेल वर आलो नाही तरी अनेकांचे फोन येतात. अशा प्रकारे प्रेम पुणेकरांकडून मिळत असल्याचे प्रसाद नायक यांनी सांगितले.
प्रसाद नायक हे मुळचे कर्नाटकातील उडुपी येथील असून वयाच्या १८ वर्षापासून वैशालीत आहे. पहिल्यांदा बिल तयार करणाऱ्या प्रसाद यांची त्यांची ग्राहकांशी संवाद साधण्याची कला पाहता त्यांना मॅनेजर करण्यात आले. गेले २५ वर्ष प्रसाद नायक ग्राहकांना जागा मिळवून देत आहेत.
वैशालीची सुरुवात
श्रीधर शेट्टी यांनी पुण्यात १९४५ ते १९५० दरम्यान निर्मल भवन, मद्रास कॅफे (रुपाली), मद्रास हेल्थ होम आताचे वैशाली आणि हॉटेल भैरव हि चार हॉटेल सुरु केली.
दरम्यान श्रीधर शेट्टी यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर वैशाली हॉटेल मध्ये काम करणार त्यांच्या बहिणीचा मुलगा जगन्नाथ शेट्टी यांनी व्यवसायाची सूत्रे हातात घेतली. आजही तेच सर्व काम पाहतात.
- गजानन शुक्ला ( ९५२७४७५९९९)
हे ही वाच भिडू
- जत्रेत तमाशाचा फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर थेट न्यूयॉर्कला जाऊन पोहचल्या..
- या पुणेकर माणसाने “ताजमहल नव्हे तेजोमहल” हे पिल्लू सोडून दिलं…
- पुणेकरांनी भारताच्या उपराष्ट्रपतींना एका संस्थेच्या निवडणुकीत पाडण्याचा पराक्रम केला होता